Vodafone Idea चा नवा 209 रुपयांचा प्लॅन लाँच, जाणून घ्या बेनिफिट्स

भारतातील प्रसिद्ध आणि तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम दिग्गज Vodafone Idea (VI) ने आपल्या ग्राहकांसाठी अप्रतिम प्लॅन्स ऑफर करत असते.

Vodafone Idea कंपनीने एक नवीन स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे, ज्याची किंमत 209 रुपये इतकी आहे.

हा प्लॅन जवळपास एक महिना म्हणेजच संपूर्ण 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये 2GB डेटाचा लाभ देखील मिळणार आहे.

या प्लॅनमध्ये मध्यरात्री 12 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अमर्यादित डेटाचा लाभ मिळणार आहे. याव्यतिरिक्त, सोमवार ते शुक्रवारपर्यंतचा उर्वरित डेटाचा लाभ शनिवार-रविवारी विकेंड डेटा रोलओव्हर अंतर्गत घेता येईल.