लेटेस्ट Realme 14x स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
Realme च्या नव्या Realme 14x स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. कंपनीने अधिकृतपणे भारतात पहिला Realme 14 सीरीज स्मार्टफोन लाँच केला आहे.
Realme च्या नव्या Realme 14x ची किंमत बेस 6GB+128GB मॉडेलसाठी 14,999 रुपयांपासून सुरू होते. तर, फोनच्या 8GB+ 1218GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये इतकी आहे.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा हँडसेट आता Flipkart आणि Realme वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनी लाँच ऑफरअंतर्गत या स्मार्टफोनवर 1000 रुपयांची झटपट बँक सूट देखील देत आहे.