'या' आठवड्यात भारतात लाँच होणार जबरदस्त बजेट फोन्स
या आठवड्यात 7 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान भारतात एक दोन नव्हे तर, अर्धा डझन स्मार्टफोन लाँच होणार आहेत. तुम्हाला लो बजेट आणि मध्यम श्रेणीतील स्मार्टफोन्स मिळतील.
LAVA Bold 5GLAVA इंटरनॅशनल उद्या म्हणजेच 8 एप्रिल रोजी भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे.
Realme NARZO 80x 5GRealme कंपनी भारतात त्यांची नवीन Narzo सिरीज लाँच करणार आहे. स्वस्त स्मार्टफोन Narzo 80X येत्या 9 एप्रिल रोजी लाँच होणार आहे.
Realme NARZO 80 Pro 5GRealme Narzo 80 Pro भारतात 9 एप्रिल रोजी लाँच होईल. हा एक गेमिंग फोन असेल, VC कूलिंग सिस्टमसह येतो.
Vivo V50eVivo V50e हा स्मार्टफोन 10 एप्रिल रोजी भारतीय बाजारात लाँच होणार आहे. हा एक मध्यम श्रेणीचा मोबाईल असेल, जो आकर्षक फोटोग्राफी मोड सह येईल.
iQOO Z10iQOO Z10 फोन 11 एप्रिल रोजी भारतात लाँच केला जाईल. हा फोन देखील वरील फोनप्रमाणे एक मध्यम बजेट डिव्हाइस असेल.
iQOO Z10xiQOO Z10x 5G फोन देखील 11 एप्रिल रोजी भारतात लाँच केला जाईल.