नव्या Samsung Galaxy S25 Ultra ची सेल सुरु, पहा किंमत आणि ऑफर्स
Samsung ने 22 जानेवारी रोजी Samsung Galaxy S25 सिरीज टेक विश्वात दाखल केली आहे. त्यानंतर, आज 3 फेब्रूवारी रोजी सिरीजमधील लेटेस्ट Samsung Galaxy S25 Ultra फोनची सेल भारतीय बाजारात सुरु झाली आहे.
Samsung Galaxy S25 Ultra फोन Samsung ची अधिकृत साईट आणि Amazon India वर खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
Amazon India वर सूचीबद्ध असलेल्या ऑफर्सनुसार, या फोनची किंमत Amazon वर 1,41,999 रुपये इतकी आहे. मात्र, हा फोन 1,29,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे.