BSNL 1,499 रुपयांच्या प्लॅनवर होळी ऑफर, वैधतेत वाढ

BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन होळी ऑफर सादर केली आहे. कंपनीने ही ऑफर त्यांच्या सध्याच्या BSNL 1,499 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनसह दिली आहे.

आतापर्यंत ग्राहकांना या प्लॅनमध्ये 336 दिवसांची वैधता मिळत होती. होळी ऑफरअंतर्गत या प्लॅनची वैधता वाढवण्यात आली आहे.

ऑफरअंतर्गत या प्लॅनवर 29 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळणार आहे. त्यानुसार, या प्लॅनसह तुम्हाला 365 दिवसांची वैधता मिळेल.

लक्षात घ्या की, BSNL ची ही ऑफर फक्त 31 मार्चपर्यंत वैध असेल. हा कंपनीचा एक डेटा प्लॅन आहे.

प्लॅनमध्ये 24GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100SMS चे फायदे मिळणार आहेत.

BSNL Holi Offer