मोबाईल्सची वाढती क्रेझ लक्षात घेता सध्या बाजारात असे नवनवीन बजेट स्मार्टफोन्स येत आहेत. त्यामुळे जर तुम्ही बाजारात स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी गेला आहात किंवा कोणता नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल ह्या द्विधा मन: स्थितीत असाल, तर काळजी करु नका आम्ही, तुम्हाला आज सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये असलेल्या १० हजाराच्या किंमतीतील टॉप १० स्मार्टफोन्स यादी देणार आहोत. ह्या सर्व स्मार्टफोन्समध्ये उत्कृष्ट कॅमेरा, फिंगरप्रिंट सेंसर, उत्कृष्ट बॅटरी लाइफ यांसारख्या अनेक फीचरर्सचा समावेश आहे. चला तर मग पाहूया कोणते आहेत हे स्मार्टफोन्स…. Although the prices of the products mentioned in the list given below have been updated as of 20th May 2022, the list itself may have changed since it was last published due to the launch of new products in the market since then.
मिजू M2 नोट ला लाँच होऊन जवळपास एक महिना लोटून गेला असला तरीही, अजूनही हा 10K यादीतील उत्कृष्ट स्मार्टफोन आहे. ह्यात 5.5 इंचाची डिस्प्ले देण्यात आली असून त्याचे रिझोल्युशन 1080x1920 पिक्सेल आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले असून त्याला 128GB पर्यंत मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो. ह्यात 2GB रॅम आणि 3100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आण ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात ला आहे.
SPECIFICATION | ||
---|---|---|
Screen Size | : | 5.5" (1080 x 1920) |
Camera | : | 13 | 5 MP |
RAM | : | 2 GB |
Battery | : | 3100 mAh |
Operating system | : | Android |
Soc | : | MediaTek MT6753 |
Processor | : | Quad |
कूलपॅड नोट 3 हा १०,००० च्या किंमतीतील एक उत्कृष्ट स्मार्टफोन आहे. ह्यात ऑक्टा-कोर मिडियाटेक MT6753 SoC आणि 3GB रॅम देण्यात आले आहे. ह्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे ह्यातील सुपरफास्ट असे फिंगरप्रिंट सेंसर आणि त्यातील बॅटरी जी एकदा चार्ज केल्यावर जवळपास 10 तास चालते.
SPECIFICATION | ||
---|---|---|
Screen Size | : | 5" (720 x 1280) |
Camera | : | 13 | 5 MP |
RAM | : | 3 GB |
Battery | : | 2500 mAh |
Operating system | : | Android |
Soc | : | MediaTek MT6735 |
Processor | : | quad |
ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720x1280 पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर मिडियाटेक कंपनी MT6735 चिपसेट आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आहे, ज्याला मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो. कूलपॅड नोट 3 लाइट स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा एक ड्यूल सिम ड्यूल 4G स्मार्टफोन आहे.
SPECIFICATION | ||
---|---|---|
Screen Size | : | 5" (720 x 1280) |
Camera | : | 13 | 5 MP |
RAM | : | 3 GB |
Battery | : | 2500 mAh |
Operating system | : | Android |
Soc | : | MediaTek MT6735 |
Processor | : | quad |
मोटो G 3rd जेन हा सर्वोत्कृष्ट सॉफ्टवेअर असलेल्या स्मार्टफोनच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये LTE सपोर्टसह 1.4GHz क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर दिले गेले आहे. हा अॅनड्रॉईड 5.1.1 वर चालतो. हा 1GB आणि 2GB रॅम अशा दोन प्रकारात उपलब्ध आहेत. ह्याची खास गोष्ट म्हणजे हा IPx7 पाणी अवरोधक आहे. हा ३ फूट पाण्यात 30 मिनिटे कोणत्याही नुकसानाशिवाय राहू शकतो. स्मार्टफोनमध्ये 2470mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
SPECIFICATION | ||
---|---|---|
Screen Size | : | 5" (720 x 1280) |
Camera | : | 13 | N/A MP |
RAM | : | 1 GB |
Battery | : | 2470 mAh |
Operating system | : | Android |
Soc | : | N/A |
Processor | : | quad |
लेनोवो K3 नोट हा सुद्धा जुना झाला असला तरीही,खरेदीसाठी हा उत्कृष्ट स्मार्टफोन आहे. हा ऑक्टा-कोर SoC प्रोसेसरने शक्तिशाली बनविण्यात आला आहे. तसेच गेमिंगसाठीही हा उत्कृष्ट स्मार्टफोन आहे. ह्यावर चित्रपट पाहताना एक वेगळाच अनुभव मिळतो. ह्याचा डिस्प्लेही खूपच आकर्षक आहे.
SPECIFICATION | ||
---|---|---|
Screen Size | : | 5.5" (1080 x 1920) |
Camera | : | 13 | 5 MP |
RAM | : | 2 GB |
Battery | : | 3000 mAh |
Operating system | : | Android |
Soc | : | MediaTek MT6752 |
Processor | : | Octa |
आसूस झेनफोन 2 लेसर ५.५ हा १० हजाराच्या किंमतीत येणारा उत्कृष्ट कॅमेरा स्मार्टफोन आहे. ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा ऑटोफोकससह देण्याता आला आहे. ह्या वैशिष्ट्यांमुळे ह्यात खूप उत्कृष्ट फोटो काढता येतात. तसेच हा स्नॅपड्रॅगन 410 वर चालतो. ह्यात 2GB चे रॅम आणि ५.५ इंचाची 720 पिक्सेलची डिस्प्ले देण्यात आली आहे. जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये कॅमेरा महत्वाचा वाटत असेल, तर आसूस झेनफोन 2 लेसर हा एक उत्कृष्ट पर्याय आहे.
SPECIFICATION | ||
---|---|---|
Screen Size | : | 5.5" (720 x 1280) |
Camera | : | 13 | 5 MP |
RAM | : | 2 GB |
Battery | : | 3000 mAh |
Operating system | : | Android |
Soc | : | Qualcomm Snapdragon 410 |
Processor | : | Quad |
स्मार्टफोनच्या तपशीलाबाबत बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची HD (720x1280 पिक्सेल) रिझोल्युशन डिस्प्ले दिली गेली आहे, ज्यात AGC ड्रॅगनटेल प्रोटेक्टिव ग्लासने सुरक्षित करण्यात आले आहे. त्याची पिक्सेल तीव्रता 296ppi आहे आणि स्मार्टफोनमध्ये 64 बिट क्वाडकोर मीडियाटेक MT6735 प्रोसेसर दिला गेला आहे, जो 1.3GHz स्पीड देतो. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये 2GB ची LPDDR3 रॅम आणि Mali T720 GPU सुद्धा मिळत आहे.फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा f/2.2 अॅपर्चर आणि कॉर्निंग गोरिला ग्लास ३ने सुरक्षित करण्यात आले आहे आणि LED फ्लॅशसुद्धा दिली गेली आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे, जो आपल्याला f/2.0 अॅपर्चरसह फोटोनेशन 2.0 स्मार्टफोन सेल्फी आणि फेस AE फेस लाइट बुुस्ट फंक्शनलिटीसह येतो.
SPECIFICATION | ||
---|---|---|
Screen Size | : | 5" (720 x 1280) |
Camera | : | 13 | 5 MP |
RAM | : | 2 GB |
Battery | : | 2500 mAh |
Operating system | : | Android |
Soc | : | MediaTek MT6735 |
Processor | : | Quad |
लिक्विड Z630S स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची HD IPS OGS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720x1280 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन मिडियाटेक MT6753 प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 32GB अंतर्गत स्टोरेज दिले आहे. ह्यात 4000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्यात ८ मेगापिक्सेल आणि रियर कॅमेरा आहे. हा 4G LTE, 3G, वायफाय 802.11 B/G/N, ब्लूटुथ ४.० कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्याने सुसज्ज आहे.
SPECIFICATION | ||
---|---|---|
Screen Size | : | 5.5" (720 x 1280) |
Camera | : | 8 | 8 MP |
RAM | : | 3 GB |
Battery | : | 4000 mAh |
Operating system | : | Android |
Soc | : | MediaTek MT6735 |
Processor | : | Octa |
मायक्रोमॅक्स कॅनवास पल्स 4G स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720x1280 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz ऑक्टा-कोर मिडियाटेक (MT6753) प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. मायक्रोमॅक्स कॅनवास पल्स 4G भारतीय LTE बँडला सपोर्ट करतो आणि हा ड्यूल सिम ड्यूल स्टँडबाय फीचरसहित येईल. स्मार्टफोनमध्ये 2100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
SPECIFICATION | ||
---|---|---|
Screen Size | : | 5" (720 x 1280) |
Camera | : | 13 | 5 MP |
RAM | : | 3 GB |
Battery | : | 2100 mAh |
Operating system | : | Android |
Soc | : | MediaTek MT6753 |
Processor | : | Octa |
ज्या विंडोज प्रेमींना विंडोज १० चे अपडेट हवे असेल त्यांना 10K मध्ये मिळणारा हा लूमिया 640 उत्कृष्ट पर्याय आहे. तसेच तुम्हाला लूमिया 550 हा अजून एक पर्याय आहे पण आम्ही तुम्हाला उत्कृष्ट कॅमेरा हवा असेल तर लूमिया 640 च घ्या असे सूचवू.
SPECIFICATION | ||
---|---|---|
Screen Size | : | 5" (720 x 1280) |
Camera | : | 8 | 0.9 MP |
RAM | : | 1 GB |
Battery | : | 2500 mAh |
Operating system | : | Windows Phone |
Soc | : | Qualcomm Snapdragon 400 |
Processor | : | Quad |
10 हजाराच्या बजेटमध्ये येणारे उत्कृष्ट आणि आकर्षक स्मार्टफोन्स(मार्च २०१६) | Seller | Price |
---|---|---|
मिजू M2 नोट | Amazon | ₹ 4,999 |
कूलपॅड नोट 3 | Amazon | ₹ 9,500 |
कूलपॅड नोट 3 लाइट | Amazon | ₹ 9,500 |
मोटोरोला मोटो G (3rd Gen) | Amazon | ₹ 8,299 |
लेनोवो K3 नोट | Flipkart | ₹ 7,999 |
आसूस झेनफोन 2 लेसर 5.5 | Amazon | ₹ 7,999 |
मिजू M2 | Flipkart | ₹ 6,999 |
एसर लिक्विड Z630s | Flipkart | ₹ 7,190 |
मायक्रोमॅक्स कॅनवास पल्स 4G | Flipkart | ₹ 6,390 |
मायक्रोसॉफ्ट लूमिया 640 | Amazon | ₹ 5,600 |