जोबोन अप२ Review

ने Prasid Banerjee | अपडेट Oct 21 2015
जोबोन अप२ Review
DIGIT RATING
81 /100
 • design

  89

 • performance

  72

 • value for money

  81

 • features

  84

 • PROS
 • वजनाला हलका आणि दिसायला चांगला
 • तुमच्या हातातील इतर अॅक्सेसरिजसह तुम्ही घालू शकता
 • १० दिवस चालणारी बॅटरी
 • CONS
 • वॉटरप्रुफ नाही
 • दिवसभर समक्रमित असल्यामुळे, खूप बॅटरी खातो

निर्णय

९,९९९ रुपयांत येणारा हा जोबोन अप२ ह्रद्याचे ठोके जाणून घेण्याचे वगळता Fitbit Charge charge जे करतो, ते सर्व काही करतो. पण जर तुम्ही वजन किंवा त्यासारख्या गोष्टी उचलत नसाल तर तुम्हाला ह्याची गरज नाही. सध्या भारतात फिटबिट आणि जोबोन अप२ यांचा चांगला व्यवसाय चालू आहे, त्यामुळे ह्या दोन फिटनेस डिवाईसमध्ये कोण सर्वोत्कृष्ट आहे, ह्याची स्पर्धा चालू आहे. पण मी खात्री देऊ शकतो, की सध्या जोबोन अप२ हा खरेदीसाठी सर्वोत्कृष्ट पर्याय आहे. हा तुम्हाला खात्रीपूर्वक तुमच्या फिटनेसच्या बाबतीत होणारी प्रगतीची माहिती देतो, आणि एखाद्या बँडप्रमाणे तुम्हाला क्षणोक्षणी योग्य ती माहिती पुरवतो. मी आतापर्यंत कोणत्याही फिटनेस बँडमध्ये ह्या प्रकारची क्षमता पाहिली नाही.

 

मी हा तीन महिने वापरला आणि मी आतापर्यंत वापरलेल्या फिटनेस बँडपैकी कोणीही माझ्या रोजच्या व्यायामाविषयी इतकी माहिती दिली नाही, जितकी ह्या बँडने दिली. त्यामुळे मला शक्य होईल तितका मी ह्या बँडबद्दल रिव्ह्यू दिला आहे. मी तुम्हाला वचन देतो की, हा नक्कीच तुमच्या फायद्याचा असेल.

जोबोन अप२ detailed review


 

ह्यात काय चांगले आहे?

 

फिटबिट चार्ज HR मध्ये नसलेली एक गोष्ट जोबोन अप२ ने सिद्ध केली ती म्हणजे हा माझ्या हातावर खूूप चांगला दिसला. आता चांगले दिसणे हे जरी युजरला काल्पनिक वाटत असले तरीही, मी हा सीमलेसली असण्याबद्दल बोलतोय, ज्यामुळे हा इतर कशा सोबत सुद्धा फिट दिसतो. फिटबिट चार्ज HR,Goqii बँड, यू फिट किंवा अगदी झिओमी Mi सारखे फिटनेस बँडसुद्धा मला माझ्या हातावर केवळ एक अॅक्सेसरिज म्हणून वाटले. पण अडचण फक्त एकच आहे की, मला घड्याळ आवडतात, त्यामुळे कोणत्याही स्मार्टबँडसाठी मी ते काढू शकत नाही.  त्याबाबतीत जोबोन अप२ अगदी योग्य बँड आहे. हा एखाद्या फ्रेंडशिप बँडसारखा दिसत असल्यामुळे कोणालाही असा प्रश्न पडला नाही की मी हे काय घातलय आणि माझ्या घड्याळ्याच्या बाजूलाच हा बँड का घातला? पण अर्थातच तुम्ही एका हातात घड्याळ आणि दुस-या हातात स्मार्टबँड घालू शकता, पण त्यात मी कम्फर्टेबल नव्हतो.

तसेच अप२ हा वजनाला हलका असल्यामुळे अनेकदा तर मला कळलेच नाही, मी हा घातला आहे की नाही. मी हा बँड वापरुन आता जवळपास एक महिना झाला, पण मला कधीच ह्याने मी दिवसभरात किती वेळ झोपलो किंवा किती वेळ चाललो, ह्याबाबत अचूक माहिती दिली नाही. मी अनेकदा हा स्लीप मोडवर ठेवायला विसरतो, तेव्हा हा बँड मला मी केव्हा झोपले पाहिले जे माझ्या फायद्याचे असेल, ते सांगतो.

 

त्याची नकारात्मक बाजू

 

ह्याची सर्वात मोठी नकारात्मक बाजू म्हणजे जोबोन अप२ हा वॉटरप्रूफ नाही. ह्याचाच अर्थ तुम्ही आंघोळ करत असताना किंवा स्विमिंग करत असताना घालू शकत नाही. जरी तो ‘splash-proof’ असला तरीही त्यावर पाण्याचे थेंब पडले तरीही तो चालेल की नाही ह्याबाबत खात्री देऊ शकणार नाही.

 

अॅपविषयी….

असे असले तरीही मला जोबोन अप२ बँडबद्दल आवडलेली गोष्ट म्हणजे हा सहभागी अॅप असल्यामुळे हा माझ्या पसंतीप्रमाणे असलेला फिटनेस बँड आहे. माझे असे मत आहे की, फिटनेस हे आकर्षक बँड वापरण्यापेक्षा तुमच्या प्रेरणेतून निर्माण होते आणि हे अप अॅपने सिद्ध करून दाखवले आहे. हा अॅप अप२ ला सर्व प्रकारची माहिती पुरवतो. हे अल्गोरिदमचे चांगले अॅप्लीकेशन आहे जे तुम्हाला तुम्ही सक्रिय आणि व्यायाम करत आहात का याची खात्री देतो.

तसेच महत्त्वाच्या आकडेवारीच्या माध्यमातून हा तुम्हाला ग्राफ्स आणि डेटा देतो, पण स्मार्ट कोच तुम्ही काय करताय ते सांगतो. मी हा बँड हातात घातल्यानंतरही पहिले काही दिवस मी धावण्यास प्रेरित झालो नाही. पण त्यानंतर स्मार्ट कोचने मला पॉप अप दिला की, आता आम्ही तुमचे दिवसातील प्रत्येक पाऊल मोजणार आहोत. त्यामुळे तुम्ही हळूहळू तुमची धावण्याची क्षमता वाढवा आणि तीच गती दुस-या दिवशी कायम ठेवा असे आवाहन केले. मी ते स्विकारले आणि दुस-या दिवशी मी अपेक्षेपेक्षा जास्त धावलो. त्यामुळे स्मार्ट कोचने मला पुन्हा आवाहन केले आणि मी त्याला सुद्धा मागे टाकले. आणि मग तिस-या दिवशी मी स्वत: लवकर उठलो, आणि धावण्यासाठी गेलो. याचाच अर्थ असा की, हा स्मार्ट कोच एखाद्या ख-या प्रशिक्षकासारखा काम करतो. स्मार्टकोचमुळे मला व्यायाम करण्यासाठी प्रेरणा मिळाली.

मला एकच समस्या वाटली ती म्हणजे, हा अॅप बँडसोबत दिवसभर जोडलेला असतो, त्यामुळे हा गरजेपेक्षा जास्त बॅटरी खातो. त्यापेक्षा जेव्हा मी माझ्या फोनवर हा अॅप उघडेल तेव्हाच हा बँडसोबत  जोडला असता तर ही एक चांगली कल्पना होती.

 

बॅटरी

जोबोन अप२ ला डिस्प्ले नाही, आणि ह्याला फक्त तीन लहान LED निर्देशक आहेत , ज्याचा फक्त चार्जिंग करताना वापर होतो. ह्यात डिस्प्लेची कमतरता असल्यामुळे छोटी ३८mAh बॅटरी दिली आहे, जी १० दिवस फक्त एकदा चार्जिंग केल्यावर चालते. हा डिवाईस चार्ज होण्यासाठी केवळ १ तास लागतो. त्यामुळे हा चांगला आहे की नाही, हा निर्णय मी सर्वस्वी तुमच्यावर सोडतो, पण माझ्यासाठी तरी हा ठिक आहे.

निष्कर्ष

९,९९९ रुपयांत येणारा हा जोबोन अप२ ह्रद्याचे ठोके जाणून घेण्याचे वगळता एखादा Fitbit Charge जे करतो, ते सर्व काही करतो. पण जर तुम्ही वजन किंवा त्यासारख्या गोष्टी उचलत नसाल तर तुम्हाला ह्याची गरज नाही. सध्या भारतात फिटबिट आणि जोबोन अप२ यांचा व्यवसाय चालू आहे, त्यामुळे ह्या दोन फिटनेस डिवाईसमध्ये कोण सर्वोत्कृष्ट आहे, ह्याची स्पर्धा चालू आहे. पण मी खात्री देऊ शकतो, की सध्या जोबोन अप२ हा खरेदीसाठी सर्वोत्कृष्ट पर्याय आहे. हा तुम्हाला खात्रीपूर्वक तुमच्या फिटनेसच्या बाबतीत होणारी प्रगतीची माहिती देतो, आणि एखाद्या बँडप्रमाणे तुम्हाला क्षणोक्षणी योग्य ती माहिती पुरवतो. मी आतापर्यंत कोणत्याही फिटनेस बँडमध्ये ह्या प्रकारची क्षमता पाहिली नाही.

जोबोन अप२ Key Specs, Price and Launch Date

Price: ₹9999
Release Date: 21 Oct 2015
Market Status: Launched

Key Specs

 • Type Type
  NA
 • Power (Battery,mAh) Power (Battery,mAh)
  NA
 • Compatible OS Compatible OS
  NA
 • Water Resistant Water Resistant
  NA
Prasid Banerjee
Prasid Banerjee

Email Email Prasid Banerjee

Follow Us Facebook Logo Facebook Logo

About Me: Trying to explain technology to my parents. Failing miserably. Read More

Advertisements
Advertisements

जोबोन अप२

जोबोन अप२

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status