77
46
51
65
मायक्रोमॅक्स कॅनवास P680 मध्ये एक आकर्षक डिस्प्ले दिली गेली आहे आणि ह्याची किंमत ९,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. ह्या टॅबमध्ये 1GB ची रॅम दिली गेली आहे, जी खूपच कमी आहे. जर आपले बजेट १०,००० रुपये आहे, तर आपण ह्या टॅबलेटबाबत विचार करु शकता. मात्र तुमचे बजेट अजून ३,००० रुपयापर्यंत वाढवू शकता, तर आपल्याला ह्या किंमतीत बाजारात अनेक टॅब मिळतील.
जर मला कोणी बाजारातील चांगला टॅब कोणत असा प्रश्न विचारला, तर मी नेक्सस 7 सांगेन. ह्यात तीन खूप चांगले फीचर्स मिळतात, ते म्हणजे चांगली रचना, आकर्षक टच आणि चांगली कामगिरी. मी टॅबवरुन कॉल करण्यास दुजोरा देणार नाही. कॉलसाठी तर फोनचा वापरच योग्य आहे. मायक्रोमॅक्स कॅनवास टॅब P680 विषयी बोलायचे झाले तर, ह्यात 8 इंचाची IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याने कॉलसुद्धा केले जाऊ शकते. तर मग आपण हा टॅब घेणार का?
डिझाईन आणि रचना
ह्या टॅबला पहिल्यांदा पाहताच हा आपल्याला नेक्सस जुन्या व्हर्जनप्रमाणे वाटेल. ह्यात समोरील बाजूस बटनसुद्धा दिले गेले नाही. ह्याच्या डिस्प्लेला काळ्या बॉर्डरने कव्हर केले गेले आहे, ज्याने ह्याची डिस्प्ले खूप लहान वाटते आणि आपण असे अनेक टॅबलेट्समध्ये पाहिले असेल. समोरच्या बाजूस डिस्प्लेच्या वर फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि एअरपीस दिला गेला आहे. ह्याच्या मागील बाजूस प्लॅस्टिकने कव्हर केले गेले आहे, मात्र ह्याची फिनिश गनमोटलसारखी आहे. मायक्रोमॅक्स कॅनवास टॅब P680 मध्ये मागील बाजूस दोन स्पीकर ग्रील्स दिले गेले आहे. ह्याच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह एक कॅमेरा दिला गेला आहे. त्याच्या मागील बाजूचा वरचा भाग काढून टाकला जाऊ शकतो आणि तेथे आपल्याला सिम कार्ड स्लॉट्स आणि मायक्रो-SD कार्ड स्लॉट पाहायला मिळतील. ह्या टॅबमध्ये दोन सिम कार्ड स्लॉट्स दिले गेले आहे, ज्यात एक पुर्ण सिम कार्ड स्लॉट आणि दुसरा मायक्रो-सिम कार्ड स्लॉट आहे.
चला तर मग आता ह्याच्या वजनाविषयी बोलूयात, मायक्रोमॅक्स कॅनवास टॅब P680 चे वजन थोडे जड वाटेल. मला टॅबलेटवर पुस्तके वाचण्याचा छंद आहे, मात्र ह्या टॅबलेटवर मला हे काम खूप कष्टदायक वाटले.
एकूणच ह्याचे डिझाईन खूप चांगले आहे. मात्र ह्याचे थोडे जास्तच आहे.
डिस्प्ले आणि यूआय
ह्या टॅबलेटमध्ये ८ इंचाची IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1280x800 पिक्सेल आहे. ह्याचे व्हूविंग अँगल्स खूप चांगले आहेत आणि ह्यावर व्हिडियो पाहण्याचा अनुभवही खूप चांगला आहे. ह्याचे स्पीकर्स काही उत्कृष्ट आवाज देत नाहीत, त्यामुळे व्हिडियो पाहण्याचा चांगला अनुभव घ्यायचा असेल तर, आपण हेडफोन्सचा वापर करावा.
चला आता ह्याच्या युआयविषयी बोलूयात. हा टॅबलेट इतर टॅबलेट्ससारखा अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. ह्यात अॅनड्रॉईडचा 5.0.1 व्हर्जन दिला गेला आहे.
मायक्रोमॅक्स कॅनवास टॅब P680 अनेक प्री-लोडेड अॅप्ससह येतो.
ह्यात एक ‘ट्रेडिंग अॅप्स’अॅप आहे, जेथे आपल्याला एकाच जागेवर ट्विटर, स्नॅपडील, सावन यांसारखे अॅप्स मिळतात.
ह्या टॅबची डिस्प्ले खूप चांगली आहे, मात्र ह्याचा ऑडियो चांगला नाही. ह्याचा युआयसुद्धा ठीक आहे. मात्र आपण प्री-लोडेड अॅप्सना जरुर हटवू इच्छिणार.
कामगिरी
ह्या टॅबलेटला थोडा जास्त वेळ वापरल्यावर आपल्याला ह्यातील उणीवा दिसण्यास सुरुवात होईल. मी जेव्हा ह्यावर गेम्स खेळले, तेव्हा हा फोन चांगला चालत होता, मात्र थोड्या वेळाने जेव्हा मी ह्यावर काही साइट्स ओपन केल्या तेव्हा ह्याची कामगिरी खूप कमी झाल्याचे दिसून आले.
मी ह्यावर अनेक व्हिडियो पाहिेले आणि मला खूप चांगले वाटले आणि हेडफोन्ससह व्हिडियो पाहण्याचा अनुभवही खूप चांगला होता.
चला आता ह्याच्या तपशीलाविषयी बोलूयात. ह्यात 8 इंचाची IPS डिस्प्ले दिली गेली आहे. ह्यात 1.3GHz मिडियाटेक प्रोसेसर आणि 1GB ची रॅम दिली गेली आहे. टॅबलेटमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 32GB पर्यंत वाढवू शकतो. ह्यात 5 मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा 4000mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे. रोजच्या वापरासाठी ह्यात 1GB ची रॅम दिली गेली आहे, ज्यामुळे मल्टीटास्किंग करण्यात थोड्या अडचणी येतात. ह्यावर टायपिंग करणेसुसद्धा सोपे आहे.
कॅमेरा
ह्यात ५ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्याचा कॅमेरा सर्वसाधारण कामगिरी करतो.
Micromax Cnavas Tab P680 camera samples
कॉल्स
मी कधीही टॅबलेटचा वापर कॉल करण्यासाठी करत नाही. ह्या टॅबलेटची कॉल गुणवत्ता चांगली आहे.
बॅटरी
आमच्या बॅटरी चाचणीत आम्ही ह्या टॅबलेटवर व्हिडियो चालवून पाहिली आणि जवळपास ५ तास सलग ह्यावर व्हिडियो पाहिले, जे की मायक्रोमॅक्सच्या दाव्यापेक्षाही जास्त आहे.
निष्कर्ष
मायक्रोमॅक्स कॅनवास टॅब P680 ची तुलना आपण शाओमी Mi पॅडशी केली, तर ह्याची किंमत १३,००० रुपये आहे आणि बरीच चांगली कामगिरी करतो. Mi पॅड NVIDIA टेग्रा K1, 2GB रॅम आणि 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्यात 7 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 2048x1536 पिक्सेल आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमचे बजेट ३ हजारापर्यंत वाढवले तर हा एक चांगला पर्याय आहे.
Price: |
![]() |
Release Date: | 19 Aug 2015 |
Market Status: | Launched |
Sameer Mitha lives for gaming and technology is his muse. When he isn’t busy playing with gadgets or video games he delves into the world of fantasy novels.
16 Dec 2019
11 Dec 2019
09 Dec 2019
28 Nov 2019
27 Nov 2019
05 Jul 2018
22 Feb 2018
22 Feb 2018
29 Jun 2016
21 Jun 2016
Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.
We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.