यू यूटोपिया Review

ने Prasid Banerjee | अपडेट Jan 12 2016
यू यूटोपिया Review
DIGIT RATING
79 /100
 • design

  76

 • performance

  82

 • value for money

  66

 • features

  91

 • PROS
 • चांगला कॅमेरा
 • कमी किंमत
 • चांगला लूक
 • CONS
 • Cyanogen मोड चांगला नाही
 • आकाराने मोठा आणि पकडण्यासाठी थोडा त्रासदायक

निर्णय

तुम्ही असा फोन घेऊ इच्छिता ज्यात अनेक बग्स आहेत? ते पण ह्या आशेपोटी की, आपण ह्या बग्स आणि सॉफ्टवेअरच्या समस्यांना अपडेट करुन ठीक करु शकता. जर आपले उत्तर हो असेल, तर आपण यू यूटोपिया स्मार्टफोन घेऊ शकता.

कंपनीच्या मते, यू यूटोपिया जगातील आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन आहे, मात्र आमच्या मते हा मायक्रोमॅक्स किंवा यू द्वारा आतापर्यंत बनवला गेलेला सर्वात चांगला फोन आहे. मात्र हा वनप्लस 2 सारखा फ्लॅगशिप किलर नाही. वनप्लस 2 ह्या स्मार्टफोनपेक्षा जास्त चांगला स्मार्टफोन आहे. यूटोपियामध्ये चांगला कॅमेरा आहे, मात्र ह्याचे सॉफ्टवेअर व्यवस्थितरित्या ऑप्टिमाइज्ड नाही आहे आणि ह्यात अनेक बग्स आहेत. ह्या स्मार्टफोनची सर्वात कमकुवत बाजू म्हणजे, ह्याचे Cyanogen ऑपरेटिंग सिस्टम. आणि ह्याचे सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्य म्हणजे ह्यात २१ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. ह्याचा स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसरपेक्षा जास्त मोठे व्हिडियोज घेतल्यास गरम होतो.

BUY यू यूटोपिया
Buy now on amazon स्टॉक मध्ये नाही 7310

यू यूटोपिया detailed review

डिझाईन आणि रचना


यू यूटोपिया स्मार्टफोन वनप्लस 2 सारखा आकाराने मोठा आहे, जो पकडणे सोपे नाही. ह्याचे फॉर्म फॅक्टर चांगला नाही. पहिल्यांदा हातात घेतल्यावर हा फोन चांगला फील देतो. हा आपल्याला इम्प्रेससुद्धा करेल. ह्याला बनवण्यासाठी मेटलचा वापर केला गेला आहे. ह्याची रचना खूप मजबूत आहे, मात्र हा HTC आणि अॅप्पलच्या फोन्ससारखा मजबूत नाही. तथापि, ह्याची किंमतसुद्धा ह्या स्मार्टफोन्ससारखी नाही.

 

मला यू यूटोपियाचा आकार चांगला वाटला नाही. ह्याच्या डिस्प्लेचा आकार वनप्लस 2 च्या डिस्प्ले च्या आकारापेक्षा ०.३ इंच कमी आहे. यू यूटोपियाचा आकार वनप्लस 2 सारखाच आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये मेटलचा वापर केला गेला आहे, ज्यामुळे हा स्मार्टफोन हातातून थोडा घसरतो. ह्या स्मार्टफोनला हातात पकडल्यावर हा सोयीस्कर वाटत नाही.

ह्या स्मार्टफोनच्या लूकविषयी बोलायचे झाले तर, तो चांगला आहे, मात्र काही लोकांना ह्याचा कॅमेरा बम्प्स आवडला नाही, त्यामुळे ह्या स्मार्टफोनच्या लूकमध्ये काही जास्त फरक पडत नाही. यूटोपिया मोठा आहे, ह्यात मेटॅलिक आणि प्रीमियम लूक मिळतो. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात शानदार लूक असलेला स्मार्टफोन आहे.

डिस्प्ले

ह्या स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची QHD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याची पिक्सेल तीव्रता खूप चांगली आहे आणि जी वनप्लस 2 आणि हॉनर 7 पेक्षासुद्धा चांगली आहे. ह्या डिस्प्लेमध्ये कोर्निंग कांकोर गोरिल्ला ग्लासचा वापर केला गेला आहे. ह्याची डिस्प्ले खूप चांगली आहे.

यूटोपियाची स्क्रीन वनप्लस 2 आणि हॉनर 7 ची तुलना खूप चांगली आहे. ह्याचे डिस्प्लेचे रंगसुद्धा चांगले आहेत. मात्र व्हिडियो बघताना ह्याची डिस्प्ले थोडी फिक्की दिसते. वेगवेगळ्या व्ह्यूविंग अँगल्समध्ये ह्याच्या रंगांमध्येसुद्धा थोडा बदल पाहायला मिळतो.

जसे की ह्याआधीही सांगितले होते की, ह्या स्मार्टफोनची सर्वात मोठी कमी ह्याचे Cyanogen मोड आहे.

युआय

काही लोकांच्या म्हणण्यानुसार, ह्या सॉफ्टवेअरला बदलले जाऊ सकते, मात्र ह्याला ह्याची सर्वात मोठी

कमकुवत बाजू असे बोलता येणार नाही, तथापि, ह्याचा वेगळा सॉफ्टवेअर अनेक बग्समध्ये येतो. ह्याच्या सॉफ्टवेअरमध्ये अनेक दोष आहेत, ज्यामुळे आपल्याला हा स्मार्टफोन वापरताना अनेक समस्याचा सामना करावा लागेल.

ह्या स्मार्टफोनमध्ये काही गोष्टी सेटअप करतेवेळी हा दोन वेळा हँग झाला, ज्यानंतर ह्याला रिस्टार्ट करावे लागले. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमधील आडव्या आणि उभ्या मोड्ससुद्धा ओळखता आल्या नाही आणि त्या ठिक करण्यासाठी स्मार्टफोन रिस्टार्ट करावा लागला.

फिंगरप्रिंट सेंसर

ह्या स्मार्टफोनला मागच्या बाजूला फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. तथापि, ८०% तरी ह्या स्मार्टफोनने माझे फिंगरप्रिंट्ससुद्धा ओळखता आले नाही. हा या स्मार्टफोनच्या सॉफ्टवेअरची कमी दाखवतो.

अराउंड यू

अराउंड यू एक चांगली गोष्ट आहे. ह्याच्या द्वारे फूड, कॅब्स, फ्लाइट्स आणि इतर अनेक खास वस्तू बुक केले जाऊ शकतात. असेच काहीसे आपल्याला नेक्सस फोन्समध्ये गुगल नाऊ, HTC मध्ये ब्लिंकफीड. वनप्लसमध्ये शेल्फ स्क्रीनमध्ये पाहायला मिळते.  

तथापि, ह्या अराऊंड यूू सर्विसमध्ये अजून बरेच काही सामील केले गेले हव होते. सध्यातरी ह्या अॅपला आणखी विकसित करावे लागेल. मात्र तरीही हा आयफोनच्या 3D टचपेक्षा जास्त यूजफुल आहे.

कामगिरी

ह्या कामगिरीविषयी बोलायचे झाले तर, यू यूटोपियाची कामगिरी वनप्लस 2 स्मार्टफोनपेक्षा चांगली नाही. यू यूटोपिया स्मार्टफोनला व्यवस्थित ऑप्टीमाइज्ड केले गेले नाही. ह्याची कामगिरीसुद्धा चांगली नाही.

ह्या स्मार्टफोनवर गेम्स खेळताना अनेक बग्स समोर येता. ह्या स्मार्टफोनला वनप्लस 2 आणि हॉनर 7 सारखे व्यवस्थित ऑप्टीमाइज्ड केले गेले नाही. त्यामुुळे वनप्लस ह्या स्मार्टफोनपेक्षा चांगला आहे, तर हॉनर 7 जास्त शक्तिशाली नाही आहे, मात्र हा बराच स्थिर आहे.

ह्यात 4GB ची रॅम दिली आहे, जी व्यवस्थित मल्टीटास्किंग करते. मात्र ह्यात अनेक बग्स आहेत, तथापि ह्या बग्सला सॉफ्टवेअरला अपडेट करुन ठीक केले जाऊ शकते, मात्र हा फोन कोणी का खरेदी करेल, ज्यात अनेक बग्स आहेत.

बॅटरी

ह्या स्मार्टफोनमध्ये एक एव्हरेज बॅटरी दिली आहे. ह्यात 3000mAh ची बॅटरी आहे, जी ७ ते ८ तासांचा बॅकअप देते. तथापि, कमी वापरल्यानंतर ही १२ तासांपर्यंत चालेल. बॅटरीच्या दृष्टीने वनप्लस 2 ह्यापेक्षा चांगला आहे.

कॅमेरा

हया स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे, ह्यात २१ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला आहे. तथापि, तो थोडा धीम्या गतीने फोकस करतो. ह्याचा कॅमेरा शार्प इमेजेस घेतो आणि कमी प्रकाशात चांगले फोटो काढतो.

यूटोपिया वनप्लस 2 आणि हॉनर 7 हे तिन्हीही चांगले फोटो काढतात, मात्र वनप्लस 2 जलद गतीने फोकस करतो. यूटोपियाचा शटर रिस्पॉन्स वेळेला झिरो शटर मोडच्या माध्यमातून कमी केले जाऊ शकते.

हाउस ऑफ मार्ली लिटिल बर्ड इन-एअर हेडफोन्स

ह्या स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये हाउस ऑफ मार्ली लिटिल बर्ड इन-एअर हेडफोन्स मिळतात. हे हेडफोन कोणत्याही स्मार्टफोन्ससोबत मिळणा-या हेडफोन्सपेक्षा उत्कृष्ट आहेत. हे हेडफोन तुम्हाला नक्कीच आवडतील.

निष्कर्ष

तुम्ही असा फोन घेऊ इच्छिता ज्यात अनेक बग्स आहेत? ते पण ह्या आशेपोटी की, आपण ह्या बग्स आणि सॉफ्टवेअरच्या समस्यांना अपडेट करुन ठीक करु शकता. जर आपले उत्तर हो असेल, तर आपण यू यूटोपिया स्मार्टफोन घेऊ शकता. जर नाही तर वनप्लस 2 जास्त शक्तिशाली स्मार्टफोन आहे, तसेच हॉनर 7 सुद्धा चांगला आहे.

यू यूटोपिया Key Specs, Price and Launch Date

Price:
Release Date: 11 May 2017
Variant: 32GB
Market Status: Launched

Key Specs

 • Screen Size Screen Size
  5.2" (1440 x 2560)
 • Camera Camera
  21 | 8 MP
 • Memory Memory
  32 GB/4 GB
 • Battery Battery
  3000 mAh
logo
Prasid Banerjee

Trying to explain technology to my parents. Failing miserably.

Advertisements
Advertisements

यू यूटोपिया

Buy now on amazon ₹ 7310

यू यूटोपिया

Buy now on amazon ₹ 7310

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status