झोलो एरा 4K Review

ने Ashvani Kumar | अपडेट Mar 22 2016
झोलो एरा 4K Review
 • PROS
 • उत्कृष्ट डिस्प्ले
 • बॅटरी कामगिरी चांगली
 • गेमिंग केली जाऊ शकते
 • कॉल परफॉर्मन्स ठीकठाक
 • CONS
 • टच चांगला केला जाऊ शकत नाही
 • हेव्ही गेमिंगच्या दरम्यान फोन गरम होतो
 • व्ह्यूविंग अँगल्स म्हणावे तितके चांगले नाही.

निर्णय

कूलपॅडने भारतात आपला कूलपॅड नोट 3 आणि कूलपॅड नोट 3 लाइट लाँच केल्यानंतर 7K च्या सेगमेंटमध्ये इतर कोणताही टिकू शकला नाही. ह्या स्मार्टफोन्समध्ये खरेच खूप उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहे. ह्यात 3GB रॅम, 13MP कॅमेरा आणि उत्कृष्ट फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे. मात्र असे असतानाही झोलोने आपला एरा 4K स्मार्टफोन बाजारात आणला आहे. ह्याची किंमत 7K च्या आतच आहे, मात्र ह्यात ते सर्व फिचर्स नाही आहेत जे कूलपॅडच्या वरील दोन स्मार्टफोन्समध्ये सांगितले. मात्र जर आपल्याला उत्कृष्ट बॅटरी असलेला फोन घेऊ इच्छिता तर आपण झोलो एरा 4K घेऊ शकता. ह्यात 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

BUY झोलो एरा 4K
Price 6499

झोलो एरा 4K detailed review

डिझाईन आणि रचना
झोलो एरा 4K डिझाईन आणि रचना म्हणावी तितकी उत्कृष्ट नाही. कारण ह्या किंमतीत तुम्हाला ह्या सेगमेंटमध्ये उत्कृष्ट डिझाईन असलेले स्मार्टफोन्स मिळतील, जसे की कूलपॅड नोट 3 लाइटचे डिझाईन आहे. झोलो एरा 4K मध्ये उजव्या बाजूला पॉवर आणि वॉल्यूम रॉकर बटन दिसतात, जे कोणत्याही इतर फोन्सप्रमाणेच आहेत. ह्यात काही बदल करुन ह्याचे डिझाईन खास बनविण्याचा प्रयत्न नक्की केला गेला आहे. ह्या स्मार्टफोनला मॅट प्लॅस्टिक फिनिश दिली गेली आहे, जी खूप उत्कृष्ट आहे. मात्र ह्याच्या चारही बाजूंना एक चंदेरी रंगाची पट्टी दिसते, ज्यामुळे हा फोन थोडा चांगला दिसतो.


मी हा एक आठवडा वापरुन पाहिला, पण कोणीही मला असे सांगितले नाही की, हा फोन खूप चांगला आहे.ह्याच्यापेक्षा चांगल्या डिझाईनचे फोन्स आपल्याला 5000 रुपयापर्यंत मिळून जातात. ह्या स्मार्टफोनमध्ये चांगली डिस्प्ले दिली गेली आहे, ज्यात आपल्याला 1080p ची व्हिडियो चांगली दिसते. कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्याचा कॅमेरा उजव्या बाजूला वर देण्यात आला आहे आणि फ्लॅशही देण्यात आला आहे. स्पीकर ग्रील्स आहे त्या जागीच ठेवले आहेत. एकूणच ह्या फोनचे डिझाईन ठीक आहे, मात्र किंमतीच्या तुलनेत हा तितका वाईटही नाही.

 

डिस्प्ले आणि युआय

फोनचे डिझाईन म्हणावे तितके चांगले नाही, मात्र ह्याचा डिस्प्लेनेम मी प्रभावित झालो. फोन मी सर्व प्रकारच्या प्रकाशात पाहिला, तर हा जास्त आणि सरळ पडणा-या सूर्यप्रकाशातही ह्याचा डिस्प्ले चांगला दिसतो. स्मार्टफोनमध्ये 5 इंच 720x1280 रिझोल्युशनची डिस्प्ले दिली गेली आहे. तसेच ह्याची पिक्सेल तीव्रता 294ppi आहे.

 

ह्याच्या युआयविषयी बोलायचे झाले तर, हा वापरण्यास एकदम सोपा आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये एकदम सोपा UI आहे. मी ह्याआधी काही फोनचा युआय पाहिला होता, जो मला आवडला नाही, तसेच ते वापरण्यासही थोडे त्रासदायक होते. ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला अॅप्स शोधण्यासाठी सर्च बार दिला आहे. ज्यात तुम्ही अगदी सहजपणे अॅप्स शोधू शकता.


कामगिरी

फोनमध्ये आपल्याला 1Ghz क्वाड-कोर प्रोसेसर मिळत आहे, जो म्हणावा तितका चांगला नाही, कारण जर तुम्हाला एक परफॉर्मर स्मार्टफोन हवा असेल, तर हा स्मार्टफोन त्यासाठी योग्य नाही. ह्याची क्लॉक वेगसुद्धा कमी आहे. स्मार्टफोनमध्ये 2GB चे रॅम देण्यात आले आहे. मात्र तरीही गेमिंग दरम्यान हेव्ही गेमिंग खेळताना अनेक अडचणी येतात. त्यामुळ जर तुम्ही हेव्ही गेमचे चाहते असता, तर हा फोन तुमच्यासाठी बनलेला नाही. जर तुम्हाला ह्या किंमतीत उत्कृष्ट कामगिरी असलेला स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुम्ही कार्बन क्वाट्रो L50 HD घेऊ शकता.

 

 

xolo era 4k
Create bar charts

 

कॅमेरा आणि बॅटरी

फोटोग्राफीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 8MP चा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. झोलो एरा 4K स्मार्टफोनच्या कॅमे-यातून मी अनेक दिवस रात्र-दिवस फोटो काढले, मात्र ह्याचा कॅमेरा म्हणावा तितका चांगला नाही. सर्वसामान्य प्रकाशातच ह्याचा कॅमेरा ठिक आहे. मात्र कमी प्रकाशात ह्याचा कॅमेरा जास्त प्रभावशाली नाही. जर तुम्हाला ह्या बजेटमध्ये चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन घ्यायचा असेल तर आपण कार्बन क्वाट्रो L50 HD दिला आहे.

 

 

Xolo Era 4K (Image Samples)

 

झोलो एरा 4K च्या बॅटरीविषयी बोलायचे झाले तर, ह्याची USP च ह्याची बॅटरी आहे. स्मार्टफोनमध्ये 4000mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. जर आपण सर्वसाधारण वापर किंवा रोज वापर करत असाल, तसेच जास्त गेमिंग किंवा ब्राउझिंग करत नसाल तर ह्याची बॅटरी ५-७ तास चालते. ह्याचा टच थोडा चांगला नाही. ह्यावर अजून थोडे काम केले जाऊ शकते.

 

 

निष्कर्ष
कूलपॅडने भारतात आपला कूलपॅड नोट 3 आणि कूलपॅड नोट 3 लाइट लाँच केल्यानंतर 7K च्या सेगमेंटमध्ये इतर कोणताही टिकू शकला नाही. ह्या स्मार्टफोन्समध्ये खरेच खूप उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहे. ह्यात 3GB रॅम, 13MP कॅमेरा आणि उत्कृष्ट फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे. मात्र असे असतानाही झोलोने आपला एरा 4K स्मार्टफोन बाजारात आणला आहे. ह्याची किंमत 7K च्या आतच आहे, मात्र ह्यात ते सर्व फिचर्स नाही आहेत जे कूलपॅडच्या वरील दोन स्मार्टफोन्समध्ये सांगितले. मात्र जर आपल्याला उत्कृष्ट बॅटरी असलेला फोन घेऊ इच्छिता तर आपण झोलो एरा 4K घेऊ शकता. ह्यात 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

झोलो एरा 4K Key Specs, Price and Launch Date

Price: ₹6499
Release Date: 22 Mar 2016
Variant: 8GB
Market Status: Launched

Key Specs

 • Screen Size Screen Size
  5" (720 x 1280)
 • Camera Camera
  8 | 5 MP
 • Memory Memory
  8 GB/2 GB
 • Battery Battery
  4000 mAh
logo
Ashvani Kumar

Ashvani Kumar is Tech, Politics, and Sports lover.

Advertisements
Advertisements

झोलो एरा 4K

Price : ₹6499

झोलो एरा 4K

Price : ₹6499

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status