झिओमी Redmi Note 5 Pro Review

ने Hardik Singh | अपडेट Feb 22 2018
झिओमी Redmi Note 5 Pro Review
  • PROS
  • चांगल प्रदर्शन
  • चांगला कॅमेरा
  • मस्त बॅटरी लाइफ
  • चांगला डिस्प्ले
  • CONS
  • एंड्राइड 8.0 ओरियो नाही.
  • USB टाइप-C पण नाही.
  • डिजाइन अजून चांगली होऊ शकली असती.

निर्णय

Xiaomi Redmi Note 5 Pro 15 हजार रुपयांत मिळणारा आता पर्यंतचा सर्वात चांगला फोन आहे. याच प्रदर्शन चांगल आहे, याची बॅटरी दोन दिवस चालते यातील दोन्ही कॅमेरे चांगले चालतात. 
 

BUY झिओमी Redmi Note 5 Pro

झिओमी Redmi Note 5 Pro detailed review

काही वर्षांमध्ये शाओमी ने भारतीय बाजारत आपली एक चांगली ओळख बनवली आहे. आता कंपनी ने बाजारत आपला एक एकदम नवीन स्मार्टफोन Xiaomi Redmi Note 5 Pro सादर केला आहे. आम्ही काही दिवस वापरून याचा रिव्यू केला. चला तर बघुया हा क्या स्मार्टफोन 15 हजार रुपयांमध्ये तुमच्यासाठी कसा आहे. 


बनावट आणि डिजाइन: नवीन डिजाइन, पण काही प्रमाणात जुन्या फोन्स सारखीच आहे.

Redmi Note 4 च्या रुंदी मुळे काही लोकांना वापरताना त्रास होतो, पण आता कंपनी ने आपल्या नव्या फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेश्यो दिला आहे, ज्यामुळे आता यूजर्सना एक लांब पण कमी रुंदीचा डिस्प्ले मिळतो. Xiaomi Redmi Note 5 Pro मध्ये 5.99-इंचाचा 2160x1080 पिक्सल डिस्प्ले आहे. या फोन चे किनारे बारीक आहेत ज्यामुळे याची डिजाइन चांगली वाटते. या फोन मध्ये कर्व्ड बॅक देण्यात आली आहे. ज्यामुळे हा सहज पकडता येतो. हा त्याच मटेरियल ने बनला आहे ज्याने MiA1 बनला आहे. Xiaomi Redmi Note 5 मध्ये अजूनही मेटल यूनिबॉडी नाही देण्यात आली. एंटेना बसविण्यासाठी यात टॉप आणि बॉटम ला प्लास्टिक चा वापर करण्यात आला आहे. 

फोन मधील डुअल रियर कॅमेरा पण बंप सह येतो. हा उठाव दिसून येतो. फ्लॅश दोन कॅमेरा च्या मध्ये बसविण्यात आला आहे.

डिस्प्ले आणि यूआई: काही कमी नाही, पण ओरियो असता तर उत्तम.

डिवाइस मधील 18:9 की डिस्प्ले याला अजून दिलचस्प बनवतो. जर आपण शाओमी च्या अन्य डिवाइसेज पाहीले तर 5.99 इंचाचा डिस्प्ले तेवढाच चांगला आहे. शाओमी अजूनही IPS LCD पॅनल वापरते जे चांगले व्यू एंगल्स आणि कलर प्रोड्यूस करतात. साधारण पणे कलर तेवढे जास्त रिलाएबल नाहीत, डिस्प्ले वार्म टोन ऑफर करतो जो रोजच्या वापरासाठी चांगला आहे. टच रिस्पोंस च्याबाबती आमची काही तक्रार नाही पण, शाओमी ने स्पष्ट नाही केले की Redmi Note 5 Pro ला सुरक्षेसाठी गोरिला ग्लास प्रोटेक्शन आहे की नाही. असं दिसतय की कोणतीतरी कठीण काच आहे पण ही लेटेस्ट गोरिला ग्लास प्रोटेक्टिव वाटत नाही. 

MIUI मागच्या वर्षांप्रमाणे यंदाही तेवढाच कलरफुल वाटत आहे. यात तुम्हाला एंड्राइड ओरियो नाही मिळत. कुठे ना कुठे तरी ऑपरेटिंग सिस्टम चे लेटेस्ट वर्जन नसणे निराशाजनक आहे. या व्यतिरिक्त, शाओमी ने काही दिवसांपूर्वी केलेल्या एका पोल वरून कळले की ग्राहकांना फक्त लेटेस्ट एंड्राइड नाही तर MIUI ऐवजी एंड्राइड स्टॉक वर्जन हवा आहे. पण हा पोल कंपनी ने हटवला. 

Note 5 Pro स्मार्टफोन मध्ये MIUI9 काही डुअल अॅप्स आणि काही अतिरिक्त स्पेस देण्याचा प्रयत्न करतो. डुअल अॅप्स मुळे, यूजर एक अॅप मध्ये जनरल अकाउंट आणि एक मध्ये आपलं पर्सनल अकाउंट मॅनेज करू शकतो. जसा एक कामासाठी आणि एक घरासाठी. दोन्ही सेटिंग्स मेनू मध्ये उपलब्ध आहेत. यासोबतच तुम्हाला काही प्रीलोडेड अॅप्स पण मिळतात, माइक्रोसॉफ्ट अॅप्स, फेसबुक, अमेजॉन, मिन्त्रा आणि अमेजॉन प्राइम वीडियो अॅप इत्यादी. सोबतच यूजर्सना अतिरिक्त टूल्स (कॅलकुलेटर, क्लॉक, फाइल मॅनेजर इ.) पण मिळतात. शाओमी चा स्वतःचा अॅप स्टोर पण यात आहे. गूगल प्ले स्टोर असल्यामुळे शाओमी चा अॅप स्टोर निरुपयोगी ठरतो.  

या UI ला चांगली बॅटरी लाइफ देण्यासाठी बनवण्यात आले आहे आणि याची ब्राइटनेस गरजेपेक्षा जरा कमी आहे. पण हा चांगला चालतो आणि आम्ही यातच खुश आहोत. 

परफॉर्मेंस 

आधी सांगितल्याप्रमाणे, फोनचे मुख्य फीचर नवीन चिपसेट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 आहे. शाओमी ने सांगितले की हा Redmi Note 3 ची जागा घेईल, ज्याला स्नॅपड्रॅगन 650 मुळे खुप रिव्यु मिळाले. शाओमी पुन्हा तेच यश मिळवू इच्छित आहे आणि कंपनी नुसार ते त्यांच्या Mi फॅन्स चे ऐकत आहेत आणि म्हणूनच हा फोन उपलब्ध झाला आहे. 14nm प्रोसेस वर बनवलेला हा फोन SD636 एट Kryo 260 कोर्स चा वापर करतो जो 1.8GHz वर क्लॉक आहे आणि खूपच चांगल्या पद्धतीने स्नॅपड्रॅगन 660 मेळ खातो जो याच Kryo 260 कोर उपयोग करतो जो 2.2GHz वर क्लॉक आहे. क्वालकॉम चा दावा आहे की Kryo 260 स्नॅपड्रॅगन 630 जो एट ARM A53 कोर्स वर आधारित आहे, याच्यापेक्षा 40% पर्यंत चांगली परफॉरमेंस देतो. एड्रेनो 509 GPU सह Redmi Note 5 Pro या किंमतीच्या सर्व फोन्स पेक्षा उत्तम ठरतो. 

रोजच्या टास्क साठी हा फोन सध्यातरी या किंमतीत मिळणार्‍या फोन्सना मात देतो. मग गेम्स लोड करणे असो वा मल्टीप्ल अॅप्स उघडणे असो वा मग हेवी अॅप्स आणि गेम्स मध्ये स्विच करणे. पण फोन मधील सर्व अॅप्स उघडल्यावर पण हा फोन थांबला नाही. हा फोन आपल्या प्रतिस्पर्धी फोन्सच्या पुढे स्लो नाही वाटला. याच्या लिमिट पार केल्या नंतर कदाचित हा स्लो होऊ शकतो. जर तुम्हाला फ्लॅगशिप फोंस वापरण्याची सवय असल्यास हा फोन स्लो वाटेल नाहीतर तुम्ही याच्या परफॉरमेंस ने खुश राहाल. 

फोन बद्दल चांगली गोष्ट ही की फोन मध्ये एक तास गेम खेळल्यावर पण हा खुप कमी गरम होतो. शाओमी नुसार या फोन मध्ये सिंगल पायरोलायिटिक ग्रेफाइट शीट आहे जी 1 डिग्री सेल्शियस पर्यंत तापमान कमी करते. फोन ची ऑडियो क्वालिटी 25 हजार च्या अतिल अन्य फोंस प्रमाणे चांगली आहे. 

बॅटरी लाइफ: दोन दिवस चालू शकते.  

आधी सांगितल्याप्रमाणे डिवाइसचा UI गरजेपेक्षा कमी ब्राइटनेस ऑफर देतो आणि बॅटरी लाइफ वाचवतो. फोन मधील  4000mAh बॅटरी आणि पॉवर एफ़िशिएन्ट SoC चा मेळ आरामात तुम्हाला दोन दिवसांची बॅटरी लाइफ देतो बॅटरी एका दिवसात संपत नाही आम्ही दोन तास इंजस्टिस 2 गेम्स हेडफोन ऑन केला आणि प्ले केला आणि बैकग्राउंड मध्ये अनेक अॅप्स चालवले ज्याने बॅटरी संपेल. दोन तास असे करुनही बॅटरी फक्त 20% कमी झाली. हेवी गेमिंग सह 9-10 तास बॅटरी लाइफ देईल. आम्हाला Redmi Note 4 ची बॅटरी लाइफ आवडलेली आणि आता Note 5 Pro ची परफॉरमेंस पाहता याची बॅटरी लाइफ अजूनच आवडली आहे. 

कॅमरा: बेस्ट न्यू

अस वाटतय की शाओमी आपल्या Mi फॅन्स ना ऐकत नाही आहे, पण मागच्या वर्षी कॅमेरा बद्दल मिळालेल्या फीडबॅक वर कंपनीने लक्ष दिले आहे. नवीन डुअल कॅमेरा सेटअप आपल्या मागच्या फोंस पेक्षा चांगला आहे. तुम्हाला 12MP चा प्राइमरी कॅमेरा (सोनी IMX486) मिळत आहे. जो 1.25um साइज च्या  सेंसर आणि f/2.2 अपर्चर सह येतो. दूसरा 5MP कैमरा डेप्थ सेंसिंग साठी असून त्याची सेंसर साइज 1.12um आहे आणि अपर्चर f/2.0 आहे.

चांगल्या लाइट कंडीशन मध्ये कॅमेरा उत्तम डिटेल्स कॅप्चर करतो आणि उत्कृष्ट कलर रिप्रोड्यूस करतो. कलर रिप्रोडक्शन थोडा जास्त वाढले आहे पण खुप वेगळा नाही आहे एखाद्या सामान्य यूजरला आवडेल. कमी प्रकाशात घेतलेल्या फोटो ची सक्षमता बरोबर आहे आणि कॅमेरा मध्ये चांगली डायनामिक रेंज आहे. कमी प्रकाशात घेतलेला फोटो पण चांगले  डिटेल्स कॅप्चर करतो. हा Mi A1 सारखा चांगला कॅमेरा आहे आणि काही जागी हा Mi A1 ला पण मात देतो. 

मागे असलेला सेकेंडरी कॅमेरा ऑप्टिकल झूम देत नाही, त्याचे मुख्य काम डेप्थ सेंसिंग आहे. हा इमेज क्वालिटी वाढवण्यासाठी मदत करतो आणि उत्तम सब्जेक्ट सेपरेशन देतो. आतापर्यंत आम्ही घेतलेल्या फोटो मध्ये या फोन ने घेतलेले पोर्ट्रेट फोटो याच्या प्रतिस्पर्धी पेक्षा चांगले आहेत. या फोटो मध्ये डिटेल्स आहेत आणि किंमत पाहता बैकग्राउंड ब्लर खूप चांगला आहे. आम्हाला याची एक गोष्ट चांगली वाटली की पोर्ट्रेट मॉड मध्ये ब्यूटीफाई सेटिंग्स नाही, ज्यामुळे तुम्हाला नैचुरल पोर्ट्रेट्स मिळतील.

कॅमेरा क्वालिटी नुसार फोन चा वीडियो मॉड निराशाजनक आहे. 1080p वीडियो प्रोड्यूस करण्यासाठी 8.3MP पर्यंत वीडियो क्रॉप करावा लागेल, जो फोन ने शूट करण्यात येणारा अधिकतम रेज़ोल्यूशन आहे आणि वीडियो क्वालिटी पण चांगली नाही. हा फोन 30fps पेक्षा जास्त शूट नाही करू शकत, जरी SD636, 30fps वर 4K अल्ट्रा HD पर्यंत शूट करण्यासाठी सक्षम असला आणि 120fps वर 1080p वीडियोज शूट करू शकतो.

समोरच्या बाजूस  20MP IMX376 सेंसर आहे जो सर्व लाइटिंग कंडीशन मध्ये चांगले फोटो घेतो. या डिवाइस मध्ये एक फ्रंट-फेसिंग फ्लॅश आहे. तुम्हाला सॉफ्टवेयर आधारित पोर्ट्रेट फोटो पण मिळतो ज्यातून तुम्ही ब्लर बॅकग्राउंड सह बोकेह फोटो घेऊ शकता. हे फोटो चांगले आहेत पण इतके खास नाहीत जितके तुम्ही रियर कॅमेरा ने घेऊ शकता. 

 

बॉटमलाइन

Xiaomi Redmi Note 5 Pro या सेगमेंट चा नवा राजा आहे हा परफॉरमेंस (स्पीड) हा चांगल्या बॅटरी लाइफ चा मेळ आहे. याचा डिस्प्ले चांगला आहे आणि रियर तसेच फ्रंट कॅमेरा पण चांगला आहे. आम्हाला अस वाटतय की शाओमी ने हा फोन एंड्राइड 8.0 आणि USB टाइप-C सह सादर केला पाहीजे होता. शाओमी चा दावा आहे कंपनी देशात नंबर 1 स्मार्टफोन ब्रैंड आहे मग इथे काही एक्शन का नाही? 

Xiaomi Redmi Note 5 Pro एक विजेता आहे आणि यावर्षी येणार्‍या सर्व मिड-रेंज स्मार्टफोंस चे मायाने ठरणारा आहे. हा एक बेस्ट फोन आहे जो तुम्ही विकत घेऊ शकता.

logo
Hardik Singh

Light at the top, this odd looking creature lives under the heavy medication of video games.

Advertisements
Advertisements

झिओमी Redmi Note 5 Pro

झिओमी Redmi Note 5 Pro

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status