झिओमी Redmi Note 5 4GB Review

ने Subhrojit Mallick | अपडेट Feb 22 2018
झिओमी Redmi Note 5 4GB Review
DIGIT RATING
76 /100
 • design

  76

 • performance

  80

 • value for money

  76

 • features

  71

 • PROS
 • चांगली बॅटरी लाइफ
 • ब्राइट 18:9 डिस्प्ले
 • चांगला कॅमेरा
 • CONS
 • जुना डिजाइन
 • एंड्रॉयड 7.1.2 नूगा
 • हार्डवेयर पण जुने आहे

निर्णय


स्पेसिफिकेशन पाहता Redmi Note 5 स्मार्टफोन हा ब्राइट आणि 18:9 एस्पेक्ट रेशियो च्या मोठ्या डिस्प्ले सह नवीन Redmi Note 4 आहे असे बोलू शकतो. हार्डवेयर एक सारखं असुनही Redmi Note ची किंमत कमी असणे म्हणजेच तेच हार्डवेयर आता अधिक किफायती झाले आहे. 

BUY झिओमी Redmi Note 5 4GB
Buy now on amazon उपलब्द 12999
Buy now on flipkart स्टॉक मध्ये नाही 8148

झिओमी Redmi Note 5 4GB detailed review

जेव्हा Redmi Note 4 लॉन्च केला गेला होता, तेव्हा मिड रेंड स्मार्टफोंस मध्ये इतके प्रतिस्पर्धा नव्हते आणि मागच्या वर्षी या सेगमेंट मध्ये निश्चित पणे शाओमी टॉप वर होती, पण आता स्पर्धा वाढली आहे आणि Honor 7X, Moto G5, Moto G5s सारखे स्मार्टफोंस जे स्टॉक एंड्रॉयड सह आले आहेत जे शाओमी MIUI च्या तुलनेने वेगवेगळे अनुभव देतात. 


शाओमी ने पण स्टॉक एंड्रॉयड ची लोकप्रियता पाहून स्टॉक एंड्रॉयड वाला Mi A1 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. काही दिवसांपूर्वी शाओमी ने सोशल मीडिया वर एक पोल घेतला होता, ज्यात यूजर्सना स्टॉक एंड्रॉयड आणि MIUI मधील एकाला निवडायचे होते, या पोल मध्ये पण MIUI मागे पडला आणि यूजर्सनी स्टॉक एंड्रॉयड ला पसंती दर्शवली. 

हे स्पष्ट आहे की मिड रेंज बाजारात शाओमी च्या एकाधिकारचा अंत होत आहे आणि आता कंपनी Redmi Note 5 च्या रुपात नवीन डिवाइस घेऊन आली आहे. जो काही अपग्रेड सह Redmi Note 4 सारखा आहे. जुन्या हार्डवेयर सह पण हा एक बॅलेंस्ड डिवाइस आहे. फोन ची 4000 एमएएच ची बॅटरी खुप चांगली आहे आणि ही सिंगल चार्ज मध्ये खुप वेळ चालू शकते. चला तर मग जाणून घेऊया कि या डिवाइस मध्ये आणखीन काय काय नवीन आहे, सोबतच याच्या डिजाइन, कॅमेरा आणि परफॉर्मेंस बद्दल पण जाणून घेऊया. 


बिल्ड आणि डिजाइन


Redmi Note 5 स्मार्टफोन ला अपग्रेड वर्जन म्हणू शकतो, हा फोन 18:9 एस्पेक्ट रेशियो च्या मोठ्या डिस्प्ले सह येतो, पण हा बेजल-लेस डिवाइस नाही. फोन चा टॉप आणि बॉटम भाग बारीक आहे पण विस्तृत आहे. स्क्रीन चे कॉर्नर कर्व्ड आहेत, जे याला अजूनच सीमलेस बनवतात.

कॅमेरा बंप आणि रुंदी मधल्या फरका व्यतिरिक्त फोन च्या रियर पार्ट (बॅक-साइड) मध्ये याच्या जुन्या वर्जन च्या तुलनेत जास्त बदल नाही. रियर-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आता पण सर्वात चांगल्या पोजीशन मध्ये आहे, तर डायमंड कट लाइंस याला प्रीमियम लुक देतात.


Can you tell them apart?


Redmi Note 5 स्मार्टफोन ची बॉडी मेटल आणि प्लास्टिक च्या कॉम्बिनेशन ने बनली आहे. फोनचा टॉप आणि बॉटम भाग, जिथे एंटीना आहे तो भाग प्लास्टिक चा आहे, पण बाकी पूर्ण भाग मेटल चा आहे. यामुळे फक्त सेल्यूलर कनेक्टिविटी नाही तर ड्यूरेब्लिटी मध्ये पण सुधार येतो.

डिजाइन मध्ये एक समग्र समरूपता आहे, खालच्या बाजूस दिलेले स्पीकर ग्रिल ला मुख्य माइक्रोफोन साठी दुसर्‍या ग्रिल सोबत जोडण्यात आले आहे. डिवाइस च्या बॅक साइड मध्ये कॅमेरा यूनिट आणि फिंगरप्रिंट सेंसर आहे, वरच्या बाजूस 3.5mm हेडफोन जॅक आहे. Redmi Note 5 ला 4 कलर वेरियंट मध्ये सादर करण्यात आले आहे, ब्लॅक, गोल्ड, रोज गोल्ड आणि ब्लू.
 

डिस्प्ले : शार्प एंड ब्राइट


Redmi Note 5 मिड रेंज मध्ये मोठ्या डिस्प्ले सह येतो. या स्मार्टफोन मध्ये 5.99 इंचाचा फुल HD+ (2160x1080 पिक्सल) IPS LCD डिस्प्ले आहे. सोबतच या फोन चा डिस्प्ले 18:9 एस्पेक्ट रेश्यो सह येतो. जरी या रेंज मध्ये उपलब्ध 18:9 डिस्प्ले वाला हा पहिला फोन नसला, तरी निश्चित पणे हा फोन एका चांगल्या लुक सह उपलब्ध आहे. 570 निट्स सह या फोन चा डिस्प्ले ब्राइटनेस च्या बाबतीत खुप चांगला आहे. या बरोबरच यात शाओमी चा सिग्नेचर वार्म टोन्स, डीप कंट्रास्ट पण आहे, सूर्यप्रकाशात फोन च्या डिस्प्ले चा ब्राइटनेस जास्त लागतो. या फोन मध्ये वार्म, स्टँडर्ड आणि कूल तीन कलर मोड आहेत आणि 2 कंट्रास्ट मोड आहेत. स्टँडर्ड मोड मध्ये कलर जास्त चांगले दिसतात. यात निफ्टी रीडिंग मोड पण आहे. 
 

कॅमेरा 


मोठ्या पिक्सेल आकार आणि कमी एपर्चर च्या संयोजनला कमी स्पिलेज सह व्यक्तिगत पिक्सल मध्ये फिट करण्यासाठी अधिक प्रकाशाची परवनगी मिळते. ज्यामुळे चांगल्या डिटेल सह डायनेमिक रेंज आणि कंट्रास्ट मध्ये सुधार होतो. 
पण, ही शाओमी ची सर्वात चांगली पेशकश नाही मोठा रेडमी नोट 5 प्रो एका चांगल्या कॅमेरा सह येतो. जो ड्यूअल कॅमेरा सह येतो. 

Redmi Note 5 चा कॅमेरा याच्या जुन्या वर्जन च्या तुलनेत चांगला आहे पण उत्तम नाही. हा सुधार तसाच आहे जसा तुम्ही डिवाइस च्या एका जेनरेशन पेक्षा पुढच्या जेनरेशन मध्ये असण्याची अपेक्षा करता. Redmi Note 5 मध्ये नवीन कॅमेरा हार्डवेयर 12 मेगापिक्सल सेंसर च्या रुपात येतो, जो 1.25um पिक्सल आणि f/2.2 अपर्चर सह येतो. मोठ्या पिक्सेल आकार आणि कमी एपर्चर च्या संयोजनला कमी स्पिलेज सह व्यक्तिगत पिक्सल मध्ये फिट करण्यासाठी अधिक प्रकाशाची परवनगी मिळते. ज्यामुळे चांगल्या डिटेल सह डायनेमिक रेंज आणि कंट्रास्ट मध्ये सुधार होतो.

कॅमेरा अॅप


या फोन मध्ये अनेक मोड आहेत आणि विशेष म्हणजे यांचा वापर सोप्पा आहे. पण अॅप च्या सेटिंग मेन्यू ला शोधणे थोडे कठीण आहे. हा 'ऑप्शन' मेन्यू च्या आत लपला आहे, पण एकदा का हा मिळाला की तुम्ही फोटोज मध्ये कंट्रास्ट, सॅचुरेशन आणि शार्पनेश एडजस्ट करू शकाल, तसेच 18: 9 पर्यंत एस्पेक्ट रेश्यो पण बदलू शकाल. प्रो मोड मध्ये तुम्ही फक्त व्हाइट बैलेंस आणि ISO सेटिंग्स ला वाढवू शकता. शटर स्पीड मध्ये एडजस्टमेंट चा ऑप्शन एक अजून चांगली बाब आहे.   
 

व्हाइट बॅलेंस एंड मॅक्रो

फोन सोबत काही वेळ घालवल्या नंतर मला कळले की याचा इमेज सेंसर खुप संवेदनशील आहे. फोटो फ्रेम करण्यात थोडा बदल करताच हा फोन व्हाइट बॅलेंस एडजस्ट करण्यात क्विक आहे. सोबतच तुम्हाला चांगला आणि डिटेल रिप्रोडक्शन बघायला मिळेल आणि हे काम 1.25um पिक्सल साइज च्या सेंसर चे आहे. पण डेफ्थ फील्ड डुअल कॅमेरा प्रमाणे आउटपुट नाही देत, पण तरीही कौतुकास्पद आहे. 
 


A slight change in framing throws the white balance off completely

 

इनडोर लाइट


Redmi Note 5 मधील कॅमेरा हाय कंट्रास्ट वाला आहे. हा एक लाइट सोर्स सह इनडोर शॉट्स घेताना चांगला परफॉर्म करतो. कॅमेरा फ्रेम चे किनारे डार्क करतो. 
 

HDR एंड आउटडोर लँडस्केप


Shot without HDR


Shot with HDR on


डायनेमिक रेंज बद्दल बोललो तर Redmi Note 5 बेस्ट नाही, पण हा निश्चित पणे अन्य काही डिवाइसेस पेक्षा उत्तम आहे. HDR डिफॉल्ट रित्या बंद असतो, पण एकदा तुम्ही याला ऑन केले तर तुम्ही बदल पाहू शकता. सूर्याच्या डायरेक्ट प्रकाशात वार्म फोटो येतात. 

 

लो लाइट

While the sensor takes in more light, details are missing and outcome is noisy


लो लाइट मध्ये Redmi Note 5 ने घेतलेले फोटो तसेच असतात जसे बाकी मिड रेंज च्या फोंस ने घेतलेले फोटो असतात. लो लाइट मध्ये फोकस कमी होतो, नॉइजी होतो, सोबत शार्पनेश आणि डिटेलींग कमी होते. 
 

फिल्टर्स


Shot with Tunnel Filter on


फिल्टर्स कॅमेरा अॅप च्या आत लपुन आहेत. फिल्टर मेन्यू मध्ये काही चांगले फीचर्स आहेत, जे लोकांना आवडतील. फिल्टर च्या शेवटा पर्यंत स्क्रॉल केल्यास तुम्हाला ‘टनल’ आप्शन मिळेल, जो फोटोला रॅप्ड इफेक्ट देतो.


Shot wih BW filter on


विशेष म्हणजे फोन मधील BW फिल्टर खुप चांगला आहे आणि याचा वापर करून काही चांगले आणि सुंदर दृश्य कॅप्चर करणे सोप्पे होते. 
 

फ्रंट कैमरा

Left: Front Camera with flash off   Right: Front Camera with flash on


जर तुम्ही सेल्फी चे शौकीन असाल, तर तुमच्या साठी या स्मार्टफोन ऐवजी Redmi Note 5 Pro एक चांगला ऑप्शन ठरेल. या फोनचा फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सेल चा आहे, ज्यात ब्यूटी मोड आहे. हा फ्रंट फेसिंग फ्लॅश सह येतो, पण जर तुम्ही लो लाइट मध्ये सेल्फी घेतली, तर हा फ्लॅश जास्त प्रभाव दाखवत नाही. 
 

परफॉर्मेंस


Redmi Note 5 चा इंटरनल हार्डवेयर याच्या जुन्या वर्जन प्रमाणे आहे. या डिवाइस मध्ये पण शाओमीच्या आवडीच्या स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट चा वापर झाला आहे. Redmi Note 5 3GB आणि 4GB रॅम च्या 2 वेरियंट मध्ये उपलब्ध आहे. 3GB रॅम सह 32GB स्टोरेज आणि 4GB रॅम सह 64GB स्टोरेज मिळते. फोन ची परफॉर्मेंस चांगली आहे असे बोलू शकतो, अॅप्स डाउनलोड होण्यास जास्त वेळ लागत नाही आणि गेम्स खेळताना हा डिवाइस स्लो नाही होत. 

सॉफ्टवेयर: न्यू इंटरफेस, जुना एंड्रॉयड


शाओमी च्या MIUI ने आपल्या साठी एक जागा बनवली आहे एक तर तुम्हाला हा आवडेल किंवा नाही आवडणार, दोन्हीचे करणे वेगवेगळी आहेत. इंटरफेस तेज आणि निफ्टी सुविधांसह येतो पण हा एंड्रॉयड च्या लेटेस्ट वर्जन वर चालत नाही आणि लवकर अपडेट मिळण्याची शक्यता पण नाही दिसत. Redmi Note 5 एंड्रॉयड 7.1.2 नूगा वर आधारित MIUI 9 वर चालतो, जो खुप निराश करतो कारण आता एंड्रॉयड ओरियो पण आला आहे. 

MIUI 9 नव्या F2FS फाइल स्टोरेज फॉर्मेट सह रियल-टाइम डीफ्रॅग्मेंटेशन आणि डायनेमिक रिसोर्स आणि अन्य गोष्टींसह येतो. हो MIUI 9 जुन्या वर्जन पेक्षा फास्ट आहे. 

Redmi Note 5 स्मार्टफोन MIUI 9 वर चालतो, जो काही प्री-इस्टॉल अॅप सह येतो. ह्यात एक Mi ड्रॉप आहे, जो शाओमी चा फाइल ट्रांसफर अॅप आहे. तुम्हाला एक डेडिकेटेड वीडियो प्लेयर, म्यूजिक ऐप, फोटो एडिटर आणि खुप काही मिळते. निफ्टी 'क्विक बॉल' फोन ला नेविगेट करण्याची नवी पद्धत देतो, तर डुअल इंस्टेन्स फोन वर एकाच अॅप चे 2 अकाउंट चालवण्याची मुभा देतो. या फोन मध्ये अमेजॉन शॉपिंग, WPS ऑफिस पण प्री-इंस्टॉल आहेत, पण तुम्हाला वाटल्यास तुम्ही अन-इंस्टॉल करू शकता. 

बैटरी लाइफ


Redmi Note 5 ची बॅटरी 4,000mAh ची आहे, जो चांगली बॅटरी लाइफ देतो. पण याच्या जुन्या वर्जन ची बॅटरी पण 4,000mAh ची होती. म्हणजेच हार्डवेयर सह फोनच्या बॅटरी मध्ये पण कोणताही बदल केला गेला नाही. पण डिवाइस ची बॅटरी लाइफ चांगली आहे, बॅटरी लवकर डिस्चार्ज होत नाही. तुम्ही आरामात या फोन ला सिंगल चार्ज मध्ये पूर्ण दिवस वापरू शकला आणि तरीपण बॅटरी वाचलेली असेल. जर तुम्ही जास्त पावरफुल आणि चांगल्या बॅटरी लाइफ वाला फोन घेऊ इच्छित असाल तर Redmi Note 5 निश्चितच एक अच्छा ऑप्शन आहे. 

Redmi Note 5 मध्ये माइक्रो USB पोर्ट पण जुना आहे, जो रेग्यूलर 5V/2A ला सपोर्ट करतो आणि 30 मिनिटांत फोनला 30% चार्ज करतो, म्हणजे हा फोन क्विक चार्जिंग सपोर्ट सह नाही येत. तुम्हाला फोनला फुल चार्ज करण्यासाठी कमीत कमी 2 तास लागतील. 

बॉटम लाइन

Redmi Note 5 मध्ये मोठा डिस्प्ले आणि ब्राइट कॅमेरा ऐवजी अजून काही महत्वपूर्ण बदल नाही. फोनचा हार्डवेयर, बॅटरी आणि डिजाइन Redmi Note 4 सारखीच आहे. जर तुम्ही Redmi Note 4 वापरत असाल तर Redmi Note 5 विकत घेण्यात काही अर्थ नाही. पण जर तुम्ही मिड रेंज मध्ये भरोसेमंद आणि चांगली बॅटरी वाला फोन शोधत असाल तर Redmi Note 5 निश्चितच तुमच्या साठी आहे. 
 

झिओमी Redmi Note 5 4GB Key Specs, Price and Launch Date

Price:
Release Date: 22 Feb 2018
Variant: 64GB
Market Status: Launched

Key Specs

 • Screen Size Screen Size
  5.99" (1080 x 2160)
 • Camera Camera
  12 | 5 MP
 • Memory Memory
  64 GB/4 GB
 • Battery Battery
  4000 mAh
Subhrojit Mallick
Subhrojit Mallick

Email Email Subhrojit Mallick

About Me: Eats smartphones for breakfast. Read More

Advertisements
Advertisements

झिओमी Redmi Note 5 4GB

झिओमी Redmi Note 5 4GB

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status