शाओमी रेडमी नोट 3 Review

ने Soham Raninga | अपडेट Mar 10 2016
शाओमी रेडमी नोट 3 Review
DIGIT RATING
85 /100
  • design

    78

  • performance

    90

  • value for money

    100

  • features

    81

User Rating : 4.3333333333333/5 Out of 6 Reviews
  • PROS
  • उत्कृष्ट कामगिरी
  • चांगली बॅटरी लाइफ
  • चांगली बिल्ड गुणवत्ता
  • CONS
  • कमी प्रकाशात सर्वसाधारण कामगिरी
  • अॅनड्रॉईड 6.0 MiUi वापरण्याऐवजी अॅनड्रॉईड 5.0 वापरला जाणे
  • NFC नाही आणि गोरिला ग्लास प्रोटेक्शन नसणे

निर्णय

शाओमी रेडमी नोट ३ ह्या किंमतीच्या सेगमेंट येणारा एक उत्कृष्ट स्मार्टफोन आहे, त्यामुळे जर तुम्ही ह्या किंमतीत उत्कृष्ट कामगिरी आणि बॅटरी लाइफ असलेला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, हा एक उत्तम आणि योग्य पर्याय आहे. कमी प्रकाशातील कॅमेरा कामगिरी आणि ह्यात मार्शमेलो बेस्ड असलेला MiUi अपेक्षा असताना ह्यात वापरण्यात आलेला अॅनड्रॉईड लॉलीपॉप बेस्ड MiUi 7 ही ह्याची पडती बाजू असण्याची शक्यता आहे.

BUY शाओमी रेडमी नोट 3
Buy now on amazon उपलब्द 6899
Buy now on flipkart स्टॉक मध्ये नाही 11999

शाओमी रेडमी नोट 3 detailed review

शाओमी रेडमी नोट 3 32GB: सविस्तर रिव्ह्यू


क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 650 ने सुसज्ज असलेल्या ११,९९९ रुपयाच्या किंमतीत मिळणारा शाओमी रेडमी नोट 3 म्हणजे एक आधुनिक युगाचा फोनच म्हणावा लागेल. ह्याची उत्कृष्ट कामगिरी आणि बॅटरी लाइफ ही दोन खास वैशिष्ट्ये पाहता ह्या सेगमेंटमध्ये येणा-या स्मार्टफोन्सला हा कडक टक्कर देणारा असून त्याचा पारडा जड आहे असेच म्हणावे लागेल. ठराविक काळानंतर शाओमीने इतक्या कमी किंमतीत उत्कृष्ट फीचर्स असलेला स्मार्टफोन आणला आहे, ही खरच कौतुकास्पद गोष्ट आहे. आम्ही येथे 3GB/32GB च्या प्रकारातील शाओमी रेडमी नोट 3 चा रिव्ह्यू केला आहे. पण तुम्हाला ह्याहून स्वस्त असलेला शाओमी रेडमी नोट 3 घ्यायचा असेल तर, तुम्ही 2GB/16GB ची नोट 3 घेऊ शकतात ज्याची किंमत आहे ९,९९९ रुपये,

 

शाओमी रेडमी नोट 3 ची ठळक वैशिष्ट्ये:

 

कामगिरी

आम्ही आमच्या बेंचमार्कमध्ये कामगिरीच्या दृष्टीने ह्याचे स्नॅपड्रॅगन 650 किती महत्त्वाचे आहे आणि ते कसे काम करते ते कळेल. ह्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची बॅटरी परफॉर्मन्ससुद्धा तेवढाच खास आहे. बेंचमार्कच्या दृष्टीकोनातून आम्ही ह्या सेगमेंटमधल्या अनेक स्मार्टफोन्सशी सलग तुलना केली पण सर्वच स्मार्टफोन्सनी आपले गुडघे टेकवले. आम्ही ह्यावर ५ मिनिटे UHD (2160p) व्हिडियो रेकॉर्डिंग केली, पण त्याला शाओमी रेडमी नोट 3 च्या डिफॉल्ट कॅमेरा अॅपवर सपोर्ट केले नाही. पण जेव्हा आम्ही ह्या गुगल कॅमेरा अॅपद्वारा UHD मध्ये रेकॉर्ड केला तर त्याने सपोर्ट केले. ह्यादरम्यान आम्हाला मोबाईल गरम होण्याची समस्या जाणवली नाही. .

Performance comparison chart:

 

Xiaomi Redmi Note 3
Create bar charts

 

बॅटरी लाइफ

ह्यात 4050mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही दिवसभर हेव्ही यूसेज करुनही दिवसाच्या शेवटी ह्याची १५ टक्के बॅटरी शिल्लक असते.

 

Xiaomi Redmi Note 3 battery test
Create bar charts

कॅमेरा
ह्या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा फेज डिटेक्शन AF कॅमेरा दिला आहे. ज्याने खूप चांगले फोटोज येत असले तरीही कमी प्रकाशात ह्यात येणारे फोटो म्हणावे तितके चांगले नाही. सर्वसामान्य प्रकाशात ह्याच्या कॅमे-यातून खूप चांगले फोटो येतात, रंगछटा आणि व्हाइट बॅलेंसच्या दृष्टिकोनातूनही ह्यात चांगले फोटोज येतात. पण कमी प्रकाशात विशेषत: इनडोअर प्रकाशात ह्यात चांगले फोटो येत नाही

 

 

View post on imgur.com

डिझाईन आणि रचना
शाओमी रेडमी नोट 3 मेटल बॉडीने बनविण्यात आला असून ह्याची मागील बाजू थोडी वक्र आहे. तसेच ती खूपच नाजूक आणि मॅट फिनिश आहे. ह्यात 5.5 इंचाची डिस्प्ले देण्यात आली असून ती हाताळण्यास खूपच छान आणि सोयीस्कर आहे. ह्याला आकर्षक अशी मेटल कडा आहे. पण  गोरिला ग्लासच्या चाहत्यांची निराशा होणारी गोष्ट म्हणजे ह्यात गोरिला ग्लास देण्यात आलेली नाही. ह्याची कामगिरी चांगली आहे, पण ह्याचा स्पर्श कोर्निंग गोरिल्ला ग्लाससारखा नाही. तसेच ह्याच्या मागील बाजूस स्पीकर्स देण्यात आले आहे.

तसेच कॅमेरा लेन्स, ड्यूल-टोन फ्लॅश आणि फिंगरप्रिंट सेंसर हे डिवाइसच्या वरच्या बाजूस देण्यात आले आहे. वॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटन उजव्या कडेला देण्यात आले आहे.

 
 

युआय

शाओमी रेडमी नोट 3 अॅनड्रॉईड लॉलीपॉप v5.1.1 MiUi 7 वर चालतो. ह्यात अॅनड्रॉईड मार्शमॅलो MiUi न दिला जाणे ही ह्याची सर्वात मोठी पडती बाजू आहे. जर ह्यात मार्शमॅलो MiUi दिला असता कामगिरी आणि बॅटरी लाइफ अजून उत्कृष्ट झाली असती. असो, पण ह्याची युआयची एकूणच कामगिरी उत्कृष्ट आहे. तसेच ह्यात 3GB रॅम देण्यात आल्यामुळे हेव्ही मल्टिटास्किंग करणे, गेम्स खेळणे खूप सोपे होते.

 

निष्कर्ष

शाओमी रेडमी नोट ३ ह्या किंमतीच्या सेगमेंट येणारा एक उत्कृष्ट स्मार्टफोन आहे, त्यामुळे जर तुम्ही ह्या किंमतीत उत्कृष्ट कामगिरी आणि बॅटरी लाइफ असलेला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, हा एक उत्तम आणि योग्य पर्याय आहे. कमी प्रकाशातील कॅमेरा कामगिरी आणि ह्यात मार्शमेलो बेस्ड असलेला MiUi अपेक्षा असताना ह्यात वापरण्यात आलेला अॅनड्रॉईड लॉलीपॉप बेस्ड MiUi 7 ही ह्याची पडती बाजू असण्याची शक्यता आहे.

शाओमी रेडमी नोट 3 Key Specs, Price and Launch Date

Price:
Release Date: 17 Jan 2017
Variant: 32GB
Market Status: Launched

Key Specs

  • Screen Size Screen Size
    5.5" (1080 x 1920)
  • Camera Camera
    16 | 5 MP
  • Memory Memory
    32 GB/3 GB
  • Battery Battery
    4050 mAh
logo
Soham Raninga

Chief Editor

Advertisements
Advertisements

शाओमी रेडमी नोट 3

शाओमी रेडमी नोट 3

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status