विवो V1 मॅक्स Review

ने Sameer Mitha | अपडेट Jan 12 2016
विवो V1 मॅक्स Review
DIGIT RATING
56 /100
 • design

  54

 • performance

  56

 • value for money

  49

 • features

  68

 • PROS
 • चांगला साउंड आऊटपुट
 • चांगली रचना
 • उत्कृष्ट युआय
 • CONS
 • पाहण्याचा कोन चांगला नाही
 • जास्त वापरल्यामुळे फोन तापण्याची समस्या निर्माण होते.

निर्णय

विवो V1 मॅक्स स्मार्टफोनची २० हजारांच्या किंमतीत असलेल्या स्मार्टफोन्सशी कडक संघर्ष होणार आहे. ह्याचा साउंड आउटपुट खूप चांगला आहे आणि एकूणच ह्याची कामगिरीसुद्धा साधारण आहे. आमच्या मते, तुम्हाला हा स्मार्टफोन घेण्याआधी बाजारात असलेल्या इतर स्मार्टफोन्सवर एक नजर टाकावी लागेल.

आातापर्यंत २० हजार रुपयाच्या किंमतीत येणारा हा एक चांगला स्मार्टफोन आहे, जो आपली कामे अगदी सहजपणे करतो. २० हजाराच्या किमतीत आपल्याला असे स्मार्टफोन्स मिळतील, ज्यात चांगला कॅमेरा असेल. चांगले फीचर्स असतील, बॅटरी लाइफसुद्धा चांगली असेल आणि हे कोणतेही अॅप चालवू शकतात. येथे आम्ही विवो V1 मॅक्स स्मार्टफोनचा रिव्ह्यू करत आहोत, हा स्मार्टफोन ह्या विभागात येणा-या स्मार्टफोन्सला टक्कर देऊ शकेल का, चला जाणून घेऊयात ह्याविषयी सविस्तर.

BUY विवो V1 मॅक्स
Buy now on amazon स्टॉक मध्ये नाही 6899
Buy now on flipkart स्टॉक मध्ये नाही 13000

विवो V1 मॅक्स detailed review

डिझाईन आणि रचना


ह्या स्मार्टफोनची रचना चांगली आहे. ह्याचा अॅडजेस कर्व्ह्ड आहे आणि हा स्मार्टफोन अगदी सहजपणे हातात पकडू शकतो. ह्यात पुढच्या बाजूस डिस्प्लेच्या खाली ३ बटन्स दिले गेले आहेत आणि डिस्प्लेच्या वरच्या बाजूस फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. फोनमध्ये उजव्या बाजूस पॉवर बटन आणि वॉल्यूम रॉकर दिला गेला आहे आणि डाव्या बाजूस सिम कार्ड ट्रे दिला आहे. खालच्या बाजूस मायक्रो-USB पोर्ट आणि वरच्या बाजूस 3.5mm चा हेडफोन जॅक दिला गेला आहे.

स्मार्टफोनच्या मागील बाजूबद्दल बोलायचे झाले तर, मागील बाजूस व्हाइट आणि गन मेटल ग्रे रंगाचा फिनिश दिली गेली आहे. विवोचा लोगो बरोबर मध्यभागी दिला गेला आहे. मागील बाजूला कॅमेरा आहे आणि तो योग्य त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही. फोटो घेताना अनेकदा तुमची बोटे कॅमे-यासमोर येतील. मागील बाजूस दोन स्पीकर दिले गेले आहेत.

थोडक्यात ह्याचे डिझाईन ठीक-ठाक आहे. ह्याचे डिझाईन फंक्शनल आहे.

डिस्प्ले आणि युआय

विवो V1 मॅक्समध्ये ५.५ इंचाची ७२० पिक्सेलची डिस्प्ले दिली गेली आहे. तथापि, ह्याच्या डिस्प्लेचा आकार मोठा आहे, मात्र ह्या स्मार्टफोनच्या डिझाईन आणि वजनामुळे ह्याला हातात घेऊन अगदी सहजपणे वापरु शकतो. ह्याची डिस्प्ले बरीच रेफ्लेक्टिव आहे. व्हिडिओ बघताना जर कमी लाइट्सचे सीन्स आले, तर काहीही स्पष्ट दिसत नाही. ह्याचे रिझोल्युशन ठीक नाही. तशी ह्याची डिस्प्ले एवढी वाईट नाही, मात्र ही मोटो X प्ले आणि आसुस झेनफोन २ पेक्षा चांगलीही नाही.

ह्याच्या युआयविषयी बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.0.2 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.त्याचबरोबर ह्यावर ओएस 2.1 सुद्धा आहे. ह्यात जो युआय दिला गेला आहे, तो आपण शाओमी, हॉनर 7 आणि इतर अनेक स्मार्टफोन्समध्ये पाहिला असेल. ह्यात एक खूप खास गोष्ट आहे ती म्हणजे, ह्यात एक ड्रॉप डाऊन मेनू दिला गेला आहे, जो की IOS सारखा आहे.

त्याचबरोबर विवो V1 मॅक्स स्मार्टफोनमध्ये इतरही फीचर्स आहेत, जसे की स्मार्ट मोशन, अॅप्स उघडण्यासाठी अल्फाबेट, एअर ऑपरेशन, फ्लॅश ऑन करण्यासाठी शेक आणि इतर अनेक फीचर्स. हे सर्व फीचर्स मेनूमध्ये दिले गेले आहे. ह्यातील काही उपयोगी आहे तर काही उपयोगी नाहीत.

थोडक्यात ह्याचा युआय थोडा वेगळा आहे. हा त्या लोकांना जरुर आवडेल ज्यांना प्रीलोडेड अॅप्स आवडतात आणि त्यांनाही ज्यांंना प्रीलोडेड अॅप्स पसंत नाही.

कामगिरी

ह्या स्मार्टफोनच्या कामगिरीविषयी बोलायचे झाले तर, पहिल्या ह्याच्या तपशीलाविषयी बोलूयात. विवो V1 मॅक्समध्ये 5.5 इंचाचीन IPS LCD डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1280x720 पिक्सेल आहे. हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615 चिपसेट आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो. हा १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमे-याने सुसज्ज आहे. ह्यात FM रेडियो आणि 2720mAh ची बॅटरी दिली गेली आहे.

गेमिंगविषयी बोलायचे झाले तर, ह्यात गेम्स अगदी सहजपणे खेळता येऊ शकतात. मात्र उच्च स्तरावर आवाज केल्यास ह्याचा आवाज खूप मोठ्याने ऐकायला येतो. बेस्ट आउटपुटसाठी आपल्याला ह्याचा आवाज कमी करावा लागेल. २० मिनिट गेम खेळल्यास हा स्मार्टफोन गरम होतो, जी चांगली गोष्ट नाही.

ह्या स्मार्टफोनची ऑडियो परफॉर्मन्स चांगली आहे. मूव्हीज आणि व्हिडियो पाहण्याचा अनुभव चांगला आहे. मात्र ह्याचे व्हयुविंग अँगल्स चांगले नाही. मात्र काही काही अँगल्सने ह्याचे व्ह्युविंग अँगल्स चांगले आहेत. मात्र अँगल्स बदलल्यावर ह्याचे रंगसुद्धा बदलतात.

ह्याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनचा कॅमेरा ठीकठाक आहे. ह्यातून काढलेले अगदी सहजपणे सोशल मिडियावर पब्लिश करु शकतात, मात्र कमी प्रकाशात ह्यातून घेतलेले फोटो आपल्याला आवडणार नाही.

ह्या स्मार्टफोनच्या बॅटरीविषयी बोलायचे झाले तर, गीकबेंच बॅटरी टेस्टमध्ये ही बॅटरी ४.५ तासापर्यंत चालेल, जे की साधारण आहे. सर्वसामान्य वापरावर स्मार्टफोनची बॅटरी आपला संपुर्ण दिवस काढेल.

निष्कर्ष

जर आपण २० हजार रुपयाच्या किमतीत स्मार्टफोन घेऊ इच्छिता, तर बाजारात आपल्याला अनेक चांगले पर्याय मिळतील. विवो V1 मॅक्सचे वैशिष्ट्य म्हणजे ह्याचा ऑडियो आणि ह्याचा आकर्षक युआय. मात्र ह्याची डिस्प्ले चांगली नाही आणि ह्याची 16GB चे अंतर्गत स्टोरेज बरेच कमी आहे. जर आपण मार्केटमध्ये २० हजाराच्या किमतीत चांगला स्मार्टफोन घेऊ इच्छिता तर आपण आसूस झेनफोन 2(4GB रॅम), मोटो X प्ले आणि मिजू MX5, वनप्लस X ला घेण्याचा विचार करु शकता.

विवो V1 मॅक्स Key Specs, Price and Launch Date

Price:
Release Date: 15 May 2017
Variant: 16GB
Market Status: Launched

Key Specs

 • Screen Size Screen Size
  5.5" (720 x 1280)
 • Camera Camera
  13 | 5 MP
 • Memory Memory
  16 GB/2 GB
 • Battery Battery
  2720 mAh
logo
Sameer Mitha

Sameer Mitha lives for gaming and technology is his muse. When he isn’t busy playing with gadgets or video games he delves into the world of fantasy novels.

Advertisements
Advertisements

विवो V1 मॅक्स

Buy now on amazon ₹ 6899

विवो V1 मॅक्स

Buy now on amazon ₹ 6899

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status