90
71
80
68
सोनी एक्सपिरिया X मध्ये एक चांगली डिस्प्ले, चांगली रचना, आकर्षक कामगिरी आणि बॅटरी लाइफ आहे. मात्र हा फ्लॅगशीपचा दर्जा असलेला स्मार्टफोन नाही. जर तुम्ही 48,990 रुपयात स्मार्टफोन घेऊ इच्छिता, तर तुम्हाला ह्या किंमतीत बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहे.
सोनी एक्सपिरिया X ड्यूल सिम: Detailed Review
सोनीने MWC २०१६ मध्ये आपल्या नवीन फ्लॅगशिप सोनी एक्सपिरिया X विषयी घोषणा केली आणि त्यातील नवीन फीचर प्रिडिक्टिव हायब्रिड ऑटोफोकस (PHAF) पाहून सर्वच जण खूप उत्साही होते. आणि अखेरीस सोनीने ह्या स्मार्टफोनचा कॅमेरा आणखी उत्कृष्ट बनविण्याचे ठरवले. आणि आता कंपनीने दावा केला आहे की, ह्या स्मार्टफोनचा कॅमेरा आपल्याला DSLR कॅमे-यासारखा फोकस देईल.
त्याशिवाय कंपनीने ह्या फोनचे डिझाईन आणि ओव्हरऑल एर्गोनोमिक रचना पाहता, त्यात काही बदल केले आहेत. असे सांगितले जातय की, सोनी एक्सपिरिया X नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सारखा नाही.
कॅमेरा
सोनी एक्सपिरियामध्ये 23 मेगापिक्सेलचा कॅमेरा एक्समोर RS मोबाईल इमेजिंग सेंसर, त्याचबरोबर RGBW पिक्सेल, f/2.0 सोनी G लेन्स आणि जास्त फोकस पॉइंटसह प्रीडिक्टिव हायब्रिड ऑटोफोकस दिला आहे. ह्याचा मॉडल नंबर दिला गेला नाही. मात्र आशा आहे की, सोनी एक्सपिरिया Z5 मध्ये अपग्रेड केलेले असेल. ह्याची इमेज क्वालिटी खूपच चांगली आहे.
एक्सपिरिया मॅन्यु्अल शूटिंग अॅडजेस्टमेंट, त्याचबरोबर व्हाइट बॅलेंन्स, सेंसिव्हिटी आणि मल्टीपल मोडसह उपलब्ध आहे. ह्याच्या इमेज क्वालिटी बद्दल बोलायचे झाले तर, सोनी एक्सपिरिया X कलर्ससह चांगला बॅलेंस करतो. प्रिडिक्टिव हायब्रिड ऑटोफोकस फिचर स्मार्टफोनमध्ये नवीन फिचर जोडला आहे. ह्याच्या कॅमे-याचा फोकस म्हणावा तितका जलद नाही. ह्याचे शटर रिस्पॉन्स आणि प्रोसेसिंग तकलादू आहे. ही नवीन टेक्नॉलॉजी तेव्हा जास्त प्रभावशाली झाली असती, जेव्हा कॅमेरा, ऑप्टिकल इमेजसह असला असता. जो एक्सपिरिया X मध्ये नाही.
जास्त प्रकाशात ह्याचा कॅमेरा चांगला काम करतो. ह्याचे फोटो अॅप्पल आयफोन 6S प्लस आणि सॅमसंग गॅलेक्सी S7 एज सारखे येतात. कमी प्रकाशात एक्सपिरिया X चा कॅमेरा म्हणावा तितका चांगला नाही. सोनीने आपल्या नवीन फोनमध्ये कमी प्रकाशात जास्त काम करण्यासाठी १३ मेगापिक्सेलचा एक्समोर RS कॅमेरा मॉड्यूल दिला आङे. मात्र हा कुठे ना कुठे हा कॅमेरा फोकससाठी संघर्ष करतो.
डिझाईन आणि रचना
सोनीने आपल्या नवीन फ्लॅगशिपमध्ये आणखी एका भागात बदल करुन त्याच्या डिझाईन आणि रचनेवर फोकस केला आहे. जो त्याच्या कॅमे-यापेक्षा चांगला आहे. स्मार्टफोन्समध्ये 5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080x1920 पिक्सेल आहे. ह्याच्या उजव्या बाजूला फिंगरप्रिंट सेंसर पॉवर बटनसह दिला आहे. सोनी एक्सपिरिया XA आणि XA अल्ट्रा नीट पाहिलात तर त्यात काही बदल नक्की दिसेल.
तथापि, सोनीने आपल्या फ्लॅगशिप डिझाईनमध्ये बदल केले आहेत. सोनीने ह्यात स्मूथ अशा कर्व्ह्ड ग्लाससह कडांना मेटलचा वापर केला आहे. आणि ह्याची मागील बाजू मॅटची असल्यामुळे हा हातात घेण्यास सोपा जातो. मात्र ह्याचे पॉवर बटन दाबल्यास थोडे कष्ट घ्यावे लागतात.
डिस्प्ले आणि UI
एक्सपिरिया X ची 5 इंचाची पुर्ण HD पॅनल स्पष्ट आणि आकर्षक आहे. ह्याचा डिस्प्ले खूप जास्त चांगला आहे. ह्याचा काळा आणि पांढरा शेड्स ह्याला आणखी चांगला लूक देतो. सोनी TRILUMINOS तंत्रज्ञानाचा प्रयोग करतो. ह्यात मूव्ही आणि गेम्स खेळताना ह्याचा डिस्प्ले चांगला अनुभव दतो. ह्याचा टचसुद्धा खूप चांगला आहे.
कामगिरी
एक्सपिरिया X मध्ये क्वालकॉम 650 प्रोसेसर आहे, एक्सपिरिया X स्मार्टफोनचे डायमेंशन 143.7x70.4x8.7mm आणि वजन 164 ग्रॅम आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 200GB पर्यंत वाढवले जाऊ शकते. ह्याचा गेमिंग परफॉर्मन्ससुद्धा चांगला आहे. फोनमध्ये गेम खेळताना फोनची कामगिरी खूप चांगली आहे. tttt
ह्याच्या ऑडियोविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये Hi-Res ऑडियो तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. सोनी एक्सपिरिया X चा अंतर्गत स्पीकर ह्याच्या दुस-या विभागात बेस्ट आहे.
बॅटरी
ह्यात 2620mAh ची बॅटरी दिली आहे. फोनची बॅटरी आमच्या बेंचमार्कमध्ये १० तास चालली. मात्र हा फोन पुर्ण दिवसभर चालू शकतो. एकूणच एक्सपिरिया X आपल्या किंमतीत इतर हँडसेटप्रमाणे चांगला फोन नाही. ४८,९९० रुपयात असा फोन घेणे आमच्या मते सोयीचे नाही.
निष्कर्ष
सोनी एक्सपिरिया X मध्ये एक चांगली डिस्प्ले, चांगली रचना, आकर्षक कामगिरी आणि बॅटरी लाइफ आहे. मात्र हा फ्लॅगशीपचा दर्जा असलेला स्मार्टफोन नाही. जर तुम्ही 48,990 रुपयात स्मार्टफोन घेऊ इच्छिता, तर तुम्हाला ह्या किंमतीत बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहे.
Price: |
![]() |
Release Date: | 15 May 2017 |
Variant: | 64GB |
Market Status: | Launched |
16 Dec 2019
11 Dec 2019
09 Dec 2019
28 Nov 2019
27 Nov 2019
05 Jul 2018
22 Feb 2018
22 Feb 2018
29 Jun 2016
20 Jun 2016
Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.
We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.