सॅमसंग गॅलेक्सी नोट ५ Review

ने Prasid Banerjee | अपडेट Oct 20 2015
सॅमसंग गॅलेक्सी नोट ५ Review
DIGIT RATING
81 /100
 • design

  82

 • performance

  87

 • value for money

  63

 • feature

  74

User Rating : 5/5 Out of 1 Reviews
 • PROS
 • कामगिरीत उत्कृष्ट
 • चांगला डिस्प्ले
 • चांगला कॅमेरा
 • चांगली बॅटरी लाईफ
 • CONS
 • गुळगुळीत आणि हातातून निसटणारा
 • वॉटरप्रूफ नाही

निर्णय

सॅमसंगने ह्यावर्षी गॅलेक्सी S6 सह सुरु केलेले परिवर्तन गॅलेक्सी नोट ५ आणून पुर्णत्वास नेले आहे. हा फोन पॉवर आणि डिझाईनचे मिश्रण आहे. तसेच हा दिसण्यास चांगला आणि उत्कृष्ट कामगिरी करणारा फोन आहे. ह्याबाबत कोणाचेही दुमत असणार नाही. फक्त एकच गोष्ट खटकते ती म्हणजे, ह्याच्या किंमतीच्या तुलनेत हा फोन खूपच निसरडा आणि हातातून पडणारा आहे. जर तुम्ही फ्लॅगशिप फॅबलेटच्या शोधात असाल तर, खरेदीसाठी हा अजून एक पर्याय आहे.


यावर्षी आम्ही सॅमसंगच्या ४ फ्लॅगशिप स्मार्टफोन्सपैकी ३ स्मार्टफोन्सचा आम्ही रिव्ह्यू दिला. मात्र इतर स्मार्टफोनची गॅलेक्सी नोट ५ शी तुलना केली तर, हा इतर डिव्हायसेसपेक्षा दीर्घकाळ टिकू शकतो असेच आम्ही सांगू.

BUY सॅमसंग गॅलेक्सी नोट ५
Buy now on amazon उपलब्द 59999
Buy now on flipkart स्टॉक मध्ये नाही 38900

सॅमसंग गॅलेक्सी नोट ५ detailed review

डिझाईन आणि रचना


 

 

सॅमसंग आपल्या फ्लॅगशिप फोनसोबत नेहमीप्रमाणे वापरत असलेली ग्लास आणि मेटल डिझाईनचे तत्वज्ञान नोट ५ मध्ये सुद्धा वापरले आहे. ह्या फोनच्या मागील बाजूस वक्र ग्लास आणि पुढील बाजूस गोरिल्ला ग्लास ४ ने संरक्षित केले आहे.

 

 

ग्लासचा जास्तीत जास्त वापर केला असला तरीही हा फोन खरच गुळगुळीत आणि हातातून निसटेल असा आहे.

 

 

मात्र  मागे असलेल्या वक्र ग्लासमुळे हा फोन थोडा वेगळा आणि चांगला दिसतो. तसेच त्याच्या पुढील ग्लासमुळे सॅमसंगचे डिझाईन सर्वोत्कृष्ट दिसते. त्यामुळे आम्ही लूक्सच्या बाबतीत ह्या स्मार्टफोनला अधिकाधिक गुण देऊ.

 

डिस्प्ले

जर तुम्ही गॅलेक्सी S6 एज प्लसचा रिव्ह्यू वाचला तर, तुम्हाला आपोआपच समजेल की नोट५ चा डिस्प्ले चांगला कसा आहे ते. ह्यात असलेली ५.७ इंचाची QHD SAMOLED डिस्प्ले हे त्यातीलच एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्याच्या डिस्प्लेवर रंग एकदम स्पष्ट दिसतात आणि जर तुम्हाला आतापर्यंत सॅमसंगचे डिस्प्ले आवडले असतील तर मग तुम्ही ह्याच्या प्रेमातच पडाल.

 

एस-पेन

गॅलेक्सी नोट ५ वर असलेला S-pen हा सर्वात वेगळा आणि किंचित चांगला आहे. तसेच जरी ५.७ इंचाची डिस्प्ले असली तरीही ह्या  S-Pen ने आपण बरेच काही करु शकता. जर तुम्ही सॅमसंग S-Pen चे पुरस्कर्ते असाल, तर तुम्ही नोट ५ अगदी सहजरित्या हाताळू शकाल. हा जवळपास ख-याखु-या पेनप्रमाणे काम करतो. तसेच त्यात सॅमसंगने अॅप्स जोडण्यासाठी Air Command Menu पर्याय दिला आहे. जेणेकरुन तुम्ही एव्हरनोट, वननोट आणि इतर अॅप्स Air Command Menu ला जोडू शकता आणि त्यावर S-Pen ने लिहू शकता. तसेच त्यात स्क्रीन ऑफ मेमो पर्यायही दिला आहे, ज्याने तुम्ही डिस्प्ले बंद असला तरीही, S-Pen ने तुम्ही त्यावर लिहू शकता. जेव्हा तुम्ही नोट ५ वरुन S-Pen काढाल तेव्हा तुम्हाला स्क्रीन काळी दिसेल, पण तुम्ही त्यावर लिहू शकता.

एकंदरीतच पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुमचा S-Pen कुठे राहिला किंवा तुम्ही कुठे ठेवलात ते विसरलात,तर गॅलेक्सी नोट ५ तुम्हाला अलर्ट करतो. हे वैशिष्ट्य खरच वापरकर्त्यांना उपयोगी आहे. त्यामुळे युजर्स याचे नक्कीच कौतुक करतील.

कामगिरी

चाचणी करण्यासाठी बेंचमार्क कधीच पुरेसे नसतात, पण सॅमसंगला त्याच्या Exynos 7 Octa processor सह दोन्ही पैलू समाविष्ट आहेत.हाच प्रोसेसर गॅलेक्सी S6, S6 एज आणि S6 एज प्लसमध्ये कार्यान्वित आहे.

नेहमीच्या वापरासाठी गॅलेक्सी नोट ५ एक उत्कृष्ट स्मार्टफोन आहे. त्याच्या मोठ्या आकारामुळे उष्णता फेकण्यासाठी मदत करतो. तसेच त्याचा सरासरी घड्याळ्याचा वेग हा गॅलेक्सी S6 आणि S6 एजपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ह्याची कामगिरी केवळ Soc वर देऊ शकत नाही. जरी त्यात Exynos 7 सारखा चांगला प्रोसेसर असला तरीही, नोट ५ची कामगिरी ही त्याच्या इतर गोष्टींवरही अवलंबून आहे, ज्यात सॅंमसंग कधीही तडजोड करत नाही. तसेच त्यात भर म्हणजे, त्यात असलेल्या DDR4 RAM मुळे हा एकदम नितळ कामगिरी देतो, ज्याने हा मल्टिटास्किंगसाठी वापरु शकतो.


बॅटरी

जरी कामगिरी चांगली असली तरीही, त्याची बॅटरी लाईफही खूप महत्त्वाची असते. गॅलेक्सी नोट५ मध्ये ३००० mAh बॅटरी क्षमता आहे, ज्याने मी थोडा निराश झालो. कारण जेव्हा तुम्ही ५.७ इंचाची QHD डिस्प्ले आणि पॉवरफुल ऑक्टो-कोर प्रोसेसर बद्दल बोलता तेव्हा बॅटरी लाईफ अजून हवी होती.

पण तरीही, जेव्हा मी हा रोजच्या वापरासाठी म्हणून दिवसभर वापरुन पाहिला, त्यात २६ कॉल्स, खूप IMs, सोशल नेटवर्किंग आणि २० मिनिट गेम्स खेळलो, तरीही मध्यरात्रीपर्यंत त्याची केवळ १५% बॅटरी कमी झाली तेही बॅटरी सेव्हर मोड न वापरता. हे खरच बाजारात मिळणा-या इतर फोनच्या  वैशिष्ट्यांपेक्षा वेगळं आहे.


कॅमेरा

आपण ह्याआधी सॅमसंग गॅलेक्सी S6 एज आणि S6 एज प्लसच्या रिव्ह्यूमध्ये कॅमे-याबाबत चर्चा केली, म्हणूून आम्ही तुम्हाला सरळ तोच कॅमेरा रिव्ह्यू ह्याला लागू होईल असेच सांगू.

निष्कर्ष

सॅमसंगने ह्यावर्षी गॅलेक्सी S6 सह सुरु केलेले परिवर्तन गॅलेक्सी नोट ५ आणून पुर्णत्वास नेले आहे. हा फोन पॉवर आणि डिझाईनचे मिश्रण आहे. तसेच हा दिसण्यास चांगला आणि उत्कृष्ट कामगिरी करणारा फोन आहे ह्याबाबत कोणाचेही दुमत असणार नाही. फक्त एकच गोष्ट खटकते ती म्हणजे, ह्याच्या किंमतीच्या तुलनेत हा फोन खूपच निसरडा आणि हातातून पडणारा आहे. जर तुम्ही फ्लॅगशिप फॅबलेटच्या शोधात असाल तर, खरेदीसाठी हा अजून एक पर्याय आहे.

logo
Prasid Banerjee

Trying to explain technology to my parents. Failing miserably.

Advertisements
Advertisements

सॅमसंग गॅलेक्सी नोट ५

सॅमसंग गॅलेक्सी नोट ५

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.