वनप्लस X ओनिक्स Review

ने Prasid Banerjee | अपडेट Dec 01 2015
वनप्लस X ओनिक्स Review
DIGIT RATING
73 /100
 • design

  87

 • performance

  65

 • value for money

  67

 • features

  76

User Rating : 4/5 Out of 1 Reviews
 • PROS
 • चांगला लूक
 • उत्कृष्ट रचना
 • उत्कृष्ट कॅमेरा
 • CONS
 • दोन्ही बाजूला ग्लास नसणे
 • स्नॅपड्रॅगन 801 आता जुना झाला आहे
 • पॉवर यूजर्सच्या पसंतीस उतरणार नाही

निर्णय

जर तुम्ही कमी बजेटमध्ये चांगला लूक असलेला स्मार्टफोन घेऊ इच्छिता तर आपण वनप्लस X घेऊ शकता, मात्र  जर आपण एक चांगला आणि उत्कृष्ट कामगिरी करणारा स्मार्टफोन घेऊ इच्छिता तर, आपण आसूस झेनफोन २ घेऊ शकता. वनप्लस X चा लूक आसूस झेनफोन 2 पेक्षा सुंदर आहे, त्याचा कॅमेरासुद्धा चांगला आहे आणि ह्या दोघांची बॅटरी सारखी आहे, मात्र ह्याची कामगिरी आसूस झेनफोनपेक्षा कमी आहे.

वनप्लस X स्मार्टफोनचा लूक खूपच चांगला आहे. मात्र भारतीय ग्राहक केवळ त्याचा लूक चांगला आहे म्हणून तो स्मार्टफोन घेतील की, त्याच्या चांगल्या वैशिष्ट्यांमुळे तो घेतील? ही विचार करण्याची गोष्ट आहे.

जेथे वनप्लस वन आणि वनप्लस 2 ने कमी किंमतीत उत्कृष्ट कामगिरी देणारे फोन दिले, तेथेच वनप्लस x बाजारात फ्लॅगशिप स्मार्टफोन्सच्या डिझाईनला कमी किंमतीत घेऊन आला आहे. चला तर मग माहिती करुन घेऊयात वनप्लस X ओनिक्समध्ये त्याच्या डिझाईन व्यतिरिक्त त्याची इतर वैशिष्ट्ये कशी आहेत.

BUY वनप्लस X ओनिक्स
Price 16999

वनप्लस X ओनिक्स detailed review

डिझाईन आणि रचना


 

वनप्लस X ने कव्हर करण्यासाठी ग्लास आणि धातूचा वापर केला गेला आहे. त्याच्या पुढे आणि मागील बाजूस ग्लास दिली गेली आहे आणि बाजूला मेटल दिले गेले आहे. ह्या स्मार्टफोनचे लूक खूपच प्रीमियम आहे. मात्र ह्याच्या ग्लासमुळे जर हा हातातून पडला तर नक्कीच तुटेल अशी भीती वाटत राहते. ग्लासमुळे हा स्मार्टफोन हातातून खूप निसटतो. हा एक फिंगरप्रिंट मॅग्नेट आहे, ज्यामुळे ह्यात बोटांचे ठसे खूप दिसतात.

 

 

वनप्लस X  हातात पकडल्यावर खूप चांगला फील देतो आणि त्यात वापरलेल्या  मेटल आणि ग्लासमुळे हा बराचा चांगला प्रीमियम लूक देतो.

 

 

तसे हयाचे डिझाईन हे अॅनड्रॉईड स्मार्टफोन्ससाठी काही नवीन गोष्ट नाही. ह्याच्या बजेट विभागात असे डिझाईन एक चांगली गोष्ट मानली जातेय. जर आपण लोकांमध्ये ह्या स्मार्टफोनला बाहेर काढता तर लोक नक्कीच ह्याच्याकडे आकर्षित होतील. ह्याचे वजन 138 ग्रॅम आहे आणि ह्याची जाडी 6.9mm आहे.  

 

 

डिस्प्ले

कंपनीने ह्या स्मार्टफोनची तीन वैशिष्ट्ये सांगितली आहेत, आणि ती आहेत ह्याला बनविण्यासाठी वापरण्यात आलेले मटेरियल, ह्या स्मार्टफोनचा आकार आणि ह्याची डिस्प्ले. ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची AMOLED डिस्प्ले दिली गेला आहे. ह्याच्या डिस्प्लेचा टच चांगला आहे. हा गोरिल्ला ग्लास ३ ने कव्हर केला आहे.

 

 

ह्याची ५ इंचाची 1080p AMOLED डिस्प्ले खूप शार्प, ब्राइट आणि वायब्रंट आहे, जी सर्वांना आवडेल. ह्याच्या डिस्प्लेमध्ये सॅमसंगच्या फोन्सप्रमाणे पिवळसरपणा नाही.

तथापि, सूर्यप्रकाशात ह्याची डिस्प्ले व्यवस्थित काम करत नाही. ह्यावर काही स्पष्ट दिसत नाही.

कामगिरी

ह्या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 801 दिला गेला आहे, जो खूप जुना झाला आहे. हा अॅप्स नीट काम करत नाही. जर वनप्लसने ह्यात मिडियाटेक हेलिओ X10 दिला असता, तर खूप चांगले झाले असते.

कामगिरीबाबत वनप्लस X स्मार्टफोन मोटो X प्ले पेक्षा चांगला आहे, मात्र हा आसूस झेनफोन 2 (4GB रॅम) पेक्षा चांगला नाही.

सर्वसाधारण वापरास वनप्लस X चांगले काम करतो. गेमिंगसाठी ह्याचे स्नॅपड्रॅगन 801 चांगल्या प्रकारे काम करतो, जो मोटो X प्ले च्या स्नॅपड्रॅगन 615 पेक्षा चांगला आहे, मात्र जर आपल्याला चांगली कामगिरी हवी असेल तर आपण आसूस झेनफोन 2 घेऊ शकता.  

वनप्लस X सर्वात मोठी कमी दिसली तर,ह्यात फिंगरप्रिंट सेंसर नाही. जेथे आता मिड रेंजच्या डिवायसेसमध्येसुद्धा फिंगरप्रिंट सेंसर मिळतो.

स्नॅपड्रॅगन 801 खराब प्रोसेसर नाही, पण आता तो बाजारात खूप जुना झाला आहे. ह्याचा अर्थ असा की, तुम्ही नवीन फोन तर घेता मात्र फोनमध्ये काही गोष्टी जुन्याच आहेत.

कॅमेरा

वनप्लस X चा कॅमेरा चांगला आहे. ह्यात १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे, जो खूप शार्प डिटेल्स देतो. त्याचा रंग खूप चांगला आहे आणि शटर प्रतिसाद ही त्वरित आहे. तथापि कमी प्रकाशात घेतलेले फोटो इतके चांगले येत नाही. ह्या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. जो चांगले काम करतो.

बॅटरी

वनप्लस X स्मार्टफोनमध्ये कंपनीने 2525mAh ची बॅटरी दिली गेला आहे, जेथे आपल्या सर्वांना माहितच आहे की, अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर चालणा-या फोन्सची बॅटरी जास्त चालत नाही. असे असतानाही कंपनीने आपल्या ह्या डिवाइसमध्ये एका छोट्या बॅटरीचा वापर केला आहे. वनप्लस X ची बॅटरी १० ते १२ तास चालते. जास्त वापरामध्ये,ब्राइटनेस वाढवल्यावर, व्हॉट्सअप किंवा कॉल्स केल्यावर आणि १ तास गेमिंग केल्यावरसुद्धा ह्याची बॅटरी १० तास चालली.

स्टोरेज

ह्याचे अंतर्गत स्टोरेज हेसुद्धा वनप्लस X ची सर्वात मोठी उणीव आहे. ह्यात फक्त १६जीबीचे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने १२८जीबीपर्यंत वाढवू शकतो. आजकल जास्तकरुन अॅप्स अंतर्गत स्टोरेजवर असल्यावरच चांगली कामगिरी करतात.

निष्कर्ष

हा स्मार्टफोन त्या लोकांसाठी आहे, ज्यांना प्रीमियम लूक असलेला स्मार्टफोन हवा आहे. जर आपल्याला एक चांगली डिझाईन आणि रचना असलेला स्मार्टफोन हवा असेल तर, आपण वनप्लस X घेऊ शकता. ह्याच कॅमेरा चांगला आणि त्याची बॅटरीसुद्धा ठीकठाक आहे. पण जर तुम्ही चांगल्या कामगिरी असलेला स्मार्टफोन घेऊ इच्छिता तर हा स्मार्टफोन चांगला नाही.

 

वनप्लस X ओनिक्स Key Specs, Price and Launch Date

Price: ₹16999
Release Date: 01 Dec 2015
Variant: 16GB
Market Status: Launched

Key Specs

 • Screen Size Screen Size
  5" (1080 x 1920)
 • Camera Camera
  13 | N/A MP
 • Memory Memory
  16 GB/3 GB
 • Battery Battery
  2525 mAh
logo
Prasid Banerjee

Trying to explain technology to my parents. Failing miserably.

Advertisements
Advertisements

वनप्लस X ओनिक्स

Price : ₹16999

वनप्लस X ओनिक्स

Price : ₹16999

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status