OnePlus2 Review

ने Prasid Banerjee | अपडेट Oct 07 2015
OnePlus2 Review
DIGIT RATING
81 /100
 • design

  79

 • performance

  82

 • value for money

  67

 • feature

  95

User Rating : 4.3333333333333/5 Out of 3 Reviews
 • PROS
 • चांगला कॅमेरा
 • गरम होण्याची समस्या नाही
 • CONS
 • ऑक्सिजन ओएस चांगला नाही
 • ह्याची स्क्रिन अजून चांगली हवी.

निर्णय

वनप्लस वन कमी किंमतीतही उत्कृष्ट फोन होता. मात्र जर आपण २० ते ३० हजारांच्या दरम्यान फोन घेऊ इच्छिता तर  तुम्ही वनप्लस२ घेऊ शकता. मात्र जर तुम्ही वनप्लस वनच्या जागेवर वनप्लस २ घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला घेऊ नका असेच सांगू.

BUY OnePlus2

Buy now on amazon उपलब्द 20999

OnePlus2 detailed review

आमचे मत


 

जरी आपल्या किंमत विभागात वनप्लस २ ने सर्वांना मात दिली असली, तरीही हा आधीच्या पिढीच्या फोन्सच्या तुलनेत कुठेच बसत नाही. ह्या फोनमध्ये गरम होण्याची काही समस्या नाही आहे आणि हा फोन चांगले काम करतो. जर तुम्ही नवीन फोन घ्यायच्या विचारात असाल, तर तुम्ही हा फोन घेऊ शकता. परंतु जर तुमच्याकडे सध्या वनप्लस वन फोन असेल, तर तुम्ही तोच वापरावा.

एक वर्षापूर्वी मी जेव्हा प्रथमच वन प्लस वन वापरला होता, तेव्हा मला वाटलेल की, स्मार्टफोनच्या बाजारात एक मोठा बदल होणार आहे. आणि जसा आपण विचार केला होता तसा, हा फोन बाजारात प्रसिद्ध झाला. मात्र ह्याची आवृत्ती खूपच कंटाळवाणी आहे आणि जेव्हा मला वनप्लस २ दिला गेला तेव्हा मला ह्यात काहीच रस नव्हता. जरी ग्राहकांना ह्यात बराच इंटरेस्ट आहे.

मी सलग दोन आठवडे वनप्लस २ ला वापरुन पाहिले, मात्र ह्याच्यावर प्रतिक्रिया देण्यापूर्वी मी आपणास काही सांगू इच्छितो. प्रतिक्रिया वाचताना ह्या गोष्टींचा नक्की विचार करावा.

पहिली गोष्ट म्हणजे, ह्या बद्दल प्रतिक्रिया लिहायच्या आधी माझ्या मनात स्नॅपड्रॅगन ८१०ला घेऊन बरीच पूर्वधारणा होती. ह्याला मी एक्सपिरिया Z3 प्लसमध्ये आधी पाहिले होते. दुसरी गोष्ट म्हणजे मला मोठे फोन्स जास्त आवडत नाही, तरीही मला एलजी G3 चांगला वाटला. तिसरी गोष्ट म्हणजे, मी बॅटरी पातळ असण्यापेक्षा बॅटरीच्या कामगिरीला महत्त्व देतो. शेवटी, मी एवढच सांगेन की, तुम या प्रतिक्रियेचा काहीही प्रभाव पडेल, मात्र कोणत्याही कारणास्तव तुम्ही तुमच्या वनप्लस१ ला वनप्लस २ ने बदलू नका. वनप्लस २ जरी जुन्या फोनची नवीन आवृत्ती असली तरीही, हा आपल्या जुन्या पिढीच्या फोन्ससमोर टिकणार नाही.

तरीही, जर तुम्ही वनप्लस २ची प्रतिक्रिया वाचू इच्छिता तर हे वाचा.

डिझाईन आणि रचना

ह्याची मागील बाजू सँडस्टोनची असते, मात्र यावेळी ती पातळ प्लॅस्टिकवर आहे.


वनप्लस२ चे मागील कव्हर वनप्लस वन सारखेच आहे, मात्र ह्याची गुणवत्ता कमी झाली आहे. ह्या फोनला काढता येणारी अशी मागील बाजू देण्याच्या नादात कंपनीला प्लॅस्टिकचा वापर करावा लागला. मात्र वनप्लस वनला सँडस्टोन फिनिश दिली गेली होती. गुणवत्ता ढासळली याचाच अर्थ म्हणजे वनप्लस२ ची फिनिशिंग बरीच कठीण आहे.


यूएसबी प्रकार-सी तुम्हाला तुमचा चार्जर सतत तुमच्या सोबत ठेवण्याचे सूचित करतो. जरी फोन्स नवीन
पद्धती अवलंबत असतील तरीही.
 
वनप्लस २ला वापरल्यानंतर मला वाटलं की खूप मोठा आहे मात्र वनप्लस वनसारखा उत्कृष्ट नाहीय. जरी हा मला मोटो टर्बोची आठवण करुन देत असला तरीही..  मात्र हा त्याच्यासारखा पातळ, जड आणि वापरण्यास सोपा नाही. हा फोन हलका तर नाही मात्र हा तितका जडसुद्धा नाहीय की ज्यामुळे हा नापसंत केला जाईल.
 
ह्याच्या मागील बाजूस १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला असून, ह्यावेळी ह्याला लेझरच्या साहाय्याने
ऑटो फोकस देण्यात आला आहे.

 

वनप्लसने एक धातू फ्रेमसुद्धा लावली आहे आणि ह्याची २ कारणे आहेत. पहिले की, आजकाल सर्व प्रीमियम फोन्समध्ये धातूचा वापर केला जातो आणि दुसरा जेणेकरुन तुम्ही अनेक प्रकारच्या कव्हर्सचा वापर करु शकाल. मात्र मला ही गोष्ट पसंत नाही आली, कारण मला कंपनीकडून दिले गेलेले वूड फिनिश स्टाईलवॅप कव्हरशी भिन्न वाटली.

 

फिंगरप्रिंट सेंसर हा फक्त फिंगरप्रिंट ओळखण्यापेक्षाही अधिक काम करु शकतो.

 

मी आधीच सांगितल्याप्रमाणे मला मोठे फोन्स आवडत नाही, मात्र हा मला मोठा वाटला नाही. आणि हा आरामात माझ्या खिशात फिट झाला. आणि त्यामुळे कधीच मला ह्याच्या आकारामुळे काही त्रास झाला नाही.

 

डिस्प्ले आणि युआय

 

मला वनप्लस २ चा डिस्प्ले आवडला नाही. ह्यात ५.५ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, जी खूप शार्प आहे, मात्र अस्पष्टही आहे. ह्या फोनच्या कॅमे-यावर व्हिडिओ पर्याय सुरु केल्यावर आणि ह्या फोनला हलवल्यानंतर समजते की ह्याच्या डिस्प्लेचा रिफ्रेश दर्जा कमी झाला आहे.

 

ह्याच्या डिस्प्लेसारखीच ह्याच्या युआयमध्येही खूपकाही कमतरता असल्याच्या दिसतात. ऑक्सिजन ओएस व्यवस्थित काम करत नाही. त्याच्या युआयमध्येही काही कमतरता आहे. मी अनेकदा कारण नसताना माझा सेल्युुलर डेटा बंद पाहिला. त्याचबरोबर स्क्रिनच्या वर जो गुगल सर्च बार आहे तो दिवसातून कमीत कमी एक वेळ तर गायबच असतो. ह्याचा फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा अनेकदा अपयशी ठरला आहे. जेव्हा जेव्हा मी ह्याला डेस्कवर ठेवून उघडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा हा उघडला नाही. ह्या फोनला वापरल्यानंतर मला वाटले की मी एखाद्या फोनला बिटा व्हर्जनवर वापरत आहे.


    

ही तीन यूआयची उदाहरणे आहेत.  सर्व आयकॉन्स अदृश्य आहेत.(डावीकडील), गुगल सर्च बारसुद्धा

अनेकदा अदृश्य आहे(मधील), आणि नोटीफिकेशन खाली घेतानाही अनेकदा अडकते.(उजवीकडील)

 

जरी आपण सर्वसामान्य वापरकर्ता असाल किंवा पॉवर वापरकर्ता असाल तर तुम्हाला ह्या फोनमध्ये अनेक उणीवा दिसतील. मात्र ह्याचा ऑक्सिजन ओएसचा युआय तसाच आहे जसा एक कस्टम युआय असला पाहिजे. ह्यात काही मोठा बदल नाहीय. मात्र तरीही काहीसा योग्य वाटला. हा थोडा थोडा अॅप्पलसारखाच आहे. ऑक्सिजन ओएससुद्धा अॅनड्रॉईडसारखाच आहे मात्र थोडा वेगळा आहे.

 

    

(L-R) लॉक स्क्रिन, होम स्क्रिन आणि शेल्फ(L-R)

 

 

    

(L-R)होम स्क्रिन कस्टमायझेशन, मल्टिटास्किंग स्क्रिन आणि त्वरित सेटिंग

 

शेल्फ स्क्रिनवर तुम्हाला ते अॅप आणि संपर्क दिसतील जे तुम्ही सर्वात जास्त वापरले आहे. हे वैशिष्ट्य मला थोडे आवडले. ह्याचे हार्डवेअर बटणसुद्धा मला पसंत आले. जर तुम्ही आयफोन वापरला असेल, तर तुम्हाला हे बटण नक्कीच आवडेल.

 

विविध व्यत्यय मोड दरम्यान उलटे हार्डवेअर बटण उपयुक्त आहे. व्यत्यय आणणा-या अनेक मोड्समध्ये

टॉगलिंग करण्यासाठी हार्डवेअर बटण खूप उपयोगी आहे. तरीही ते अधिक प्रोग्रामेबल होईल अशी आशा आहे.

 

फिंगरप्रिंट सेंसर

 

ह्याचा फिंगरप्रिंट सेंसर इतका गतीशील नाहीये आणि डेस्कवर ठेवून हा वापरला असता तो उघडत नाही. जरी ह्याचे हे वैशिष्ट्य खूप फायदेशीर असले तरीही मला वाटतं की, अॅप्पलचा आयडी जास्त चांगला आहे.

 

जरी आपण अॅप्पलचा टच आयडी हा किंचित चांगला आहे असा विचार करत असलो, तरीही वनप्लसचे

काही बग्स सोडले तर फिंगरप्रिंट सेंसर हा थोडा चांगला आहे.

 

 

कामगिरी

 

ह्यात स्नॅपड्रॅगन ८१० प्रोसेसर दिला गेला आहे आणि जेव्हा मी हा वापरला तेव्हा मला हा खूप संथ गतीचा वाटला. वनप्लस वनच्या तुलनेत ह्याचे काम ३०% कमी वाटले. जरी हा कितीही वापरल्यावर गरम होत नसला तरीही हा तितकाच गरम होतो जितका एक स्नॅपड्रॅगन ८१० प्रोसेसरच्या फोनचा असला पाहिजे, आणि जी एक साधारण गोष्ट आहे. मी २ तास ह्यावर गेम्स खेळलो मात्र मला काही फोन गरम होण्याची समस्या दिसली नाही.  

 

येथे दोन गोष्टी दिसतात. पहिली घड्याळाचा वेग कमी असणे आणि दुसरा कुलिंग पेस्टमुळे ह्यातील उष्णता ५ वरुन १०% खाली आली आहे. याचा अर्थ असा की, जर आपण एखाद्या एअरकंडिशन खोलीत आहात आणि तुमचा वनप्लस २ गरम झाला असेल, तर आपण केवळ २ मिनिट ह्याला ठेवून द्या. तो थंड होईल. मी एअरकंडिशन नसलेल्या ठिकाणीही ह्यावर गेम्स खेळलो, मात्र हा इतका काही गरम झाला नाही ज्यामुळे मला काही अडचण आली.

 

वनप्लस२ ला इतके अंक मिळाले नाही, जितके वनप्लस वनला मिळाले होते. वनप्लस२ मध्ये मी गेम्स खेळलो, तरीही मला थोडी कमतरता नक्कीच जाणवली. मात्र मला ह्याची कार्यक्षमता ठिक वाटली.

 

बॅटरी

डिस्प्लेप्रमाणेच वनप्लस २ची बॅटरी काही खास नाही. जरी हा फोन दिवसभर चालला तरीही. जर तुम्ही फोनवर गेम खेळत राहिलात तर ह्याची अर्धी बॅटरी एका तासाच्या आत १०% वर पोहोचेल.

 

कॅमेरा

वनप्लस २च्या कॅमे-यामध्ये लेझर असिस्टेड ऑटो-फोकस कॅमेरा दिला गेला आहे. ह्याचा १३ मेगापिक्सेल रियर कॅमेरा वनप्लस वनच्या तुलनेत खूप चांगला आहे. मात्र हा एलजी G4 सारखा वेगाने फोकस करु शकत नाही. ह्याने काढलेले फोटा उघडले तरीही बाय डिफॉल्ट गुगल फोटोजवरच हा फोटो उघडतो. ज्याच्यावर फोटो उघडले असता, फोन काही वेळासाठी स्तब्ध होतो. असच काहीसे सॅमसंग फोनमध्येही होते.  

 

निष्कर्षावर यायचे असेल तर, वनप्लस २ चा कॅमेरा चांगला आहे. ह्याचा कॅमेरा चांगले फोटोज काढतो आणि कमी प्रकाशातही उत्कृष्ट फोटो काढतो.

 
 

 

 
 

 

logo
Prasid Banerjee

Trying to explain technology to my parents. Failing miserably.

Advertisements
Advertisements

OnePlus2

OnePlus2

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.