नेक्स्टबिट रॉबिन Review

ने Prasid Banerjee | अपडेट Jun 07 2016
नेक्स्टबिट रॉबिन Review
 • PROS
 • दिसायला चांगला
 • CONS
 • क्लाउड स्टोरेजवर नियंत्रण नाही
 • ठीकठाक कॅमेरा
 • ठीक बॅटरी

निर्णय

नेक्स्टबिट रॉबिन लोकांच्या मोबाईल बाबतीतील एक सामान्य प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करु पाहत आहे, पण त्यात तो पुर्णपणे यशस्वी होऊ शकला नाही. जर ह्याविषयी बोलायचे झाले तर. ह्याचा ठीकठाक कॅमेरा, ठीक डिस्प्ले आणि ह्याची कामगिरी सर्वसाधारण आहे असेच म्हणावे लागेल. ह्या फोनला खरेदी करण्याचे असे काही खास कारण आम्हाला आढळून आले नाही. खरे पाहता, हा एक वेगळा आणि आकर्षक दिसणारा असा स्मार्टफोन आहे. ते सोडल्यास ह्यात म्हणावे तितके खास नाही.

BUY नेक्स्टबिट रॉबिन
Price 19999

नेक्स्टबिट रॉबिन detailed review

नेक्स्टबिटने आपल्या नवीन स्मार्टफोन रॉबिनला एका वेगळ्या कल्पनेसह बाजारात आणले, मात्र ही नवीन कल्पना म्हणावी तशी अंमलात आणता आली नाही. ज्या कारणामुळे हा स्मार्टफोन बाजारातील दुस-या स्मार्टफोनच्या तुलनेत जास्त चांगला सिद्ध होऊ शकला नाही आणि त्यामुळे हा फोन स्पर्धेतून बाहेर गेला आहे. हा फोन खरेदी करण्याच्या लायक नाही.


 

नेक्स्टबिट रॉबिन: सविस्तर रिव्ह्यू
आपल्या सर्वांना फोनची सर्वात महत्त्वाची समस्या असते ती, स्टोरेजची. आपल्या फोनमध्ये 16GB चे स्टोरेज असूनसुद्धा स्टोरेजची समस्या काही सुटत नाही. त्यामुळे ही स्टोरेजची समस्या अगदी ठराविक कंपन्याच सोडवण्यात सफल होतात. त्यातील एक नेक्स्टबिट आङे. कंपनीने आपल्या फोनला जगातील पहिला “क्लाउड फर्स्ट” डिवाइस नावाने लाँच केला आहे. ज्यात आपण जर क्लाउड स्टोरेजचा वापर केला तर आपली स्टोरेजची समस्या दूर होईल. मात्र तुमच्या महत्त्वाच्या डाटासाठी तुम्ही अशा नवीन स्टोरेजवर विश्वास ठेवू शकता का?

 

नेक्स्टबिट स्मार्ट क्लाउड: स्मार्ट काम करत नाही.
ह्या स्मार्टफोनची क्लाउड स्टोरेज खूप चांगली आहे. खासकरुन जेव्हा तुम्ही ह्यात आपले मनपसंत अॅप्स डाऊनलोड करता. त्यामुळे स्टोरेजला घेऊन असणा-या समस्या दूर होतात. मात्र ह्या स्टोरेजवर काही नियंत्रण नाही. ह्यात अॅप्सचे बॅकअप नाही आहेत. त्यामुळे जर तुम्ही अॅपला क्लाउडमध्ये हलविण्याचा विचार करत असला, तरी तुम्ही ते करु शकणार नाही. त्यामुळे मला ही गोष्ट खटकली जर फोन आपला आहे, ते स्टोरेज कुठे करायचा हा निर्णय सर्वस्वी माझा असला पाहिजे, मात्र येथे हा स्मार्टफोन स्वत:क्लाउड स्टोरेजला सेट करतो.

तुम्ही तुमच्या अॅप आणि फाइल्सला एकत्र क्लाउडमध्ये हलवू शकणार नाही. आपल्याला एक-एक फाईल मूव करावी लागेल. भारतात Wi-Fi वर डेटासुद्धा महाग आहे. ह्याचाच अर्थ जर तुम्ही रॉबिन खरेदी केलात, तर तुमचे दोन्ही FUP लिमीट Wi-Fi वर आणि डाटा वर काम करतील.


जर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी केला तर आपल्याला 100GB चे क्लाउड स्पस मिळते जे आपल्या सेटिंगमध्ये स्मार्ट स्टोरेज दाखवतो. ह्यासाठी आपल्याला क्लाउड स्टोरेजच्या सेटिंगमध्ये जाऊन पाहावे लागेल. स्मार्ट स्टोरेज पर्यायात क्लिक केल्यावर क्लाउड किती आहे, ते समजेल.

रचना आणि डिझाईन
ह्या स्मार्टफोनची बॉडी प्लॅस्टिकने बनलेली आहे. ह्यात पांढ-या आणि हलक्या निळ्या रंगाची प्लॅस्टिक मटेरियल दिले गेले आहे. ह्याच्या समोरील बाजूला निळा आणि मागील बाजूस पांढरा रंग दिला आहे. ज्यामुळे फोन खूपच आकर्षक दिसतो. ह्याची स्मूथ आणि सिमलेस डिझाईन ह्याला खूपच आकर्षक आणि वेगळी बनवते. ह्यात USB - C पोर्ट खालच्या बाजूस आणि हेडफोन जॅक वरच्या बाजूस दिला गेला आहे.

 

ह्या फोनला एर्गोनोमिक डिवाइस बोलू शकत नाही. ह्यात 5.2 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. ज्यात आपल्याला फिंगरप्रिंट सेंसरलासुद्धा देण्यात आले आहे. ह्याची डिस्प्ले खूपच स्मूथ बनवली आहे. मात्र ह्यामुळे फोन्सचे बटन खूपच कठीण झाले आहेत. सोनी एक्सपिरिया Z5 मध्ये फोनच्या कडेला फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे. मात्र ह्यात तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही.
 डिस्प्ले आणि युआय
ह्याच्या डिस्प्लेविषयी बोलायचे झाले तर, ह्यात काही खास देण्यात आलेले नाही. ह्यात 1080 पिक्सेल डिस्प्ले दिली गेली आहे. ह्याची रंगसंगती ह्याला आकर्षक बनवते.मात्र जर आपण १९,९९९ रुपये देऊन ह्या फोन खरेदी करु इच्छिता, तर ह्यात म्हणावे तितके काही खास नाही.


ह्याचा युआयबद्दल बोलायचे झाले तर, ह्यात एक गोल आणि चाैकोनात एका फोल्डरला ठेवण्यात आले आहे. ह्यात एक गोल बटन दिले आहे, जो आपल्याला पिंड अॅप्स, आर्चिव अॅप्स आणि इतर सर्व अॅप्सला एक्सेस करण्यास मदत करतात. असे केल्यास आपल्याला अॅप्सची एक सरळ यादी दिसेल. जे करण्यास आपल्याला थोडे वेगळे वाटेल. तेथेही मेनूमध्ये काही सर्च असणार नाही. जसे की कॉन्टेक्ट्स, कॅल्क्युलेटर, गॅलरीला आपण क्लाउडमध्ये टाकू शकता. हा फोन अॅनड्रॉईड मार्शमॅलोवर चालतो.

                             

कामगिरी
नेक्स्टबिट रॉबिन स्नॅपड्रॅगन 808 प्रोसेसरवर चालतो आणि जो प्रोसेसर नेक्सस 5X वर चालतो.

मात्र जर तुम्ही ह्याच्या उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा करु शकणार नाही. नेक्स्टबिट रॉबिन जलदरित्या आणि चांगले काम करतो, मात्र ह्यात थोडे अडथळे जरुर येतात. आणि हेवी अॅप आणि गेम लोड करण्यासाठी खूप वेळ घेतो.

कॅमेरा
रॉबिन स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा जो काही खास फोटो काढत नाही. प्रकाशात ह्याने काढलेले फोटो म्हणावे तितके चांगले येत नाही.  तर कमी प्रकाशात ठिकठाक फोटो येतात. ह्यापेक्षा ह्याता जास्त काही खास नाही. ह्याच्या कॅमे-याचा फोकससुद्धा खूप संथ गतीने काम करतो. आणि आपण जेव्हा क्लोजअप फोटो काढता त्यावेळा ह्याचा फोकस काम करत नाही.

   
These images are representational. Please click

बॅटरी लाइफ
ह्या फोनमध्ये 2680mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी जास्त वापरल्यास केवळ ७ तासांत संपते. ह्याला आम्ही सकाळी 9 वाजता १०० टक्के चार्ज करुन ह्यावर ४५ मिनिटे गेम खेळलो, ५ कॉल्स केले आणि ३० मिनिटांपर्यंत ब्राउजिंग आणि सतत टेक्स्ट मेसेज केले. असे सर्व करुन संध्याकाळी ४ वाजेपर्यंत हा फोन चालला. आणि जेव्हा ह्याची बॅटरी 15 टक्क्यांपर्यंत येऊन पोहोचली तेव्हा तो डिवाइस ऑटो अॅडजस्टमेंट मोडवर गेला. हा क्वालकॉम चार्ज 2.0 टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. मात्र ह्यात कॉम्पेक्टिबल अॅडॉप्टर दिला गेला नाही. ह्यात केवळ USB-C केबल मिळते.

निष्कर्ष
रॉबिन स्मार्टफोन आपल्या फोन स्टोरेजच्या समस्येला डोळ्यापुढे ठेवून आणला गेला आहे. मात्र हा व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळे हा फोन खरेदी करण्याचे आम्ही काही खास कारण सांगू शकणार नाही. ह्याचे डिझाईन चांगले आहे, मात्र ह्याची कामगिरी म्हणावी तितकी चांगली नाही. ह्यापेक्षा नेक्सस 5x, लेनोवो वाइब X3 आणि शाओमी Mi 5 ह्या फोनपेक्षा जास्त चांगले आहेत.

 

नेक्स्टबिट रॉबिन Key Specs, Price and Launch Date

Price: ₹19999
Release Date: 06 Jun 2016
Market Status: Launched

Key Specs

 • Screen Size Screen Size
  NA
 • Camera Camera
  NA
 • Memory Memory
  NA
 • Battery Battery
  NA
logo
Prasid Banerjee

Trying to explain technology to my parents. Failing miserably.

Advertisements
Advertisements

नेक्स्टबिट रॉबिन

Price : ₹19999

नेक्स्टबिट रॉबिन

Price : ₹19999

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status