एलजी G5 Review

ने Team Digit | अपडेट Jun 16 2016
एलजी G5 Review
DIGIT RATING
86 /100
 • design

  92

 • performance

  81

 • value for money

  82

 • features

  87

 • PROS
 • खूप जास्त फास्ट आणि पॉवरफुल
 • चांगला कॅमेरा
 • चांगली बॅटरी
 • CONS
 • मॉड्यूलर डिझाईन अजून चांगले पाहिजे
 • बॅटरी लाइफ आणखी चांगली पाहिजे

निर्णय

LG G5 स्मार्टफोन 2016 चा एक इनोवेटिव फोन असू शकतो. मात्र हा सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन आहे असे आपण बोलू शकत नाही. ह्या स्मार्टफोनचे मॉड्यूलर डिझाईन अजून चांगले करता आले असते आणि ह्याची बॅटरी लाइफसुद्धा अजून चांगली बनवता आली असती. हा स्मार्टफोन बाजारात आतापर्यंतचा सर्वात जलद स्मार्टफोन असल्याचे बोलले जात आहे. ह्यात एक चांगला कॅमेरा दिला आहे. जर तुम्ही आम्हाला विचारत असाल की, हा फोन खरेदी करावा की नाही, तर आम्ही सांगू की, ह्या फोनमध्ये तसे काही वाईट नाही. मात्र तरीही आम्ही ह्या फोनऐवजी सॅमसंग गॅलेक्सी S7 एज स्मार्टफोन घ्या असे सुचवू.

BUY एलजी G5
Buy now on amazon स्टॉक मध्ये नाही 12990
Buy now on flipkart स्टॉक मध्ये नाही 29990

एलजी G5 detailed review

LG ने ह्यावर्षी G5 हा एक चांगला, नवीन आणि इनोवेटिव्ह फोन आणला आहे. मात्र LG ला आपल्या स्मार्टफोनच्या एजेसवर काम करावे लागेल.

LG G5 :सविस्तर माहिती
LG ने खूप वर्षांनंतर असा फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला आहे, जो खूपच चांगला आणि खास आहे. LG G5 कंपनीचा पहिला असा स्मार्टफोन आहे, ज्यात फोनमध्ये लेजर ऑटोफोकस समाविष्ट केले आहे. त्याचबरोबर हा कर्व्ह्ड डिस्प्ले दिला गेली आहे. आणि हा गुगलच्या पहिल्या मॉड्यूलरला मागे टाकेल.

मॉड्युलिटी आणि डिझाईन
LG G5 स्मार्टफोनमध्ये सर्वात खास गोष्ट म्हणजे हा एक मॉड्यूलर स्मार्टफोन आहे, मात्र ह्यात आम्हाला ह्या स्मार्टफोनकडून जेवढी अपेक्षा होती, ती पुर्ण न झाल्याचे आमचे मत आहे. ह्याचा लूक आम्हाला म्हणावा तितका आवडला नाही. हा दिसायला खूप चांगला आणि आकर्षक आहे. मात्र हा खूपच चांगला आहे, असे आपण बोलू शकत नाही.
मेटॅलिक बॉडीने बनलेला हा स्मार्टफोन प्लॅस्टिकसारखा दिसतो. कंपनीचा दावा आहे की, ह्यात अॅल्युमिनियमने बनलेला आहे. मात्र ह्यात असे काही खास दिसत आहे, जसे आयफोनमध्ये दिसते.

ह्याच्या उजव्या बाजूला दोन बटन दिले आहे. ह्या बटनाला आपण अगदी सहजपणे दाबू शकतो, मात्र त्यात थोडा जोरसुद्धा द्यावा लागेल. जर चुकून हे बटन प्रेस झाले, तर तुमचा फोन ताबडतोब बंद होईल. फोनमधील मॉड्यूलेशनला बदलता आले असते. स्मार्टफोनमध्ये बॅटरी टाकताना किंवा काढताना फोन काही वेळ हँग होतो.फोनमध्ये एक्सपांडेबल मॉड्यूलसारखे अनेक फिचर्स दिले आहेत. ह्या मॉड्यूलला कॅमेरे आणि फोनची बॅटरी वाढवण्यासाठी वापरु शकतो. LG कॅम प्लसला G5 मध्ये बॅटरी स्लॉटद्वारे अटॅच केले जाऊ शकते. ज्याने ह्या फोनमध्ये सुविधाजनक ग्रिप मिळेल. LG चे सध्या दोन मॉड्यूल उपलब्ध आहे, एक LG कॅम प्लस आणि Hi-Fi प्लस. फ्लिपकार्टच्या लिस्टिंगनुसार, LG कॅम प्लस मॉड्यूलची किंमत ६५०० रुपये आहे.

डिस्प्ले
ह्यात 5.3 इंचाची QHD डिस्प्ले दिली आहे, ज्याची पिक्सेल तीव्रता 544ppi आहे. ह्या फोनमध्ये त्याच In-Cell टच टेक्नॉलॉजीचा प्रयोग केला आहे, जो G4 मध्ये केला होता. ह्याची डिस्प्ले खूपच चांगली आहे. ह्याची डिस्प्ले जास्त सूर्यप्रकाशात आल्यास आपोआप ब्राइटनेस मॅनेज करते. ह्याची डिस्प्ले लेनोवो वाइब X3 पेक्षा गतिशील आहे.

युआय
LG च्या UI च्या ना तुम्ही जास्त कौतुक करु शकाल ना जास्त निंदा. ह्याचा युआय चांगला आहे, असे आपण बोलू शकतो. ह्यात आपण दोन एक्स्ट्रा बटन जोडू शकता. आपण ह्याच्या कॅमेरा मोडला मॅन्युअल करु शकता. तसेच रेग्युलर मोडसुद्धा बदलू शकता.

ह्याची डिस्प्लेला घेऊन लोकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. कारण LG G5 मध्ये अॅनड्रॉईड मार्शमॅलो दिला गेला आहे, जो ह्याला सपोर्ट करत नाही. मार्शमॅलोचे अडॅप्टेबल स्टोरेज फिचर G5 मध्ये सपोर्ट करत नाही.

कामगिरी
LG G5 बाजारात  उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनमध्ये सर्वात फास्ट स्मार्टफोन आहे. हा आतापर्यंतचा पहिला स्नॅपड्रॅगन 820 पुर्ण क्लॉक स्मार्टफोन आहे. ह्यात आपण मल्टी टास्क करु शकता. हेवी गेम खेळू शकता. ह्यात 4GB चे DDR4 रॅम दिले गेले आहे.

Xiaomi Mi 5 Performance Comparison
Create bar charts
 
 

जर आपण ह्याची सॅमसंगच्या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोनची तुलना केली, तर ह्यात क्रोम ब्राउसिंगमध्ये थोडा वेळ लागतो आणि फेसबुकचे इन्स्टंट आर्किकल उघडायलाही थोडा वेळ लागतो. मात्र ब्राउजिंग व्यतिरिक्त हा फोन खूप फास्ट आहे.

फीचर
LG G5 स्मार्टफोनची कॉल क्वालिटीसुद्धा खूप चांगली आहे. ह्यात सिग्नल ड्रॉप होण्याचीही समस्या उद्भवत नाही. ह्यात Hi-Fi प्लस ऑडियो DAC आहे. G5 चा स्वत: चा म्हणावा तितका वाईट नाही. ह्याची साउंड क्वालिटी खूप चांगली आहे. त्याशिवाय ह्यात पॉवर ऑन-ऑफ बटन बॅक डबल फिंगरप्रिंट सेंसरसह दिले आहेत.

बॅटरी
ह्यात 2800mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा १० तासांचा बॅटरी बॅकअप देतो. ह्यात ४ फोन कॉल्स, ३५ मिनिट सलग गेम्स खेळल्यानंतर, काही फोटो काढल्यानंतर, व्हिडियो काढल्यानंतर आणि IMs आणि मेल चेक केल्यानंतर फोनची बॅटरी १० तास आरामात चालली. मात्र तरीही ह्या स्मार्टफोनची बॅटरी लाइफ म्हणावी तितकी चांगली नाही. सॅमसंग गॅलेक्सी S7 एजमध्येही ह्याच गोष्टी वापरल्यानंतर ह्याची बॅटरी १६.५ तासांचा बॅटरी बॅकअप देते.

त्याशिवाय LG G5 मध्ये क्वालकॉमचा क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. हा फोन जलद गतीने चार्ज होतो.

कॅमेरा


LG G5 मध्ये 16 मेगापिक्सेल आणि ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. एका कॅमे-यात 78 डिग्री स्टँडर्ड लेन्स आणि दुस-या कॅमेरा 135 डिग्री वाइड अँगल्स लेन्स वापरण्यात आली आहे. ही स्मार्टफोन कॅमे-यातील आतापर्यंतची सर्वात मोठी वाइड अँगल लेन्स आहे. LG नुसार, वाइड अँगल लेन्सच्या मदतीने यूजर आधीपेक्षा जास्तच लँडस्केप, मोठी बिल्डिंग आणि आपल्या जागेवर न हलता एखादी गोष्ट अगदी सहजपणे कॅप्चर करु शकतो. फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.

LG G5 Camera Samples

 

८ मेगापिक्सेल सेंसरद्वार काढलेले फोटो रियर कॅमे-याच्या फोटोंसारखे चांगले आले नाही. त्याशिवाय ह्यातून व्हिडियो शूटिंग करताना थोड्या अडचणी येतात. ttt

निष्कर्ष
LG G5 स्मार्टफोन 2016 चा एक इनोवेटिव फोन असू शकतो. मात्र हा सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन आहे असे आपण बोलू शकत नाही. ह्या स्मार्टफोनचे मॉड्यूलर डिझाईन अजून चांगले करता आले असते आणि ह्याची बॅटरी लाइफसुद्धा अजून चांगली बनवता आली असती. हा स्मार्टफोन बाजारात आतापर्यंतचा सर्वात जलद स्मार्टफोन असल्याचे बोलले जात आहे. ह्यात एक चांगला कॅमेरा दिला आहे. जर तुम्ही आम्हाला विचारत असाल की, हा फोन खरेदी करावा की नाही, तर आम्ही सांगू की, ह्या फोनमध्ये तसे काही वाईट नाही. मात्र तरीही आम्ही ह्या फोनऐवजी सॅमसंग गॅलेक्सी S7 एज स्मार्टफोन घ्या असे सुचवू.

एलजी G5 Key Specs, Price and Launch Date

Price:
Release Date: 15 May 2017
Variant: 32GB
Market Status: Launched

Key Specs

 • Screen Size Screen Size
  5.3" (1440 x 2560)
 • Camera Camera
  16 | 8 MP
 • Memory Memory
  32 GB/4 GB
 • Battery Battery
  2800 mAh
logo
Team Digit

All of us are better than one of us.

Advertisements
Advertisements

एलजी G5

Buy now on amazon ₹ 12990

एलजी G5

Buy now on amazon ₹ 12990

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status