कार्बन क्वाट्रो L50 HD Review

ने Ashvani Kumar | अपडेट Mar 02 2016
कार्बन क्वाट्रो L50 HD Review
  • PROS
  • आकर्षक कॅमेरा
  • उत्कृष्ट डिस्प्ले
  • गेमिंगसाठी उत्कृष्ट फोन
  • कामगिरी ठिकठाक आहे
  • CONS
  • युआय थोडा त्रासदायक आहे
  • डिझाईन ठिकठाक आहे
  • फिंगरप्रिंट सेंसर असायला हवे होते.

निर्णय

जर तुम्ही ८ हजाराच्या आत एक आकर्षक कॅमेरा, उत्कृष्ट डिस्प्ले आणि गेमिंगसाठी एक उत्कृष्ट स्मार्टफोन घेऊ इच्छित असाल, तर हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय आहे.ह्या स्मार्टफोनच्या किंमतीच्या तुलनेत हा खूपच आकर्षक स्मार्टफोन आहे. कार्बन क्वाट्रो L50 HD ची डिस्प्ले उत्कृष्ट आहे. ह्याचे व्ह्यूविंग अँगल्ससुद्धा उत्कृष्ट आहे. आपण ह्या स्मार्टफोनच्या माध्यमातून हेव्ही गेमिंगचा अनुभव घेऊ शकता. ह्यावर खूप वेळ हेवी गेमिंग केल्यानंतरही हा गरम होत नाही. हो , मात्र एका ठराविक वेळेनंतर हा गरम होणे सुरु होतो. पण हे  सर्वसाधारण बाब आहे. पण जर तुम्ही ह्या फोनशिवाय एक असा फोन घेऊ इच्छिता जो आपल्या डिझाईन, फिंगरप्रिंट सेंसर आणि किंमतीने सर्वांना चकित केले आहे, तर आपण कूलपॅड नोट ३ लाइट घेऊ शकता.

BUY कार्बन क्वाट्रो L50 HD
Price 7880

कार्बन क्वाट्रो L50 HD detailed review

 


डिझाईन आणि रचना

कार्बन क्वाट्रो L50 HD स्मार्टफोनची डिझाईन आणि रचनेने मला जास्त प्रभावित केले नाही. कंपनीला ह्या स्मार्टफोनच्या डिझाईनसह अजून बरेच काही करता आले असते, मात्र कंपनी ह्या स्मार्टफोनला एक साधारण डिझाईनसह बाजारात आणू इच्छित होती. कदाचित ह्या फोनला कूलपॅड नोट 3 आणि नोट 3 लाइट सारखा बनवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, मात्र ह्या स्मार्टफोनमध्ये त्या स्मार्टफोनशी मिळते-जुळते, डिस्प्लेच्यावर एक स्ट्रीप दिली गेली आहे, ज्याचे रंग सारखाच म्हणजेच सोनेरी आहे. ह्या स्ट्रीपमुळेच ह्या स्मार्टफोनच्या डिझाईनला थोडासा चांगला लूक मिळालाय. मला स्मार्टफोनचे डिझाईन सॅमसंगच्या जुन्या स्मार्टफोनशी मिळता-जुळता वाटला. ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 5 इंचाची डिस्प्ले मिळत आहे.

 

डिस्प्ले आणि UI

जसे की मी आधीच सांगितले की, मला ह्या स्मार्टफोनची डिस्प्ले काही खास वाटली नाही. तथापि, ह्याच्या डिस्प्ले थोडी ब्राइटनेस कमी केली तर, खूप अंधार झाल्यासारखा वाटतो. पण ह्याचे व्ह्यूविंग अँगल्स चांगले आहेत. आपण ह्याच्या डिस्प्लेला कोणत्याही दिशेला फिरवला, तरीही तुम्हाला ह्यात कोणतीही कमतरता वाटणार नाही. ८ हजाराच्या किंमतीत अशी डिस्प्ले असणे एक चांगली गोष्ट आहे. ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 720x1280 पिक्सेल आहे. ज्याची पिक्सेल तीव्रता 294ppi आहे. आणि हा डिस्प्ले सामान्य प्रकाशापासून अगदी सूर्यप्रकाशातपर्यंत चांगली लाइट देतो.

हा, पण ह्याच्या युआयविषयी मी खूपच संभ्रमात आहे. मी हे अशासाठी सांगत आहे की, कारण जे फीचर ज्या जागी असायला पाहिजे, ते त्या जागी नसून दुस-या भलत्याच जागी आहे. अशामुळे तुम्हाला जी गोष्ट सोप्या पद्धतीने मिळायला हवी होती, ती सोप्या पद्धतीने मिळत नाहीय. मात्र जर हा फोन तुम्ही सलग दोन महिने वापरला तर तुम्हाला ह्याच्या फीचरच्या ठराविक जागा कळतील.

 

कामगिरी आणि बॅटरी

ह्याच्या कामगिरीविषयी बोलायचे झाले तर , जर ह्या स्मार्टफोनमध्ये मिडियाटेक प्रोसेसर असला असता, तर कूलपॅड नोट 3 लाइट आणि इतर दोन स्मार्टफोन्स मिजू M2 आणि एसर लिक्विड Z530 मध्ये आहेत, तर हा एक उत्कृष्ट परफोर्मन्स देणारा फोन असला असता. ह्या स्मार्टफोनमध्ये 1.3Ghz चे क्वाड-कोर प्रोसेसर दिले गेले आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो. तथापि ह्या किंमतीमध्ये हा एक उत्कृष्ट परफॉर्मन्स असलेला स्मार्टफोन सांगितला जाऊ शकतो. कारण मी ह्यावर 1 तास हेव्ही गेमिंग केले पण. हा काही गरम झाला नाही.  

 

ह्याची बॅटरी खूप उत्कृष्ट आहे, कारण हेवी गेमिंग केल्यानंतरसुद्धा ह्या स्मार्टफोनची बॅटरी जवळपास 4-5 तास चालते आणि जर आपण ह्याचा सर्वसाधारण वापर केला तर ह्याची बॅटरी ५ ते ७ तास चालते. मी ह्या स्मार्टफोनमध्ये कॉलिंगपासून ब्राउझिंग आणि गेमिंगपासून फोटोग्राफी सर्वकाही केले, पण मला ह्याच्या उत्कृष्ट कामगिरीने प्रभावित केले. फक्त ह्याचा टच थोडा चांगले काम करत नाही. ह्याची कामगिरी आकर्षक फ्लॅगशिप वाली आहे. पण ह्याच जर कोणता दुसरा प्रोसेसर असला असता, तर ह्या स्मार्टफोनने ह्या किंमतीतील इतर स्मार्टफोनला पछाडले असते. तसेच ह्या स्मार्टफोनमध्ये कंपनीने फिंगरप्रिंट सेंसर दिले असते, तर सोन्याहून पिवळे झाले असते. ह्याचा बेंचमाक्र स्कोरसुद्धा खूप चांगला आहे. 2GB ची रॅम असल्यामुळे ह्या स्मार्टफोनमध्ये आपण उत्कृष्टरित्या मल्टिटास्किंगचा आनंद घेऊ शकला असता. मात्र ह्याचे नेविगेशन बटन तुम्हाला थोडे वेगळे वाटतील. कारण मल्टिटास्किंगसाठी आपल्याला मध्य बटनवर दोन वेळा क्लिक करावे लागते, जे थोडे विचित्र वाटते. आपण येथे ह्या स्मार्टफोनचे बेंचमार्क स्कोर आणि त्याच्या इतर स्मार्टफोन्ससह तुलना करु शकता.

 

karbonn quattro l50 hd
Create bar charts

 

 

कॅमेरा

ह्याचा कॅमेरा खूपच चांगला आहे आणि ज्याने मी आधी म्हटल्याप्रमाणे मी प्रभावित झालो आहे. ह्या स्मार्टफोनला मी एका कार्यक्रमात रात्रीचे वापरुन पाहिले, तर त्यातून खूप चांगले फोटो आले. ह्या फोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला आहे, जो ३० फ्रेमवर सेकंदाच्या हिशोबाने चांगले फोटो काढतो. त्याशिवाय ह्यात आपल्याला LED फ्लॅशसुद्धा मिळत आहे. ह्या कॅमे-याने आपण 1080p ची व्हिडियो रेकॉर्डिंगसुद्धा करु शकतो. ह्यात अगदी कमी प्रकाशापासून जास्त प्रकाशापर्यंत चांगेल फोटो येतात. त्याशिवाय ह्या 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे, जो सेल्फीसाठी उत्कृष्ट असा कॅमेरा आहे.  आपण ह्या स्मार्टफोनने त्या कार्यक्रमात काढलेेले फोटो येथे पाहू शकता, मात्र ह्यातीला काही फोटोंना रिसाइज केले गेले आहे, ज्याने तुम्हाला हे थोडे वेगळे वाटू शकते.

 

    

  

निष्कर्ष

जर तुम्ही ८ हजाराच्या आत एक आकर्षक कॅमेरा, उत्कृष्ट डिस्प्ले आणि गेमिंगसाठी एक उत्कृष्ट स्मार्टफोन घेऊ इच्छित असाल, तर हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय आहे.ह्या स्मार्टफोनच्या किंमतीच्या तुलनेत हा खूपच आकर्षक स्मार्टफोन आहे. कार्बन क्वाट्रो L50 HD ची डिस्प्ले उत्कृष्ट आहे. ह्याचे व्ह्यूविंग अँगल्ससुद्धा उत्कृष्ट आहे. आपण ह्या स्मार्टफोनच्या माध्यमातून हेव्ही गेमिंगचा अनुभव घेऊ शकता. ह्यावर खूप वेळ हेवी गेमिंग केल्यानंतरही हा गरम होत नाही. हो , मात्र एका ठराविक वेळेनंतर हा गरम होणे सुरु होतो. पण हे  सर्वसाधारण बाब आहे. पण जर तुम्ही ह्या फोनशिवाय एक असा फोन घेऊ इच्छिता जो आपल्या डिझाईन, फिंगरप्रिंट सेंसर आणि किंमतीने सर्वांना चकित केले आहे, तर आपण कूलपॅड नोट ३ लाइट घेऊ शकता.

 

कार्बन क्वाट्रो L50 HD Key Specs, Price and Launch Date

Price: ₹7880
Release Date: 02 Mar 2016
Variant: 16GB
Market Status: Launched

Key Specs

  • Screen Size Screen Size
    5" (720 x 1280)
  • Camera Camera
    13 | 5 MP
  • Memory Memory
    16 GB/2 GB
  • Battery Battery
    2600 mAh
logo
Ashvani Kumar

Ashvani Kumar is Tech, Politics, and Sports lover.

Advertisements
Advertisements

कार्बन क्वाट्रो L50 HD

Price : ₹7880

कार्बन क्वाट्रो L50 HD

Price : ₹7880

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status