आयबॉल अॅडी HD 6 Review

ने Ashvani Kumar | अपडेट Jan 19 2016
आयबॉल अॅडी HD 6 Review
 • PROS
 • डिस्प्ले चांगली आहे, पण खास नाही
 • बॅटरी कामगिरी उत्कृष्ट आहे
 • कॉल परफॉर्मन्स ठीकठाक आहे.
 • गेमिंग केली जाऊ शकते.(मात्र हेव्ही गेमिंगसाठी फोन बनला नाही)
 • CONS
 • फोन टच परफॉर्मन्स चांगला नाही.
 • हेव्ही गेमिंगदरम्यान गरम होतो.
 • युआयसुद्धा चांगला नाही.
 • डिस्प्लेचे व्ह्यूविंग अँगल्स चांगले नाही.
 • फोन थोडा जास्तच मोठा आहे.

निर्णय

तसे बाजारात ७,००० रुपयात उत्कृष्ट स्मार्टफोन्स आहेत. मात्र काही वेगळे करण्याच्या हेतूने आयबॉलने बाजारात ह्याच किंमतीत आणि सारख्या स्पेक्ससह आयबॉल अँडी HD 6 हा स्मार्टफोन आणला आहे. ह्या किंमतीत अनेक दुसरे फोन ह्या स्मार्टफोनपेक्षा जास्त चांगली कामगिरी करतात. ह्याची खास गोष्ट म्हणजे ह्यावर आपण हेव्ही गेमिंग करु शकता. मात्र काही वेळानंतर आपल्याला ह्या स्मार्टफोनमध्ये काही अडथळे येतात. ह्याचा फोन डिस्प्ले जास्त चांगला नाही आणि व्ह्यूविंग अँगल्ससुद्धा जास्त चांगला नाही. तसेच हा 4G स्मार्टफोन नाही, पण जर आपण 4G स्मार्टफोन घेऊ इच्छिता तर ह्यापेक्षा कमी किंमतीत आपल्याला 4G स्मार्टफोन मिळतील. जसे की लेनोवो A2010 आणि यू यूनिक इत्यादी. पण तरीही आपल्याला ह्या स्मार्टफोनविषयी अधिक माहिती करुन घ्यायची असेल तर आपण हा रिव्ह्यू वाचा.

BUY आयबॉल अॅडी HD 6
Buy now on amazon स्टॉक मध्ये नाही 6700

आयबॉल अॅडी HD 6 detailed review

डिझाईन आणि रचना


ह्या फोनला पाहिल्यावर हा मेटल बॅकने सुसज्ज आहे, मात्र एकदम लक्षपुर्वक पाहिले तर, हे मेटल नाही, प्लॅस्टिक बॅक आहे, ज्याला मेटलसारखा लूक दिला गेला आहे. फोनच्या बॅटरीला ह्यापासून दूर केले जाऊ शकत नाही, मात्र ह्यात छोटासा पॅनल मिळतो, ज्याला हटवून आपण आपले काम करता. मात्र ह्या फोनचा आकार खूपच (6 इंच) मोठा आहे. एक फॅबलेट लूक देण्याच्या प्रयत्नात कंपनीने ह्या स्मार्टफोनला हाताळणे खूप त्रासदायक करुन ठेवले आहे. मात्र जर ह्याच्या फ्रंट डिझाईनविषयी बोलायचे झाले तर, हा ह्या रेंजमध्ये येणा-या इतर स्मार्टफोन्सप्रमाणे दिसतो. मात्र कंपनीने त्यातही थोडे वेगळे लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे चित्र दिसत आहे, कारण हा तेवढा खास दिसत नाही आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा काही विशेष चांगले नाही. फोनचे डिझाईन थोडे विचित्र आहे.

ह्यात स्मार्टफोनच्या डिस्प्ले खाली बॅक, होम आणि मेनूसाठी तीन वेगवेगळे नेविगेशन बटन दिले आहेत. मल्टीटास्किंगसाठी होम बटनवर दोन वेळा टॅपिंग करावे लागेल. डिस्प्लेच्या वर 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे.फोनच्या सरळ बाजूस पॉवर आणि वॉल्यूम रॉकर बटन दिले गेले आहे.

एकूणच ह्याच्या डिझाइनविषयी बोलायचे झाले तर ह्याचे डिझाइन खूप चांगले आणि साधे आहे. फोनचे चारही बाजूला चंदेरी रंगाची प्लॅस्टिक स्ट्रिपसारखे एक वेगळा लूक प्रदान करते आणि ह्यामुळे फोन साधारण न दिसता थोडा वेगळा दिसतो.

डिस्प्ले आणि युआय

ह्या स्मार्टफोनच्या डिस्प्लेला पाहिल्यावर असे सांगू शकतो, कंपनीने ह्याच्या डिस्प्लेवर बरेच काम केले आहे आणि चांगला डिस्प्ले असलेला स्मार्टफोन आणण्याचाही पुर्णपणे प्रयत्न केला आहे. ह्या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्याचा डिस्प्ले. ह्यात ५ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन ७२० पिक्सेल आहे. ह्या स्मार्टफोनचा डिस्प्ले ब्राइटनेस कमी केला तरीही, ह्याची डिस्प्ले स्पष्ट दिसते. तसेच सूर्यप्रकाशात पाहताना ह्याची डिस्प्ले स्पष्ट दिसते. मात्र अतिसूर्यप्रकाशात हा डिस्प्ले पाहताना थोडी समस्या नक्कीच निर्माण होते. मात्र ह्याच्या डिस्प्लेने मी नक्कीच प्रभावित झालो आहे. पण ह्याचा टच म्हणावा तितका चांगला नाही. टायपिंग दरम्यान आपल्याला अनेक समस्या येतात.

ह्या स्मार्टफोनच्या युआयविषयी बोलायचे झाले तर, आजकाल स्मार्टफोनमध्ये दिसणा-या युआयपेक्षा हा जास्त चांगला नाही. मात्र ह्याच्या किंमतीच्या तुलनेत हा चांगला आहे. फोनमध्ये अॅनड्रॉईड 4.4.2 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम दिला गेला आहे, जो मला ठीक वाटला नाही. कारण ह्याआधी अनेक स्मार्टफोन्स अॅनड्रॉईड 5.0 आणि 5.1 लॉलीपॉपसह लाँच केले आहेत.

कामगिरी

ह्या स्मार्टफोनमध्ये 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर दिला गेला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 1GB ची रॅमसुद्धा मिळत आहे. कामगिरी पाहता स्मार्टफोनची ब्राउझिंग म्हणावी तितकी चांगली नाही. त्याशिवाय ह्यात HD गेमिंग करु शकता, पण तीही प्रभावीपणे मांडण्यात आलेली नाही. तसेच हा स्मार्टफोन हेव्ही गेमिंगसाठी बनलेला नाही. एकूणच ह्याची कामगिरी आपण म्हणावी तितकी उत्कृष्ट नाही.

कॅमेरा

ह्या फोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये दिला गेलेला कॅमेरा दिवसाच्या प्रकाशात आणि फ्लोरोसेंट प्रकाशात चांगला काम करतो. ह्यातून काढलेले फोटोसुद्धा चांगले आहे. ह्याच्या फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिवसाच्या प्रकाशात चांगले फोटो काढतो. मात्र कमी प्रकाशात हा चांगला काम करत नाही. तथापि, थोडी शार्पनेसची कमतरता पाहायला मिळाली. त्यामुळे ह्या स्मार्टफोनची ह्या किंमतीतील इतर स्मार्टफोनशी केली तर,हा खूप मागे पडतो.

थोडक्यात सांगायचे झाले तर, ह्याची खास गोष्ट म्हणजे ह्यात आपण HD व्हिडियो शूटिंग करु शकतो. आणि खरोखरच ह्यातून खूप चांगली HD व्हिडियो शुटिंग होते, मात्र तरीही मला ह्याचा कॅमेरा तितका प्रभावशाली वाटला नाही.

बॅटरी

ह्या स्मार्टफोनमध्ये 2600mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. ह्या व्यतिरिक्त आम्ही कार्बनच्या मॅक 5 मध्ये 2200mAh क्षमतेची बॅटरी पाहिली होती. जर ह्याच्या कामगिरीवर एक नजर टाकली तर, ही बॅटरी सामान्य कॉल्स, मेसेजिंग, ब्राउजिंग आणि म्यूजिक चालवण्यासाठी जवळपास एक दिवस काम करण्यास सक्षम आहे. बॅटरी टेस्टमध्ये ह्याने ७ तास व्यवस्थितरित्या कामे केली. एकूणच ह्याची बॅटरी चांगली आहे. हेव्ही गेमिंग करताना ह्याची १५ टक्के बॅटरी कमी होते, पण त्यात काही वावगं नाही.

निष्कर्ष

एकूणच ह्या किंमतीमधील हा एक चांगला स्मार्टफोन आहे. फोनमध्ये आपल्याला 1GB रॅम, आकर्षक डिस्प्ले आणि चांगली बॅटरी मिळते. तथापि, ह्याची टच चांगला नाही. मात्र ह्याचे अन्य फीचर्स  आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा चांगला स्मार्टफोन आहे. तसेच ह्याच किंमतीत आपण अजून चांगला स्मार्टफोन घेऊ इच्छिता, ज्यात आपल्याला 4G वापरता येईल, तर आपण लेनोवो A2010 आणि यू चा यूनिक घेऊ शकता.

आयबॉल अॅडी HD 6 Key Specs, Price and Launch Date

Price:
Release Date: 11 May 2017
Variant: 8GB
Market Status: Launched

Key Specs

 • Screen Size Screen Size
  6" (720 x 1280)
 • Camera Camera
  8 | 5 MP
 • Memory Memory
  8 GB/1 GB
 • Battery Battery
  3000 mAh
logo
Ashvani Kumar

Ashvani Kumar is Tech, Politics, and Sports lover.

Advertisements
Advertisements

आयबॉल अॅडी HD 6

Buy now on amazon ₹ 6700

आयबॉल अॅडी HD 6

Buy now on amazon ₹ 6700

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status