क्रिओ मार्क 1 Review

ने Prasid Banerjee | अपडेट May 05 2016
क्रिओ मार्क 1 Review
DIGIT RATING
59 /100
  • design

    70

  • performance

    42

  • value for money

    47

  • feature

    79

User Rating : 1/5 Out of 1 Reviews
  • PROS
  • दिसायला चांगला
  • CONS
  • खराब कामगिरी
  • तकलादू बॉडी
  • फ्यूल ऑपरेटिंग सिस्टम ठिक नाही

निर्णय

क्रिओ मार्क 1 शाओमी रेडमी नोट 3 पेक्षा 50 टक्के कमी आहे आणि LeEco पेक्षा ३० टक्के कमी आहे. हा फोन दिसायला चांगला आहे, मात्र ह्याच्या बॉडीविषयी बोलायचे झाले तर, ती म्हणावी तितकी खास नाही. ह्या सेगमेंटमध्ये बाजारात  इतके चांगले फीचर्स असलेले स्मार्टफोन्स आहेत, त्यामुळे १९,९९९ रुपयात हा स्मार्टफोन घेण्याचे काही विशेष कारण बनत नाही.

BUY क्रिओ मार्क 1

Price 19999

क्रिओ मार्क 1 detailed review

१९,९९९ रुपयाच्या किंमतीत हेलिओ X10, QHD डिस्प्ले आणि 3GB रॅम देणे ही काही ह्या स्मार्टफोनची विशेष गोष्ट नाही. आम्ही अनेकदा सांगतो की, स्पेक्स म्हणावे तितके महत्त्वाचे नाही, पण जेव्हा अॅनड्रॉईडची गोष्ट येते, तेव्हा ते महत्त्वाचे बनते. कंपनीचा दावा आहे की, मार्क 1 यूजर्सला प्रत्येक महिन्यात एक सॉफ्टवेअर अपडेट करुन देईल, जेणेकरुन यूजर्सला दर महिन्यात आपण नवीन फोन वापरत आहोत, असे वाटेल.


Creo Mark 1 मध्ये काही समस्या नक्कीच आहेत. ज्यामुळे हार्डवेअरमध्ये काही अडचणी येतात. क्रिओ मार्क 1 मध्ये फ्यूल ऑपरेटिंग सिस्टमवर सादर केेले गेले आहे, जो अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.

कामगिरी

ह्याच्या कामगिरीबाबत सांगायचे झाले तर, हा बाजारात विकला जाणार सर्वात दुबळा असा स्मार्टफोन आहे. जेथे ह्याच्या QHD डिस्प्लेमुळे ह्याचा लूक चांगला वाटतो पण कामगिरीमुळे हा दुबळा बनतो. ह्याच्या मेनूमध्ये जाण्यासाठी ६ मिनिटे लागली , जी ह्याच्या कामगिरीच्या दृष्टीने चांगले वाटले नाही. ह्यात हेव्ही गेम आणि अॅपचा चा वापरले असता, त्यात अनेक अडचणी आल्या.

 

Creo Mark 1 Performance
Create bar charts

 

फ्यूल ऑपरेटिंग सिस्टम
क्रिओचा पहिला फोन सर्वसामान्य लोकांसाठी चांगला आहे. जर ह्याचा फ्यूल ऑपरेटिंग सिस्टम आपल्याला ठिकाणाची माहिती देतो. ह्यात सेंस, इको आणि रिट्रायवर सारखे अतिरिक्त फीचर दिले गेले आहेत. सेंस खासकरुन सर्च फीचर आहे. ह्याच्या माध्यमातून आपण होम बटन वर दोनदा टच करुन फोनमध्ये इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या कोणत्याही गोष्टी शोधू शकता. हा बहुतकरुन अॅप्पल iOS सारखाच आहे. तसेच ह्यात इको आन्सरिंग मशीन आहे. आपण कोणत्याही कॉल, मेसेज, कॉल किंवा रेकॉर्डेड व्हॉईसचे उत्तर देऊ शकता. जर तुमच्या फोनमध्ये इंटरनेट नसेल किंवा कोणत्या ऑपरेटर सर्विसने रजिस्टर केले नसेल, तरीसुद्धा तुम्ही हे काम करु शकता.

                              
                                            Fuel OS (L-R) Lock Screen, Home Screen, Refuel App

                             
                                                    Fuel OS (L-R) Echo Screen in Dialler, Retriever App, Quick Settings

                                                                           

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी क्रिओ मार्क 1 मध्ये २१ मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा दिला गेला आहे, तर ८ मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा मुख्य कॅमेरा PDAF फीचरने सुसज्ज आहे. तसेच हा 4K व्हिडियो रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे. सेल्फी कॅमेरा 86 डिग्री वाइड अँगल्स लेन्ससह लाँच केला आहे आणि ह्यात ब्यूटिफाय मोडसुद्धा मिळेल.

                                              
                                                         (L-R) Daylight, Direct Fluorescent, Diffused Fluorescent, Low Light (Click to enlarge)

बॅटरी

क्रिओ मार्क 1 मध्ये पॉवर बॅकअपसाठी 3100 mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही २१ तासांची बॅटरी लाइफ देण्यास सक्षम आहे. ड्यूल सिम सपोर्ट करणा-या ह्या फोनमध्ये 3G, वायफाय, ब्लूटुथसह 4G LTE सपोर्ट आहे.
 

बिल्ड आणि डिझाईन
क्रिओ मार्क 1 चा लूक खूप चांगला आहे. ह्याचे डिझाईन बहुतकरुन सोनी एक्सपिरियासारखे आहे. ह्यात फिंगरप्रिंट सेंसर आणि बरेच फीचर्स दिले गेले आहेत. ह्याचे मायक्रो-USB पोर्ट ह्याच्या बॉडीला खूप दुबळा करतो.

निष्कर्ष
१९,९९९ रुपयाच्या किंमतीत येणारा क्रिओ मार्क 1 ची कामगिरी कूलपॅड नोट 3 पेक्षाही खराब आहे. ह्या सेगमेंटमध्ये बाजारात  इतके चांगले फीचर्स असलेले स्मार्टफोन्स आहेत, त्यामुळे १९,९९९ रुपयात हा स्मार्टफोन घेण्याचे काही विशेष कारण बनत नाही.

 
logo
Prasid Banerjee

Trying to explain technology to my parents. Failing miserably.

Advertisements
Advertisements

क्रिओ मार्क 1

Price : ₹19999

क्रिओ मार्क 1

Price : ₹19999

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.