Comio x1 note Review: Comio X1 Note रिव्यु: याची प्रीमियम डिजाईन आहे याची सर्वात मोठी ताकद

ने Siddhesh Jadhav | अपडेट Jul 05 2018
Comio x1 note Review: Comio X1 Note रिव्यु: याची प्रीमियम डिजाईन आहे याची सर्वात मोठी ताकद
DIGIT RATING
60 /100
 • design

  54

 • performance

  53

 • value for money

  57

 • features

  68

 • PROS
 • फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेंसर
 • शानदार डिजाईन
 • सेल्फी इनट्रूडर फीचर
 • कॉल रिकॉर्डिंग
 • CONS
 • एवरेज कॅमेरा
 • एवरेज डिस्प्ले
 • प्लास्टिक बॉडी

निर्णय

भारतीय स्मार्टफोन बाजार दिवसेंदिवस वाढत आहे पुढे जात आहे, त्यामुळे इथे प्रत्येक प्रकारेच स्मार्टफोंस लॉन्च होत आहे. या स्मार्टफोंस मध्ये तुम्हाला काही बेस्ट डिस्प्ले, काही बेस्ट कॅमेरा, काही बेस्ट डिजाईन आणि बनावटी चे मिळतील, तर काही तुम्हाला किंमती मुळे आवडतील. पण आज Comio X1 Note डिवाइस तुम्हाला याच्या डिजाईन मुळे आवडेल. या डिवाइस ची किंमत Rs 9,999 आहे, आणि आपल्या डिजाईन मुळे हा यूजर्स मध्ये आपली वेगळी ओळख बनवू शकतो. हा डिवाइस एका मिरर ग्लास फिनिश डिजाईन सह लॉन्च करण्यात आला आहे, तसेच हा काही अंशी Moto G सीरीज च्या स्मार्टफोन सारखा वाटतो, दोघांचेही कॅमेरा यूनिट एक सारखे असल्यामुळे हे सारखे वाटतात.  

जर एखाद्या डिवाइस च्या परफॉरमेंस इत्यादी ने काहीच फरक पडत नसेल, तर तुमच्यासाठी हा डिवाइस खुप शानदार ठरू शकतो. तसेच याच्या डिजाईन मुळे तुमचे मित्र प्रभावित होऊ शकतात. पण जर तुम्ही या किंमतीच्या आसपास इतर कोणताही डिवाइस घेऊ इच्छित असला तर तुम्हाला माहीतच असेल की या श्रेणीत  Xiaomi चा भारतीय बाजारात बोलबाला आहे, तसेच Honor ने पण मागच्या काही काळात काही चांगले डिवाइस लॉन्च केले आहेत. 

BUY Comio x1 note
Buy now on amazon उपलब्द 8995
Buy now on flipkart स्टॉक मध्ये नाही 5999

Comio x1 note detailed review

एकीकडे मागील वर्ष म्हणजे 2017 ड्यूल कॅमेरा आणि 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या डिस्प्ले सह लॉन्च होणार्‍या फोंस चे होते, तर 2018 मध्ये या दोन्ही फीचर्स सह फोन ची डिजाईन पण खास बनवण्याकरिता प्रयत्न केला जात आहे. जर एखाद्या स्मार्टफोन ची डिजाईन चांगली असेल तर तुम्ही त्याच्याकडे आकर्षित होता, यात दुमत नाही. हे खर आहे. भारतीय बाजारातील Honor च्या स्मार्टफोंस बद्दल बोलायचे झाले तर हे कमी किंमतीत मागच्या काही काळापासून खुप आकर्षित करणारी डिजाईन असलेले स्मार्टफोंस लॉन्च करून इतर अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोंसना टक्कर देण्यास सक्षम झाले आहेत. त्याचबरोबर सॅमसंग आणि अॅप्पल तर याकडे जास्त लक्ष देत आहेत, तसेच अनेक मोठ्या कंपन्या पण आपल्या फोन च्या डिजाईन मध्ये सुधार करत आहेत. सर्वांनाच माहिती आहे की जवळपास 90 टक्के बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोंस एक सारखे दिसतात, वेगवेगळ्या कंपन्यांचे काही पारंपरिक पैलू सोडले तर यांची ओळख पटवणे कठीण ठरेल. 


फक्त ब्रांडिंग आणि अजून काही गोष्टी याना एकमेकांपासून वेगळी ओळख देतात. आज आमच्याकडे Comio चा नवीन आणि कंपनी नुसार त्यांचा फ्लॅगशिप डिवाइस Comio X1 Note आहे. खरे पाहता हा आमच्याकडे खुप दिवसांपासुन आहे. याची रिव्यु प्रक्रिया तेव्हा पासून चालू आहे. हा डिवाइस अन-बॉक्स केल्यानंतर एक असा डिवाइस माझ्या हातात आला, याची डिजाईन खरच प्रशंसनीय आहे. आणि जो कुणी या डिवाइस ला बघेल त्यालाही हेच वाटले. फोन ला सुंदर डिजाईन देण्यात आली आहे. याला पहिल्यांदा बघून मला वाटलेले की यात एक मेटल यूनीबॉडी डिजाईन आहे. 

जी ग्लॉसी असल्यामुळे जास्तच प्रीमियम वाटते, पण थोड्याच वेळात मला समजले की हा मेटल ने नाही प्लास्टिक ने बनवण्यात आला आहे. तसे पाहता यात वापरण्यात आलेले मटेरियल खुप चांगले आहे, कारण यामुळे फोन लाइट वेट बनतो. यामुळेच याला एक स्लिम फॉर्म फॅक्टर पण मिळतो. याची डिजाईन पूर्णपणे ऑब्जर्व केल्यावर तुम्हाला याचा रियर पॅनल बघून असे वाटू शकते की हा Motorola च्या Moto G सीरीज मधील एखादा स्मार्टफोन आहे. पण यात तुम्हाला ड्यूल कॅमेरा सह फ्लॅश लाइट च्या पोजीशन मध्ये काही फरक दिसेल. हा डिवाइस आम्ही मागच्या काही दिवसांपासून वापरला आहे. चला तर जाणून घेऊया याच्या डिजाईन आणि बनावटी व्यतिरिक्त या डिवाइस मध्ये आम्हाला अजून काय काय आवडले. 

 

बनावट आणि डिजाईन

याची डिजाईन मला खुप आवडली आहे, पण कंपनी ने आपल्या या फ्लॅगशिप डिवाइस मध्ये एक ट्रेंडी डिस्प्ले दिला नाही, ज्याची कामतरता मला भासली. आपण मागच्या वर्षापासून यावर्षी पण बघितले आहे की बरेच स्मार्टफोंस ट्रेंडी डिस्प्ले सह लॉन्च करण्यात येत आहेत, मग ते बजेट मधील डिवाइस असो वा मिड-रेंज मधील किंवा मग हाई-एंड. सर्व स्मार्टफोंस मध्ये हा डिस्प्ले दिसत आहे, सध्या तर 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले लॉन्च केला जात आहे. याला ट्रेंड मधील बदल पण बोलू शकतो. पण याची किंमत म्हणजे Rs 9,999 पाहता हा एक प्रीमियम दिसणारा स्मार्टफोन बोलू शकतो, त्याचबरोबर यात एक 6-इंचाचा Full View FHD+ 2.5D curved चा मोठा म्हणजे 1080x2160 पिक्सल रेजोल्यूशन चा डिस्प्ले देण्यात आला आहे. 

पण टॉप आणि बॉटम ला बेजल्स असल्यामुळे हा डिस्प्ले तेवढा मोठा वाटत नाही. फोन ची बनावट पाहता हा यूनीबॉडी मेटल ने बनलेला आहे असे वाटते, पण असे नाही, हा एका ग्लॉसी प्लास्टिक मटेरियल ने बनवण्यात आला आहे, जो याला खास आणि प्रीमियम लुक देतो. टॉप बेजल्स var तुम्हाला proximity सेंसर सह याचा फ्रंट कॅमेरा आणि एक फ्लॅश मिळत आहे. तसेच बॉटम बेजल वर नेविगेशन बटन देण्यात आले नाहीत, त्यांना डिस्प्ले मध्येच जागा देण्यात आली आहे. जर हे बॉटम बेजल वर दिले असते तर याचा डिस्प्ले अजून मोठा करता आला असता. 

फोन च्या टॉप ला तुम्हाला याचा 3.5mm का ऑडियो जॅक मिळेल, जो सध्या USB Type C Port आल्यामुळे अनेक स्मार्टफोंस मधून काढून टाकण्यात आला आहे. तसेच याच्या बॉटम ला माइक्रो USB Port आणि स्पीकर ग्रिल्स आहेत, जे सध्या सर्वच स्मार्टफोंस मध्ये एक सारखाच दिसत आहे. राईट साइड ला तुम्हाला फोन च्या पॉवर बटन ची झलक मिळेल ज्याला जिगजॅग डिजाईन देण्यात आली आहे, त्याच्या वरच्या बाजूला सिम ट्रे आहे. सिम ट्रे दिल्यामुळे तुम्हाला समजलेच असेल की तुम्ही फोन चा बॅक पॅनल आणि बॅटरी वेगळी करू शकत नाही. लेफ्ट साइड ला तुम्हाला याचे वॉल्यूम रॉकर बटन मिळेल. 

सध्या डिजाईन मध्ये काही फेरबदल करून सर्व कंपन्या आपले स्मार्टफोंस वेगळे बनवू पाहत आहेत. या छोट्या मोठ्या बदलां मुळे स्मार्टफोंस एकमेकांन पेक्षा वेगळे दिसते. हा फोन प्रीमियम वाटण्याचे मोठे कारण याची बॅक डिजाईन आहे, फोन ला एक ग्लॉसी बॅक देण्यात आली आहे, ज्यामुळे हा खुप आकर्षक दिसतो. हा फोन दोन वेगवेगळ्या कलर वेरिएंट्स म्हणजे रॉयल ब्लू आणि सनराईज गोल्ड मध्ये सादर करण्यात आला आहे, आमच्याकडे रिव्यु साठी सनराइज गोल्ड डिवाइस आला आहे, पण जास्त आकर्षक रंग तर रॉयल ब्लू आहे. 

Honor ने पण काही स्मार्टफोंस भारतात याच रंगात लॉन्च केले आहेत आणि ते लोकांना आवडत आहेत. 

बॅक पॅनल वर तुम्हाला एक कॅमेरा यूनिट मिळत आहे, जो तुम्ही याआधी कुठे तरी पाहिला असेल, जर तुम्हाला फोन बद्दल माहिती मिळण्याची सवय असेल तर. या डिवाइस चा कॅमेरा यूनिट हुबेहुब Moto G सीरीज च्या एखाद्या स्मार्टफोन सारखाच आहे. तुम्हाला या डिवाइस मध्ये पण एक सर्कुलर शेप वाला कॅमेरा यूनिट मिळत आहे, ज्यात तुम्हाला ड्यूल कॅमेरा सेटअप व्यतिरिक्त एक LED फ्लॅश पण मिळत आहे. याच्या खाली एक सर्कुलर फिंगरप्रिंट सेंसर पण तुम्हाला मिळत आहे, जसा आपण सर्व स्मार्टफोंस बघतो. तसेच फिंगरप्रिंट सेंसर च्या खाली कंपनी ची ब्रांडिंग पण आहे. आपण असे म्हणू शकतो की आपल्या डिजाईन साठी किंवा डिझाईन मुळे बाजारात आपली ओळख निर्माण करण्यात हा फोन यशस्वी होऊ शकतो.

डिस्प्ले आणि अन्य स्पेसिफिकेशन


फोन मध्ये एक 6-इंचाचा Full View FHD+ 2.5D curved डिस्प्ले मिळत आहे, जो मला एवरेज वाटला, तुम्ही फोन. सेटअप केल्यानंतर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा डिस्प्ले बघता तेव्हाच तुम्हाला समजते की याचा डिस्प्ले एवरेज आहे, कंपनी ने डिस्प्ले मध्ये काही नवीन करण्याचा प्रयत्नच केला नाही, याची ब्राइटनेस ठीक ठाक आहे आणि कलर री प्रोडक्शन पण चांगला आहे असे म्हणू शकतो. तसेच कंट्रास्ट इत्यादि पाहता चांगलाच आहे. जेव्हा तुम्ही फोन अनलॉक करता तेव्हा तुम्हाला समजते की हा डिस्प्ले खुप ब्राइट आहे, पण याचा डिस्प्ले चांगला नसल्यामुळे हा आपली ओळख बाजारात गमावू शकतो पण इतर फीचर्स म्हणजे डिजाईन इत्यादी याला वेगळे बनवतात. 


एकंदरीत मला या डिवाइस चा डिस्प्ले एवरेज वाटला. मुळात मोठा असल्यामुळे तुम्हाला यात विडियो आणि गेमिंग मध्ये खुप चांगला एक्सपीरियंस मिळेल. या स्मार्टफोन मध्ये एक फुल-व्यू डिस्प्ले असल्यामुळे हा थोडा हटके वाटतो, त्यामुळे याची वॅल्यू पण वाढते. पण जर बेजल्स कमी केले असते किंवा थिन केले असते तर तुम्हाला अजून मोठा डिस्प्ले मिळाला असता. आता थिक बेजल्स असल्यामुळेच तुम्हाला 6-इंचाचा मोठा डिस्प्ले असूनही असे वाटणार नाही की याचा डिस्प्ले इतका मोठा आहे. एकंदरीत आपण याला एवरेज म्हणू शकतो. 

 

डिस्प्ले व्यतिरिक्त याच्या UI पाहता तुम्हाला असे वाटेल की तुम्ही एक स्टॉक एंड्राइड च्या आसपास वाला डिवाइस विकत घेतला आहे. UI मध्ये जास्त काही बदल करण्याचा विचार केला गेला नाही, हा तुम्हाला स्टॉक एंड्राइड सारखाच वाटेल. आजकाल च्या फोंस मध्ये हा UI सहज दिसतो. डिवाइस स्टॉक एंड्राइड वर लॉन्च केल्यास यात अपडेट येणे लवकर सुरू होते पण जर तुम्ही यावर कोणतीही लेयर टाकल्यास यात अपडेट आणण्यात वेळ लागु शकतो, त्यामुळे आजकाल कंपन्या वेळेवर अपडेट देण्यासाठी आपल्या फोंस मध्ये स्टॉक एंड्राइड च्या आसपास चा UI देत आहेत. 

फोन च्या इतर फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन एंड्राइड 8.0 Oreo वर चालतो, तसेच यात एक क्वाड-कोर मीडियाटेक MT8735 चिपसेट आहे, याचा क्लॉक स्पीड 1.4GHz आहे, तसेच या फोन मध्ये तुम्हाला 3GB च्या रॅम व्यतिरिक्त 32GB ची इंटरनल स्टोरेज पण देण्यात आली आहे, जी तुम्ही माइक्रोएसडी कार्ड ने 128GB पर्यंत वाढवू शकता. याचा डिस्प्ले एक FHD पॅनल आहे आणि हा एका ड्यूरेबल स्क्रेच ग्लास ने सुरक्षित करण्यात आला आहे. फोन मध्ये एक 2900mAh क्षमता असलेली बॅटरी पण देण्यात आली आहे, जी आमच्या बॅटरी टेस्ट मध्ये जवळपास साडे पाच तास चालण्यास सक्षम होती. या सोबतच यात एक ड्यूल रियर कॅमेरा पण आहे, जो 13+5-मेगापिक्सल चा एक AF कॅमेरा कॉम्बो आहे, याव्यतिरिक्त यात एक 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण देण्यात आला आहे. 

रियर कॅमेरा मध्ये तुम्हाला काही ट्रेंडी फीचर मिळत आहे, ज्यात पोर्ट्रेट मोड पण आहे. याव्यतिरिक्त यात तुम्हाला फोन मध्ये एक इनट्रूडर सेल्फी फीचर पण मिळत आहे, हा तुमचा फोन अनलॉक करणार्‍या त्या व्यक्तीचा फोटो घेऊ शकतो, जो तुमच्या परवानगी शिवाय तुमचा फोन अनलॉक करत आहे, सोबतच तुम्हाला यात कॉल रिकॉर्डिंग चा फीचर पण मिळत आहे, फोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर सोबत फेसअनलॉक फीचर पण देण्यात आला आहे. याच्या फिंगरप्रिंट सेंसर ने फोन फक्त अनलॉक केला जात नाही तर कॉल्स घेऊ शकता, फोटो घेऊ शकता आणि अॅप्स मधून बाहेर येऊ शकता. 


हा स्मार्टफोन बाजारातील अनेक Rs. 12,000 रुपयांच्या स्मार्टफोन्सना टक्कर देऊ शकता, पण अनेक कारणांमुळे हा मागे राहू शकतो. स्मार्टफोन मध्ये 3GB चा रॅम आणि जवळपास 32GB ची इंटरनल स्टोरेज आहे, जी याला इतर अनेक स्मार्टफोंस च्या श्रेणीत नेऊन ठेवतो. 

कॅमेरा 

तुम्हाला माहितीच आहे यात एक ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात तुम्हाला एक 13-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये एक 8-मेगापिक्साल चा फ्रंट कॅमेरा पण आहे. फोन ची कॅमेरा परफॉरमेंस खुप स्लो आहे. स्मार्टफोन च्या कॅमेरा परफॉरमेंस बद्दल बोलायचे झाले तर मला ही एवढी काही आवडली नाही. याचा अर्थ फोटो घेताना काही अडचण आली असा होत नाही. 

पण सोशल मीडिया वर पोस्ट करण्या लायक फोटो हा स्मार्टफोन आपल्या ड्यूल कॅमेरा घेऊ शकतो. अर्थात् कॅमेरा तेवढा सक्षम नाही, पण किंमत पाहता या कॅमेरा सोबत कोम्प्रोमाईज केले जाऊ शकते. यातून मी कमीच फोटो घेतले पण जेव्हा मी ते माझ्या लॅपटॉप वरून बघितले तेव्हा मला आवडले नाहीत, तसे पाहता हा इतर फोन्स प्रमाणेच फोटो घेतो पण ते एवढे डिटेल्ड नाही वाटत. दिवसा हा चांगले फोटो घेऊ शकतो, पण रात्री यातून चांगले फोटो घेता येत नाहीत. 

 

फोन च्या फ्रंट कॅमेरा ची अवस्था काहीशी अशीच आहे. यातून पण मी काही फोटो घेतले आहेत पण हे फोटो तुम्ही फक्त सोशल मीडिया साठी वापरू शकता, कारण इतर ठिकाणी तुम्हाला हा निराश करू शकतो.

बॅटरी आणि परफॉरमेंस

फोन मध्ये तुम्हाला एक 2,900mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे, जी तुम्ही सहज दिवसभर वापरू शकता. आमच्य बॅटरी टेस्ट मध्ये या डिवाइस ची बॅटरी हेवीली वापरली असता फक्त 5:27 मिनिट चालली. हा स्मार्टफोन मी माझा गेमिंग शौक पूर्ण करण्यासाठी वापरला आहे आणि हे लक्षात आले की हा गेमिंग मध्ये तुम्हाला थोडा निराश करू शकतो. कधी कधी तुम्हाला वाटेल की हा फोन खुप जास्त गरम होत आहे. असे तुम्हाला चार्जिंग च्या वेळी पण वाटेल. पण याकडे तुम्ही किंमत बघितल्या नंतर दुर्लक्ष करू शकता. 

फोन ची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी जवळपास 1:30 ते 2:00 तास लागतात. त्यानंतर सतत वापर केल्यानंतरही असे वाटेल की यावर तुमचा संपूर्ण दिवस सहज जाऊ शकतो. याची बॅटरी तुम्हाला एक दिवस पुरेल एवढी आहे.  


वर सांगितल्याप्रमाणे फोन ची परफॉरमेंस सक्षम नाही. हा हेवी गेमिंग करणार्‍या लोकांसाठी बनवण्यात आला नाही, पण तुम्ही यावर नार्मल गेमिंग करू शकता. पण जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही यावर संपूर्ण गेमिंग आणि विडियो इत्यादी चा आनंद घेऊ शकाल तर हा तुम्हाला निराश करू शकतो. विशेष म्हणजे आमच्या टेस्ट मध्ये या डिवाइस वर काही बेंचमार्क टेस्ट करता आल्याच नाहीत, आम्ही अनेक प्रयत्न केले पण या टेस्ट करता आल्या नाहीत. 

त्यामुळे जर एखाद्या फोन मध्ये काही बेंचमार्क टेस्ट करताच येत नसतील तर तुम्ही अंदाज लावू शकता की याची परफॉरमेंस कशी असेल. मला वापरताना ही हा डिवाइस खुप स्लो वाटला. 

हा स्मार्टफोन त्या यूजर्स साठी परफेक्ट आहे, जे पहिल्यांदाच स्मार्टफोन घेत आहेत, त्याला या स्मार्टफोन मध्ये त्याच बजेट मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप आणि सर्वात खास फीचर म्हणजे फुल-स्क्रीन डिस्प्ले मिळेल. याव्यतिरिक्त याच्या काही फीचर्स पण मला आवडले आहेत पण तरीही हा डिवाइस एवरेजच वाटतो. जर तुम्हाला एक मिरर ग्लास फिनिश वाला असा डिवाइस घ्यायचा असेल तर तुम्ही हा डिवाइस घेऊ शकता. 

Comio x1 note Key Specs, Price and Launch Date

Price:
Release Date: 31 May 2018
Variant: 32GB
Market Status: Launched

Key Specs

 • Screen Size Screen Size
  6" (1080 x 2160)
 • Camera Camera
  13 + 5 MP | 8 MP
 • Memory Memory
  32 GB/3 GB
 • Battery Battery
  2900 mAh
Siddhesh Jadhav
Siddhesh Jadhav

Email Email Siddhesh Jadhav

About Me: Content Writer - Marathi Read More

Advertisements
Advertisements

Comio x1 note

Comio x1 note

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.