एचपी एन्वी १४ - J008TX हा एक बिझनेस लॅपटॉप आहे, पण एखाद्या सामान्य गेमर्ससाठी हा एक बहूउद्दशीय डिवाईस आहे. एचपी एन्वी प्रकारातील लॅपटॉपला प्रकाशावर अवलंबून असणारी हार्डवेअर आणि एक मजबूत चॅसिस असते. एचपी एन्वी 14 - J008Tx ही मागील वर्षी आलेल्या एचपी एन्वी k102tx चे पुढचे तंत्रज्ञान आहे. ह्याचे डिझाईन खूप चांगले आहे आणि त्याला पहिल्यांदा पाहिल्यावर त्याचे लूकही खूप खात्रीलायक वाटते. मग तो त्याच्या किंमतीप्रमाणे योग्य आहे का? चला तर मग शोधूयात.
डिझाईन आणि रचना
ह्याचे डिझाईन एकदम साधे ठेवले आहे. त्याचे झाकण आणि त्याचबरोबर कीबोर्ड हे अॅल्युमिनियमचे बनलेले असल्याने ते त्याला एकदम मजबूत बनवते. तसेच त्याची खालची बाजू ही प्लॅस्टिकची बनलेली आहे आणि हवा खेळती राहण्यासाठी खाली प्लॅस्टिकचे ग्रील्ससुद्धा आहेत.
लॅपटॉपच्या तळाशी २ रबर पट्टे दिले आहेत. तसेच त्याच्या झाकणाच्या मागील बाजूस २ रबर फिट्स दिले आहेत. हे कीबोर्डला उठवतो आणि टाईपिंगसाठी तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा ते वाकवतो.
डिस्प्ले
खरे पाहता १४ इंचाची असलेली १०८० पिक्सेल डिस्प्ले हे ह्या लॅपटॉपचे सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्य आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्याचे पाहण्याचे कोन खूप चांगले आहेत. ह्याचा १०८० पिक्सेल पॅनल हा खरच खूप चांगला आहे जो मॅट फिनिश असल्यामुळे पाहण्यास एकदम स्पष्ट आहे. त्यात न आवडण्यासारखी अशी काहीच गोष्ट नाही. त्याच्या टेक्स्टची दृश्यता आणि तीक्ष्णपणा ह्यामुळे त्यात अॅप्लीकेशन पासून ते अॅप्लीकेशन पर्यंत बदल होतात, ज्यामुळे विंडोज 8.1 मध्ये थोडे समस्या निर्माण होते. मात्र जेव्हा त्यात विंडोज १० टाकले जाईल आणि ग्राफिक्स ड्रायव्हर्स टाकले जातील तेव्हा ही समस्या दूर होईल.
कीपॅड आणि टचपॅड
एचपीचे चिकलेट प्रकाराचे कीबोर्ड हे म्हणावे तितके वाईट नाही. त्याच्या बटणांमध्ये योग्य असे अंतर आहेत. फक्त बाणाच्या बटणाममध्ये थोडी गर्दी वाटते. येथे गरजेपेक्षा जास्त मोकळी जागा असल्यामुळे तळहाताला खूप आराम मिळतो आणि त्यामुळे ह्यावर टाईप करताना अजिबात थकायला होत नाही. ह्या कीबोर्डला बॅकलीटसुद्धा आहे, पण त्याची तीव्रा बदलण्यासाठी कोणतीही सेटिग नाही. फक्त चालू/बंद करण्याचे बटण आहे. हे तुम्हाला फंक्शन कम शॉर्टकट की म्हणून काम करतात.
ह्याच्या टाईपिंगच्या अनुभवाविषयी बोलायचे झाले तर, ह्याच्या किज दाबल्यावर येणा-या श्रवणीय आवाजामुळे आपल्याला चांगला अनुभव येतो. जरी कीबोर्डचे बेस हे अॅल्युमिनियमचे असल्यामुळे ते तुटण्याची किंवा वाकण्याची समस्या उद्भवत नाही. कीबोर्डच्या उर्वरित भागासाठी असलेला फिंगरप्रिंट स्कॅनर काम करतो.
तसेच त्याच्या कीबोर्डच्या खालच्या बाजूस असलेल्या मोठ्या टचपॅड विषयी बोलायचे झाले तर, ह्याला कोणत्याही प्रकारचे बटण नाही, आणि हे अॅल्युमिनियमचे बनलेले आहे.
कामगिरी
एचपी एन्वी १४ हा उत्कृष्टरित्या आपले ऑफिसचे काम पाहतो आणि गेम्ससाठी सुद्धा चांगला आहे. मी ह्याला जवळपास महिनाभर वापरुन पाहिले. त्यात मी सतत टायपिंग केली, तसेच मेट्रो लास्ट लाइट गेम खेळलो आणि कधी कधी तर मी फक्त Alt-tab वापरुन पाहिले, पण ह्या लॅपटॉपची कामगिरी चांगली होती. गेमिंगविषयी बोलायचे झाले तर, मी Call of Duty: Advanced Warfare, Witcher 2: Enhanced Edition खेळून पाहिले पण त्याच्या उत्कृष्ट ग्राफिक्स सेटिंगमुळे ते अतिशय उत्कृष्टरित्या कोणतीही अडचण न येता खेळू शकलो.
येथे तीन USB 3.0 पोर्ट्स आहेत, त्यात एक आहे HDMI, एक आहे ethernet jack आणि एक माइक आणि हेडफोनसाठी साठी देण्यात आले आहे. ह्या लॅपटॉपचे वजन २ किलो आहे, जे अतिशय स्वागतार्ह आहे.
बॅटरी
एचपी एन्वी १४ वर ३ सेलची बॅटरी देण्यात आली आहे, जी लॅपटॉपला जवळपास साडेतीन तासापर्यंत बॅटरी लाईफ देते. ह्याचाच अर्थ असा तुम्ही ब्राउज, वेब, चित्रपट पाहणे, मेल्स पाठवणे ही सर्व कामे एका चार्जिंगमध्ये करु शकता. पण जेव्हा आम्ही ह्यावर गेम्स खेळलो, तर अवघ्या तासाभरात ह्याची बॅटरी लाईफ कमी झाली. एकूणच ह्याची बॅटरी लाईफ ही सर्वसाधारण आहे, आणि तुम्हाला प्रत्येक वेळी चार्जर बरोबर ठेवावा लागेल.
निष्कर्ष
एचपी एन्वी 14-J008TX हा चांगल्या लुक्ससह एक बहुउद्देशीय असा लॅपटॉप आहे. हा तुमच्या ऑफिस कामाबरोबर गेमिंगसाठीसुद्धा चांगला लॅपटॉप आहे. गेमिंगसाठी तर हा एक उत्कृष्ट लॅपटॉप आहे. ह्या डिवाईसला चांगला कीबोर्ड, योग्य असा टचपॅड आणि चांगला डिस्प्ले आहे. फक्त बॅटरी आणि लहान फंक्शन की ह्याचे नकारात्मक पैलू आहेत. जर तुम्ही त्याची चिंता नसेल तर हा खरेदीसाठी एक चांगला लॅपटॉप आहे.
Price: | ₹85500 |
Release Date: | 14 Jan 2016 |
Market Status: | Launched |
Light at the top, this odd looking creature lives under the heavy medication of video games.
16 Dec 2019
11 Dec 2019
09 Dec 2019
28 Nov 2019
27 Nov 2019
05 Jul 2018
22 Feb 2018
22 Feb 2018
29 Jun 2016
21 Jun 2016
Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.
We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.