गुड सर्विस Review

ने Souvik Das | अपडेट Mar 10 2016
गुड सर्विस Review
DIGIT RATING
78 /100
 • design

  78

 • performance

  82

 • value for money

  88

 • features

  73

निर्णय

गुडसर्विस हा एक असा अॅप ज्याची तुम्हाला आपला सहाय्यक म्हणून कोणाची ना कोणाची गरज असते. हा एकदम त्वरित आणि पुरेसा असा प्रतिसाद देणारा अॅप  आहे. हा अॅप तुम्हाला वेगवेगळ्या परिस्थितीत घर शोधणे, इलेक्ट्रिशनला शोधणे, किंवा अगदी भल्या पहाटे(सकाळी ३.३० वाजता) किंवा अगदी मध्यरात्री जेवण ऑर्डर करणे ह्या सर्व गोष्टींसाठी हा मदत करतो. त्याचबरोबर आपण जगभरात कुठेही कोणाशीही मजकूर अर्थात एसएमएसच्या द्वारे संभाषण न करता एकमेकांशी बोलू शकतो. गुडसर्विस हा खरच अॅप्सपैकी सर्वोत्कृष्ट असा अॅप आहे.

BUY गुड सर्विस

गुड सर्विस detailed review

गुड सर्विस: सविस्तर रिव्ह्यू


गुडसर्विस डाउनलोड केल्यानंतर माझ्या डोळ्यांना पहिली गोष्ट दिसली म्हणजे, ती म्हणजे हा एक सामान्य आणि कार्यशील इंटरफेस आहे. आपल्या यूजर्सला ‘चांगली सेवा(good service)’ देणे हेच गुडसर्विसचे वैशिष्टय आहे. हा अॅप खूप लहान असून केवळ 4MB इतक्या आकाराचा आहे. जेव्हा हा डाउनलोड होत असतो, तेव्हा हा तुम्हाला तुमची ओळख जाणून घेण्यासाठी (logged in/registered social media/mail accounts on device), ठिकाण (GPS/saved locations), फोन (for calling helpline/merchants from within the app), फोटोज/मिडिया/फाइल्स (योग्य असा प्रोडक्टचा फोटो पाठवण्यासाठी असिस्ट करतो), कॅमेरा आणि इंटरनेट/वायफाय कनेक्टिव्हिटीसाठी मदत करतो.

जेव्हा गुडसर्विससाठी तुम्ही लॉग्ड इन करता, तेव्हा तुमचा कोणत्याही प्रकारचा पासवर्ड किंवा कोणतीही पोस्ट स्टोअर करत नाही. त्यामुले हा अॅप तुम्ही सोशल मिडिया प्लेटफॉर्म्सद्वारा शेअर करु शकता. सध्याचे ह्या व्हॉट्सअॅप, मेसेजिंग, gmail, Facebook, Hangouts आणि Twitter यांचा समावेश आहे. पहिल्यांदा हा अॅप उघडल्यावर पहिल्या पेजवर आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि ठिकाण टाकावे लागते.  

लॉग इन केल्यावर तुम्हाला एक चॅट विंडो दिसेल, त्यावर तुम्ही तुमची ऑर्डर आणि प्रश्न मांडू शकतात. ही अॅपची होम स्क्रीन आहे, आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला काही चॅट करायचे असेल तेव्हा तेव्हा ती उघडू शकता. डाव्या बाजूला वर कोप-याच Goodsercie चा लोगो दिसेल.  तर उजव्या बाजूला वर कोप-यात “My Requests”, “Invite” टॅब्स आणि प्रोफाइल बटन दिसेल. एखाद्या कामासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा पत्ता टाकण्याचे टाळायचे असेल तर तुम्ही तुमच्या प्रोफाइलमध्ये तुमच्या घरचा आणि ऑफिसचा पत्ता टाकू शकता. तुम्हाला तुमच्या चॅट स्क्रीनवर खालच्या उजव्या बाजूस  कॉल बटन दिसेल ज्याचा उपयोग तुमच्या काही समस्या असल्यास तुम्ही गुडसर्विस हेल्पलाइन (+919696444444) ला कॉल करण्यासाठी करु शकता. खालच्या बारमध्ये तुम्हाला “Insert Photo” आयकन, टेक्स एरिया आणि सेंड बटन दिसेल.

ह्याचा लेआउट वापरण्यासाठी खूप सोपा आहे. ह्यात तुम्ही तुमच्या रिक्वेस्ट पाठवू शकता, जसे की, “ मला चांगल्या सूट टेलरची गरज आहे” किंवा “मला माझा व्हिसा काढण्यासाठी एक एजंटची गरज आहे.” तुम्ही तुमचे हे किंवा असे अनेक प्रश्न My Requests मध्ये सेव्ह केले तर, तुम्हाला त्वरित तुमच्या अशा प्रश्नांचे समाधानकारक उत्तर मिळेल. तसेच तुमच्या आधीच्या म्हणजेच खूप जुन्या प्रश्नांसाठी वेगळे फोल्डर बनविण्याची गरज नाही. गुडसर्विस चॅट पेजवर ते सर्व सेव्ह करुन ठेवतो. तसेच तुमची चॅट हिस्ट्रीसुद्धा त्वरित लोड करतो.

तुमची ऑर्डर किंवा विनंतीवर काम चालू असताना ते तुम्हाला “Processing” असे ठेवतो आणि जेव्हा त्याचे निराकरण होते तेव्हा ते “solved” मध्ये दिसते. त्याचप्रमाणे तुमच्या ऑर्डरची स्थिती कळण्यासाठी Processing, order placed, Service en route आणि Solved असे अपडेट्स देत राहते.

ह्या अॅपचा त्वरित प्रतिसाद देण्याचा गुण खूपच चांगला आहे. तसेच ह्या सर्व प्रकारच्या सेक्युरिटीमुळे गुन्हे होण्याची शक्यता कमी असते.

Goodservice मध्ये तुम्ही टेलर्स, व्हिसा एजंट इ. शोधण्यासाठी तसेच उत्कृष्ट रेस्टॉरन्ट आपल्याशी शेअर करण्यासाठी त्याचबरोबर मेन्युची किंमत, ऑर्डर स्विकारणे किंवा नाकारण्यासाठी ह्याचा उपयोग होतो.

गुडसर्विस कसे काम करतो?

Goodservice हा एक मोफत अॅप आहे. तसेच अनेक लघुउद्योग, घाउक व्यापारी जसे की इलेक्ट्रिकल  स्टोअर्स, रेस्टॉरंट्स इत्यादींशी टाय अप केले आहे. गुडसर्विस हा चॅटद्वारा जास्तीत जास्त लोकांना आपल्याद्वारे जो़डण्यास मदत करतो. तसेच जर तुम्हाला मोठमोठ्या ई-कॉमर्स साइट्सशी जोडायचे असेल तर, हा तुम्हाला थेट त्या साइट्सशी जोडण्यास मदत करतो.

निष्कर्ष

गुडसर्विस हा एक असा अॅप ज्याची तुम्हाला आपला सहाय्यक म्हणून कोणाची ना कोणाची गरज असते. हा एकदम त्वरित आणि पुरेसा असा प्रतिसाद देणारा अॅप  आहे. हा अॅप तुम्हाला वेगवेगळ्या परिस्थितीत घर शोधणे, इलेक्ट्रिशनला शोधणे, किंवा अगदी भल्या पहाटे(सकाळी ३.३० वाजता) किंवा अगदी मध्यरात्री जेवण ऑर्डर करणे ह्या सर्व गोष्टींसाठी हा मदत करतो. त्याचबरोबर आपण जगभरात कुठेही कोणाशीही मजकूर अर्थात एसएमएसच्या द्वारे संभाषण न करता एकमेकांशी बोलू शकतो. गुडसर्विस हा खरच अॅप्सपैकी सर्वोत्कृष्ट असा अॅप आहे.

गुड सर्विस Key Specs, Price and Launch Date

Release Date: 28 Jan 2016
Market Status: Launched
logo
Souvik Das

The one that switches between BMWs and Harbour Line Second Class.

Advertisements
Advertisements

गुड सर्विस

गुड सर्विस

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status