महत्त्वाचे ! mAadhaar म्हणजे काय? ते कधी वापरता येईल? जाणून घ्या सर्व फायदे आणि फीचर्स

महत्त्वाचे ! mAadhaar म्हणजे काय? ते कधी वापरता येईल? जाणून घ्या सर्व फायदे आणि फीचर्स
HIGHLIGHTS

जाणून घ्या, mAadhaar म्हणजे काय?

तुम्ही फिजिकल कॉपी विसरला असाल, तर mAadhaarवर सर्व कामे होतील.

आयडी प्रूफ म्हणून mAadhaar वापर होईल

mAadhaar ऍप देशभरात केव्हाही, कुठेही वापरले जाऊ शकते. तुम्हाला माहिती आहे का की, mAadhaar फिजिकल आधार कार्डच्या तुलनेत इतर अनेक फायदे देतो. तुम्ही कुठेही mAadhaar डाउनलोड करू शकता, तुम्ही फिजिकल कॉपी विसरला असाल, तर mAadhaarवर सर्व कामे होतील. mAadhaar ला ऑफलाइन मोडमध्ये ऍक्सेस करता येईल. विशेषत: जेव्हा नागरिकांना त्यांचा आयडी पुरावा दाखवावा लागतो, तेव्हा तुम्हाला याचा उपयोग होईल. 

हे सुद्धा वाचा : 108MP कॅमेराने सुसज्ज असेल Infinix Note 12 5G सिरीज, 8 जुलै रोजी होणार लाँच

mAadhaar कुठे वापरता येईल?

तुम्ही देशात कुठेही mAadhaar ऍप वापरू शकता. देशभरातील विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर mAadhaar हा वैध ओळखपत्र म्हणून स्वीकारला जातो. याशिवाय, आधार पडताळणीद्वारे केलेल्या eKYC साठी देखील mAadhaar चा वापर केला जाऊ शकतो.

mAadhaar ऍपचे फीचर्स आणि फायदे 

– तुम्ही तुमचे आधार कार्ड विसरलात किंवा आधार कार्ड हरवले असल्यास mAadhaar डाउनलोड करा.

– आयडी प्रूफ म्हणून mAadhaar ऑफलाइन मोडमध्ये दाखवता येईल.

– डॉक्युमेंट आणि डॉक्युमेंट प्रुफशिवाय ऍड्रेस अपडेट करणे. 
– कुटुंबातील सदस्यांचे (5 सदस्यांपर्यंत) आधार एका आधार कार्डमध्ये व्यवस्थापित केले जाऊ शकतात. पेपरलेस eKYC किंवा QR कोड सर्व्हिस प्रोव्हाइडर्स एजन्सीसोबत शेअर केला जाऊ शकतो.

– आधार किंवा बायोमेट्रिक लॉक करून आधार सुरक्षित करणे.

– आधार सेवा वापरण्यासाठी आधारच्या बदल्यात VID जनरेट किंवा रिट्रीव केला जाऊ शकतो.

– ऑफलाइन मोडमध्ये आधार SMS सेवा वापरणे.

– रेकॉर्ड हिस्टरी आणि ऑथेंटिकेशन रेकॉर्ड पाहिले जाऊ शकतात.

– आधार सेवा केंद्राला भेट देण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करता येईल.

– अपडेट रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर, अपडेट केलेला डेटा आधार सिंक फिचरद्वारे आधार प्रोफाइलमध्येअपडेटेड डेटा दिसेल.

– UIDAI वेबसाइटवर आधार ऑनलाइन सेवांचा लाभ घेण्यासाठी SMS आधारित OTP च्या जागी टाइम-बेस्ड- वन-टाइम पासवर्ड वापरला जाऊ शकतो.

– लोकेट एनरोलमेंट सेंटर (EC) द्वारे, वापरकर्ते जवळपासची नोंदणी केंद्रे शोधू शकतात.

– mAadhaar ऍपच्या MORE सेक्शनमध्ये जाऊन mAadhaar App, contact, usage guideline, terms and conditions  यासारखी महत्त्वाची माहिती मिळवता येते. 
अशाप्रकारे mAadhaar चे अनेक लाभ तुम्हाला मिळतील. त्यामुळे हे तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo