Samsung Galaxy Tab S4 White Color वेरिएंट चा प्रेस रेंडर लीक, असे असतील फीचर्स

Samsung Galaxy Tab S4 White Color वेरिएंट चा प्रेस रेंडर लीक, असे असतील फीचर्स
HIGHLIGHTS

असे बोलले जात आहे की Samsung डिस्प्ले साइज वाढवून 9.7-इंचा वरून 10.5-इंच करणार आहे, तसेच होम बटन पण या टॅब मधून काढून टाकला जाऊ शकतो.

Samsung Galaxy Tab S4 to Come Up with Two Color Variants Black and White: काही दिवसांपासून इंटरनेट वर Samsung Galaxy Tab S3 च्या जेनरेशन च्या नवीन डिवाइस बद्दल माहिती समोर येत आहे. हा डिवाइस Tab S4 नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी हा डिवाइस ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये इंटरनेट वर एका लीक मधून दिसला होता. पण आता माहिती याच्या नवीन कलर वेरिएंट म्हणजे White कलर वेरिएंट बद्दल येत आहे. 

या डिवाइस च्या लॉन्च साठी आता जास्त खुप कमी वेळ आहे, या बद्द्ल खुप जास्त माहिती समोर आली आहे. तसेच हा अनेक बेंचमार्किंग साईट वर दिसला आहे उदाहरणार्थ GFXBench वर हा दिसला होता, तसेच हा काही दिवसांपूर्वी रशियातील EEC वर पण दिसला होता. याचा अर्थ असा की हा डिवाइस लवकरच लॉन्च केला जाणार असल्याची शक्यता आहे. हा टॅबलेट सॅमसंग गॅलेक्सी Tab S3 च्या जेनेरेशनचा नवीन डिवाइस असणार आहे. आता हा गीकबेंच वर पण दिसला आहे. 

हा डिवाइस स्नॅपड्रॅगन 845 सह लॉन्च करण्यात येणार नाही, तसेच यात तुम्हाला Exynos 9810 मिळण्याची शक्यता पण दिसत नाही. याचा अर्थ असा की हा डिवाइस आता पण नवीन स्पेक्स सह लॉन्च करण्यात येणार नाही. तसे पाहता एंड्राइड टॅबलेट iPads पेक्षा कमी प्रसिध्द आहेत आणि सॅमसंग आपल्या नवीन आणि आगामी टॅबलेट मध्ये स्नॅपड्रॅगन 835 चा वापर करणार आहे, हा चिपसेट आपण अनेक जुन्या डिवाइस मध्ये बघितला आहे. 

हा डिवाइस या बेंचमार्किंग साइट वर SM-T835 सह दिसला आहे, याचा अर्थ असा की या डिवाइस मध्ये स्नॅपड्रॅगन 835 असू शकतो. हा डिवाइस ओक्टा-कोर प्रोसेसर सह लॉन्च केला जाणार आहे अशी माहिती मिळाली आहे. जरी याची परफॉरमेंस एकदम खराब नसली तरी हा तेवढा प्रभावी नसेल जेवढे स्नॅपड्रॅगन 845 सह येणारे डिवाइस असतात. 

या टॅबलेट मध्ये तुम्हाला 6GB रॅम च्या जागी 4GB चा रॅम मिळणार आहे. तसेच यात एक 10.5-इंचाची 2560×1600 पिक्सल रेजोल्यूशन वाली स्क्रीन मिळणार आहे. म्हणजेच या डिवाइस मध्ये एक मोठी बॅटरी पण असू शकते. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo