केवळ ९९० रुपयात मिळतोय सॅमसंग गियर VR

ने Poonam Rane Poyrekar | वर प्रकाशित 04 May 2016
HIGHLIGHTS
  • सॅमसंग गियर VR ला ९९० रुपयात खरेदी करु इच्छिता, तर त्यासाठी आपल्याला ‘My Galaxy app’ वर जाऊन आपले नाव द्यावे लागेल. तेथे आपल्याला हा खरेदी करण्यासाठी ९९० रुपयांचे कूपन मिळेल.

केवळ ९९० रुपयात मिळतोय सॅमसंग गियर VR

सॅमसंग भारतामध्ये आपल्या गियर VR चे सेल वाढवू इच्छितेय आणि त्यासाठी कंपनी एक उत्कृष्ट ऑफर घेऊन आली आहे. खरे पाहता कंपनी आता भारतात आपल्या गियर VR ला ९९० रुपयात उपलब्ध करत आहे. कंपनीने भारतात गियर VR ला ८,२०० रुपयात सादर केले होते. मात्र जर आपण मे महिन्यात सॅमसंग गॅलेक्सी S7 आणि S7 एज स्मार्टफोन खरेदी करता, तर आपण हा सॅमसंग गियर VR ९९० रुपयात आपला करु शकता. जर तुम्हीही सॅमसंग गियर VR ला ९९० रुपयात खरेदी करु इच्छिता तर, आपल्याला “My Galaxy app” वर जाऊन त्यासाठी नाव नोंदवावे लागेल. तेथे आपल्याला हा खरेदी करण्यासाठी ९९० रुपयांचे कूपन मिळेल. मुंबईत एका रिटेलरने ह्याबाबत माहिती दिलेली आहे.
 

हेदेखील वाचा - 6GB रॅमने सुसज्ज आहेत हे आकर्षक स्मार्टफोन्स

सॅमसंगचा दावा आहे की, ह्या डिवाइसच्या माध्यमातून यूजर अधिक चांगल्या प्रकारे चित्रपट, 360 डिग्री व्हिडियो  आणि गेम्सचा आनंद घेऊ शकतील. कंपनीने ह्या डिवाइसला जास्त आरामदायक बनविण्यासाठी ह्याच्या काही भागात फोमसुद्धा वापरला आहे. ह्या डिवाइसला सॅमसंग गॅलेक्सी S6, गॅलेक्सी नोट 5, गॅलेक्सी S6 एज आणि गॅलेक्सी S6 एज+ सह कनेक्ट केले जाऊ शकते. सॅमसंग गॅलेक्सी VR मध्ये एक फिक्स लेन्स दिली आहे. हा पांढ-या रंगात उपलब्ध आहे.

हेदेखील वाचा - कूलपॅड नोट 3 स्मार्टफोनची किंमत झाली कमी
हेदेखील वाचा - सोनी SRS-XB3 वायरलेस स्पीकर लाँच, किंमत १२,९९० रुपये

logo
Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

email

Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements
DMCA.com Protection Status