अमेरिकेची इलेक्ट्रॉनिक कंपनी इनफोकसने जगातील सर्वात छोटा पोर्टेबल कंम्प्यूटर कांगारु सादर केला आहे. कंपनीचा दावा आहे की, १२४ मिलीमीटर लांब, ८०.५ मिलीमीटर रुंद आणि १२.९ मिलीमीटर मोठा असलेला हा कांगारू डिवाईस जगातील सर्वात छोटा पोर्टेबल डेस्कटॉप कंम्प्यूटर आहे. कांगारूची किंमत ९९ डॉलर(जवळपास ६,५०० रुपये) इतकी आहे आणि त्याची विक्री आजपासून अमेरिकेत सुरु झाली आहे.
ह्या डिवाईसचा आकार हा स्मार्टफोनइतका आहे. हा रिमूव्हेबल बेस यूनिटसोबत येतो, ज्यात HDMI पोर्ट, USB 2.0 पोर्ट, USB 3.0 पोर्ट आणि DC पॉवर पोर्ट यांचा समावेश आहे. अॅडॅप्टर आणि पॉवर कोर्डशिवाय ह्या डिवाईसचे वजन २०० ग्रॅम आहे. हा हेलो फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहे. कंपनीचा दावा आहे की, हा नेहमीच्या वापरात जवळपास ४ तास काम करु शकतो. ह्या पोर्टेबल कंम्प्यूटरला मायक्रो-युएसबी पोर्टच्या मदतीने सुद्धा चार्ज करु शकता.
ह्या डिवाईसच्या इतर वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 1.4GHz क्वाड-कोर इंटेल’चेरीट्रेल’ अॅटम X5-Z8500 प्रोसेसर आणि 2GB ची रॅम दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. मायक्रो-SD कार्डच्या साहाय्याने हे 128GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
कांगारु डिवाईस विंडोज १०वर चालतो. ह्या पोर्टेबल कंम्प्यूटरमध्ये वायफाय 802.11SC आणि ब्लूटूथ 4.0 वायरलेस कनेक्टिविटीचे वैशिष्ट्यसुद्धा दिले गेले आहे.
अधिक तंत्रज्ञान बातम्या, प्रोडक्ट रिव्ह्यू, विज्ञान-तंत्रज्ञान फीचर्स आणि अपडेट्ससाठी, Digit.in वाचत रहा किंवा आमच्या Google News पृष्ठावर जा.