नुकत्याच लाँच झालेल्या Oppo K10 5G ची पहिली विक्री आजपासून भारतात सुरू झाली आहे. स्मार्टफोनमध्ये एकच स्टोरेज मॉडेल मिळेल, परंतु ग्राहकांना त्यात दोन कलर ऑप्शन्स मिळतात. गेल्या आठवड्यातच हा स्मार्टफोन देशात लाँच करण्यात आला होता. सध्या, Oppo K10 4G व्हेरिएंटसह येतो. हे मॉडेल भारतात मार्च 2022 मध्ये लाँच करण्यात आले होते. या सेलमध्ये Oppo K10 5G स्मार्टफोन खास किंमतीत उपलब्ध होणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आज दुपारी 12 वाजेपासून ही सेल सुरू झाली आहे.
Oppo K10 5G फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये आला आहे. फोनच्या 8GB + 128GB मॉडेलची किंमत 17,499 रुपये आहे. K10 5G मिडनाईट ब्लॅक आणि ओशन ब्लू कलर ऑप्शन्समध्ये ऑफर करण्यात आला आहे. सेल दरम्यान, तुम्ही SBI कार्ड, कोटक, ऍक्सिस आणि बँक ऑफ बडोदा कार्ड्सवर 1,500 रुपयांपर्यंत फ्लॅट डिस्काउंट मिळवू शकता.
हे सुद्धा वाचा : Mi Smart Band 7 ची किंमत लाँचपूर्वीच लीक, कमी किमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स
या व्यतिरिक्त, तुम्हाला 607 रुपये प्रति महिना EMI भरून देखील फोन खरेदी करता येईल. यासोबतच तुम्हाला जुना फोन एक्सचेंज केल्यावर 12,500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा पुरेपूर लाभ घेतला, तर हा फोन फक्त 4,999 रुपयांमध्ये तुमचा होईल. येथून खरेदी करा...
OPPO K10 5G मध्ये 6.56-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. ज्याचा LCD पॅनल 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात MediaTek Dimensity 810 प्रोसेसर आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000mAh ची बॅटरी मिळेल. OPPO K10 5G मध्ये 128GB स्टोरेज आणि 8GB RAM आहे, जी RAM एक्सपेन्शन फिचरद्वारे 5GB पर्यंत वाढवता येईल. येथून खरेदी करा...
OPPO K10 5G स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यामध्ये 48MP चा प्रायमरी शूटर आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटला 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. OPPO K0 5G मध्ये सिक्युरिटीसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील देण्यात आला आहे.
Price: |
![]() |
Release Date: | 09 Jun 2022 |
Variant: | 128 GB/6 GB RAM , 128 GB/8 GB RAM |
Market Status: | Launched |