मिजू M3S स्मार्टफोन लाँच. फिंगरप्रिंट स्कॅनरने सुसज्ज

ने Poonam Rane Poyrekar | वर प्रकाशित 14 Jun 2016
HIGHLIGHTS
  • ह्या स्मार्टफोनचे दोन्ही व्हर्जन भारतात लाँच झाले आहेत, ह्याच्या पहिल्या व्हर्जनमध्ये 2GB रॅम आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले असून दुस-या व्हर्जनमध्ये 3GB रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे.

मिजू M3S स्मार्टफोन लाँच. फिंगरप्रिंट स्कॅनरने सुसज्ज
मिजू M3S स्मार्टफोन लाँच. फिंगरप्रिंट स्कॅनरने सुसज्ज

मिजूने बाजारात आपला नवीन फोन M3S लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनचे दोन्ही व्हर्जन भारतात लाँच झाले आहेत, ह्याच्या पहिल्या व्हर्जनमध्ये 2GB रॅम आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले असून दुस-या व्हर्जनमध्ये 3GB रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. सध्यातरी कंपनीने ह्या फोनला चीनमध्ये लाँच केले आहे. ह्याच्या 2GB रॅम व्हर्जनची किंमत CNY 699 (जवळपास ७,२०० रुपये) आणि ह्याच्या 3GB रॅम व्हर्जनची किंमत CNY 899 (जवळपास ९,२०० रुपये) आहे. ह्या स्मार्टफोनची प्री-ऑर्डर बुकिंग सुरु झाली आहे आणि हा फोन ह्या शुक्रवारपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. ह्याला कंपनीच्या वेबसाइटवर बुक केले जाऊ शकते.

मिजू M3S मध्ये 5 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 1280x720 पिक्सेल आहे. ह्यात 2.5D कर्व्ह्ड ग्लाससुद्धा दिली आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे आणि हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर आधारित आहे.

हेदेखील पाहा - नोकियाचे हे फोन्स आहेत आतापर्यंतचे सर्वात आकर्षक आणि यूनिक डिझाईन असलेले फोन्स

ह्या फोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा रियर कॅमेरा ड्यूल-टोन LED फ्लॅशसह येतो. ह्या फोनमध्ये 3020mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्यात एक फिंगरप्रिंट स्कॅनरसुद्धा दिला गेला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G VoLTe, वायफाय, ब्लूटुथ, GPS सारखे फीचर्स दिले आहेत. ह्याचा आकार 141.9x69.9x8.3mm आहे आणि ह्याचे वजन 138 ग्रॅम आहे. हा सोनेरी, सिल्वर, ग्रे आणि पिंक रंगात उपलब्ध होईल.

हेदेखील वाचा - अखेर भारतात लाँच झाला लेनोवो वाइब K5 स्मार्टफोन, किंमत ६,९९९ रुपये
हेदेखील वाचा - 
2GB रॅमने सुसज्ज आहे RDP थिन बुक लॅपटॉप लाँच, किंमत ९,९९९ रुपये

Poonam Rane Poyrekar
Poonam Rane Poyrekar

Email Email Poonam Rane Poyrekar

About Me: Content Writer - Marathi Read More

Tags:
meizu m3s मिजू m3s
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements

हॉट डील्स सर्व पहा

Apple iPhone 12 (64GB) - White
Apple iPhone 12 (64GB) - White
₹ 52999 | $hotDeals->merchant_name
OnePlus 10 Pro 5G (Volcanic Black, 8GB RAM, 128GB Storage)
OnePlus 10 Pro 5G (Volcanic Black, 8GB RAM, 128GB Storage)
₹ 61999 | $hotDeals->merchant_name
realme narzo 50A Prime (Flash Blue, 4GB RAM+64GB Storage) FHD+ Display | 50MP AI Triple Camera (No Charger Variant)
realme narzo 50A Prime (Flash Blue, 4GB RAM+64GB Storage) FHD+ Display | 50MP AI Triple Camera (No Charger Variant)
₹ 9999 | $hotDeals->merchant_name
Apple iPhone 13 (128GB) - Starlight
Apple iPhone 13 (128GB) - Starlight
₹ 65999 | $hotDeals->merchant_name
Redmi Note 10T 5G (Metallic Blue, 4GB RAM, 64GB Storage) | Dual 5G | 90Hz Adaptive Refresh Rate | MediaTek Dimensity 700 7nm Processor | 22.5W Charger Included
Redmi Note 10T 5G (Metallic Blue, 4GB RAM, 64GB Storage) | Dual 5G | 90Hz Adaptive Refresh Rate | MediaTek Dimensity 700 7nm Processor | 22.5W Charger Included
₹ 14499 | $hotDeals->merchant_name