Realme GT सिरीजचा प्रीमियम स्मार्टफोन, Realme GT 2 कंपनीच्या वेबसाइटवर 3,000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. ही ऑफर फोनच्या 8 GB रॅम + 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या वेरिएंटसाठी आहे. Realme.com या वेबसाईटवर फोनच्या या व्हेरिएंटची किंमत सध्या 34,999 रुपये आहे. मात्र, ही ऑफर फक्त प्रीपेड ऑर्डरसाठी आहे. ही खास ऑफर 20 मे पासून सुरू झाली असून आज या ऑफरचा शेवटचा दिवस आहे.
शिवाय, या फोनसोबत कंपनी 350 रुपयांपर्यंतचे कूपन डिस्काउंटदेखील ऑफर करत आहे. तसेच, Mobikwik द्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 600 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल. रियलमीचा हा फोन पेपर ग्रीन आणि पेपर व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये येतो. या फोनमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटसह अनेक उत्तम फीचर्स मिळतील.
या फोनमध्ये कंपनी 2400x1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.62-इंचचा फुल HD + AMOLED डिस्प्ले देत आहे. त्याबरोबरच डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देखील देण्यात आला आहे. फोन 12GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजसह येतो.
फोनमध्ये प्रोसेसर म्हणून तुम्हाला स्नॅपड्रॅगन 888 5G चिपसेट मिळेल. तसेच आकर्षक फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन रियर कॅमेरे दिलेले आहेत. यात 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरासह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे. तसेच आकर्षक सेल्फीसाठी कंपनीने या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
शिवाय, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ही बॅटरी 33 मिनिटांत 100% पर्यंत चार्ज होईल, असा कंपनीचा दावा आहे . कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi 6, Bluetooth 5.2 आणि USB Type-C पोर्ट असे पर्याय देण्यात आले आहेत.