तुम्ही देखील ट्रान्सपरंट लुकसह येणाऱ्या Nothing स्मार्टफोन्सचे चाहते असाल तर, हा लेख खास तुमच्यासाठी आहे. सध्या प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर Nothing चा Nothing Phone 2a Plus मोठ्या सवलतीसह विक्रीसाठी उपलब्ध करून दिला गेला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, लाँचच्या वेळी या स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपये इतकी होती. मात्र, आता हा फोन तब्बल 8000 रुपयांच्या सवलतीसह खरेदी केला जाऊ शकतो. जाणून घ्या सविस्तर ऑफर्स-
Also Read: iQOO Neo 10R 5G: कंपनीच्या आगामी स्मार्टफोन लाँचची घोषणा! किंमत, लाँच टाइम, स्पेसिफिकेशन्स लीक
Nothing Phone 2a Plus चा बेस व्हेरिएंट 8GB+ 256GB व्हेरिएंट आता Flipkart वर 23,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2,000 रुपयांची अतिरिक्त सवलत असेल. एवढेच नाही तर, तुम्ही EMI पर्यायामध्ये देखील फोन खरेदी करू शकता, जो दरमहा 1,176 रुपयांच्या परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 23,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज व्हॅल्यू मिळेल.
अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Nothing फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंच लांबीचा FHD AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय, या फोनमध्ये तुम्हाला MediaTek Dimensity 7350 Pro प्रोसेसर देखील दिला गेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, मीडियाटेक डायमेन्सिटी 7350 हा कंपनीचा नवीन मिडरेंज प्रोसेसर आहे, जो नथिंग फोन (2a) प्लससह पदार्पण करत आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला या फोनमध्ये 8GB+ 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज पर्याय देखील मिळतो.
कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये तुम्हाला डुअल 50MP सेटअप मिळेल. तसेच, कंपनीने आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 50MP सेल्फी कॅमेरा देखील समाविष्ट केला आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 50W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी मिळेल. या बॅटरीमध्ये वेब सर्फिंग आणि इतर मूलभूत कार्यांसह तब्बल दोन दिवस टिकण्याची क्षमता आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.