RedmiBook Pro 2022 : Redmiच्या नवीन लॅपटॉपची धमाकेदार एंट्री, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Reshma Zalke ने | वर प्रकाशित 25 May 2022 11:32 IST
HIGHLIGHTS
 • RedmiBook Pro 2022 Ryzen Edition कंपनीकडून लाँच

 • उत्तम बिल्ड कॉलिटीसह मिळतील जबरदस्त फीचर्स.

 • REDMIच्या नवीन लॅपटॉपची किंमत 52 हजारांपासून सुरु.

RedmiBook Pro 2022 : Redmiच्या नवीन लॅपटॉपची धमाकेदार एंट्री, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स
RedmiBook Pro 2022 : Redmiच्या नवीन लॅपटॉपची धमाकेदार एंट्री, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Redmi ने नवीन RedmiBook Pro 2022 Ryzen Edition लॅपटॉप बाजारात आणला आहे. हा लॅपटॉप दोन स्क्रीन साईझमध्ये येतो. यामध्ये कंपनी AMD Ryzen R5 6600H आणि Ryzen R7 6800H दोन प्रोसेसर ऑप्शन देत आहे. चला तर जाणून घेऊयात याबाबत सविस्तर...

Xiaomi ने त्यांच्या लॅपटॉपची रेंज वाढवत,  Redmibook Pro 2022 Ryzen Edition लाँच केले आहे. कंपनीने हे लॅपटॉप नुकतेच चीनमध्ये लाँच केले आहे. या लॅपटॉपमध्ये कंपनी 6व्या जनरेशनचा Ryzen प्रोसेसर देत आहे. नवीन Redmibook Pro 2022 दोन स्क्रीन सह येतो. त्याबरोबरच, यात प्रोसेसर व्यतिरिक्त 12th Generation Intel Core चे स्पेसिफिकेशन दिले गेले आहेत. चला  मग जाणून घेऊयात लॅपटॉपची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स...

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन 

कंपनी Redmibook Pro 2022 सिरीजमध्ये 14-इंच लांबीचा डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 2.5K रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. त्याचप्रमाणे, कंपनी 15-इंच वेरीएंटमध्ये 3.5K रिझोल्यूशनसह 90Hz चा रिफ्रेश रेट देत आहे. दोन्ही आकारांचे लॅपटॉप सीरीज-6 एव्हिएशन ऍल्युमिनियम मेटल बॉडी फिनिशसह येतात. तसेच लॅपटॉपमध्ये कंपनी AMD Ryzen R5 6600H आणि Ryzen R7 6800H असे दोन प्रोसेसर ऑप्शन देत आहे.

लॅपटॉपचा 15-इंच वेरीएंट ऑप्शनल RTX 2050 GPU सह येतो. मात्र, यासाठी तुम्हाला थोडे अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. कंपनी या दोन्ही लॅपटॉपमध्ये 16 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज देत आहे. लॅपटॉप हिट होऊ नये म्हणून यात तीन हीटिंग पाईप्ससह ड्युएल फॅनदेखील दिले गेले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी, कंपनी यात Thunderbolt 4, USB-C, USB-A आणि HDMI 2.0 ऑफर करत आहे.

Redmibook Pro 2022 Ryzen Edition ची किंमत

14-इंच स्क्रीन साईजसह Ryzen 5 व्हेरिएंटची किंमत 4499 युआन म्हणजे सुमारे 52,400 रुपये इतकी आहे. तसेच, लॅपटॉपच्या Ryzen 7 वेरीएंटची किंमत 5,099 युआन म्हणजेच जवळपास 59,400 रुपये इतकी आहे. त्याचप्रमाणे, लॅपटॉपच्या 15-इंच वेरीएंटची किंमत अनुक्रमे 4699 युआन म्हणजेच 54,700 रुपये आणि 5,299 युआन म्हणजेच सुमारे 61,700 रुपये इतकी आहे.

 

अधिक तंत्रज्ञान बातम्या, प्रोडक्ट रिव्ह्यू, विज्ञान-तंत्रज्ञान फीचर्स आणि अपडेट्ससाठी, Digit.in वाचत रहा किंवा आमच्या Google News पृष्ठावर जा.

Redmibook Pro Key Specs, Price and Launch Date

Price:
Release Date: 03 Aug 2021
Variant: None
Market Status: Launched

Key Specs

 • OS OS
  Windows 10 Home
 • Display Display
  15.6" (1920 x 1080)
 • Processor Processor
  11th Gen Intel® Core™ i3 - 1115G4 | NA
 • Memory Memory
  512 GB SSD/8 GBGB DDR4
Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. Read More

Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

लेटेस्ट Articles सर्व पहा

VISUAL STORY सर्व पहा

;