इंटरनेट स्पीड होईल सुपरफास्ट, फक्त फोनच्या सेटिंग्जमध्ये करा 'हे' महत्त्वाचे बदल

ने Reshma Zalke | वर प्रकाशित 09 Jun 2022
HIGHLIGHTS
  • इंटरनेट स्पीड कमी होऊ नये म्हणून फॉलो करा महत्त्वाच्या टिप्स

  • ऑटो-अपडेट फिचर डिसेबल करा.

  • CACHE क्लियर करा.

इंटरनेट स्पीड होईल सुपरफास्ट, फक्त फोनच्या सेटिंग्जमध्ये करा 'हे' महत्त्वाचे बदल
इंटरनेट स्पीड होईल सुपरफास्ट, फक्त फोनच्या सेटिंग्जमध्ये करा 'हे' महत्त्वाचे बदल

 इंटरनेट ही काळाची गरज आहे, असे म्हणायला हरकत नाही. कोरोना महामारीनंतर लॉकडाउनमध्ये वर्क फ्रॉम होम मॉडेल सुरु झाले. त्यानंतर आपल्याला इंटरनेटची खरी आवश्यकता तयार झाली. मात्र, कधी कधी इंटरनेटचा स्पीड कमी झाल्यामुळे आपल्या कामात बऱ्याच समस्या येतात. काम स्लो झाल्यामुळे बरीच चीड-चीड देखील होते. पण काळजी करू नका, काही खास टिप्स फॉलो केल्यानंतर तुमचे इंटरनेट स्पीड स्लो होणार नाही. चला तर जाणून घेऊयात खास टिप्सबद्दल...  

CACHE क्लियर करा

CACHE फुल झाल्यानंतर, तुमचा ANDROID फोन स्लो होतो, ज्यामुळे इंटरनेटच्या स्पीडवर परिणाम होतो. त्यामुळे वेळोवेळी CACHE क्लियर करा. यामुळे तुमच्या मोबाईलचा इंटरनेट स्पीड वाढेल.

फोन सेटिंग

फोनच्या सेटिंग्जमध्ये जा आणि नेटवर्क सेटिंग पर्यायामध्ये पसंतीच्या नेटवर्क प्रकारामध्ये 4G किंवा LTE आहे का ते पहा. नसल्यास, तेथे उपलब्ध पर्याय निवडा.

हे सुद्धा वाचा : Westinghouseचा 32 इंचचा जबरदस्त TV फक्त 8 हजार रुपयांत लाँच, बघा फीचर्स

फोन रीस्टार्ट करा

फोन रीस्टार्ट झाल्यावर, तो पुन्हा मोबाइल नेटवर्क शोधतो, ज्यामुळे डेटाचा वेग वाढतो किंवा तुम्ही एकदा डेटा बंद करून पुन्हा ऑन करू शकता.

डीसेबल करा

बर्‍याच वेळा वापरकर्ते चुकून स्मार्टफोनमध्ये ऑटो डाउनलोड फीचर सक्षम करतात. ज्यामुळे एप्स बॅकग्राउंडमध्ये अपडेट होत राहतात आणि मिळालेला डेटाही लवकर संपतो. याशिवाय स्लो इंटरनेटच्या समस्येचाही सामना करावा लागतो. ऑटो डाउनलोड तपासण्यासाठी, GOOGLE PLAY STORE वर जा. ऑटो अपडेट वैशिष्ट्य सक्षम असल्यास, ते डिसेबल करा. 

एअरप्लेन मोड अनेबल करून डिसेबल करा

तुमच्या फोनवर एयरप्लेन अनेबल करून नंतर तो डिसेबल करा. असे केल्याने मोबाइल नेटवर्क पुन्हा शोधले जाईल आणि इंटरनेटचा वेग वाढण्याची शक्यता आहे.

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. Read More

Tags:
internet speed booster device to increase internet speed how to increase internet download speed
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements