1,000 रुपयांमध्ये मिळणारे हे आहेत भारतातील बेस्ट हेडफोन्स

1,000 रुपयांमध्ये मिळणारे हे आहेत भारतातील बेस्ट हेडफोन्स
HIGHLIGHTS

जर तुम्ही पण हेडफोन विकत घेण्याचा विचार करत असाल पण काही समजत नसेल कि कोणते हेडफोन घावे, म्हणजे कोणती कंपनी किंवा ब्रँडचा. तर मग आम्ही तुम्हाला सांगतो कि तुमच्यासाठी काय चांगले आहे आणि काय तुमचे बजेट मध्ये येते.

भारतात जर तुम्ही बेस्ट हेडफोन्स विकत घेण्यासाठी इकडे तिकडे भटकत असाल तर आता कुठे जयनाची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 1,000 रुपयांच्या आत मिळणारे भारतातील बेस्ट हेडफोन्स. या हेडफोन्स मध्ये तुम्हाला ती सर्व वैशिष्ट्ये मिळतील ज्यांचा शोध तुम्ही घेत आहात. यांत तुम्हाला चांगला stereo sound आणि bass मिळेल.

Skullcandy Ink'd

चांगल्या साउंड सोबत जर तुम्ही एक चांगली बिल्ट क्वालिटी पण जर तुम्ही शोधत असाल तर हे हेडफोन तुमच्यासाठी अगदी योग्य आहेत. यासोबत या डिवाइस मध्ये तुम्हाला एक माइक पण मिळेल. Skullcandy Ink’d मध्ये तुम्हाला हे सर्व मिळेल. स्टाइल सोबत साथ म्युझिक /कॉल कंट्रोल बटण  पण यात देण्यात आला आहे.

House of Marley Smile Jamaica EM-JE041-SB

ऑडियो डिवाइस बद्दल बोलायचे तर House of Marley सर्वांच्याच ओळखीचे नाव आहे. Smile Jamaica EM-JE041-SB हेडफोन्स स्टाइलिश आणि दीर्घकाळ टिकणारे आहेत ज्यात तुम्हाला noise cancellation आणि  canalphone डिझाईन देण्यात आली आहे. केबल्स tangle free असल्यामुळे तुम्ही यांचा वापर बेफिकरपणे करू शकता. 

Sennheiser CX 180

Sennheiser ऑडियो डिवाइस साठी प्रसिद्ध आणि जुना ब्रँड आहे. Sennheiser CX 180 एक उत्तम साउंड देण्यासाठी ओळखला जातो. हा लाइट वेट डिझाईन सह येतो.

JBL C150SI

JBL C150SI 1000 रुपयांच्या आत येणाऱ्या हेडफोन्स मधील एक आहे. इयरबड डिझाईन सह 9mm ड्राइवर्स JBL C150SI मध्ये आहेत. हे लाइट वेट डिझाईन सह येतो. यात पण तुम्हाला म्युझिक/कॉल कंट्रोल बटण मिळतो.

Sony MDR-EX14AP

Sony MDR-EX14AP एक चांगला ऑप्शन आहे, जर तुम्ही एक सिंपल आणि दमदार हेडफोन शोधात असाल तर हे लाइट वेट डिझाईन सह येतात. यात पण तुम्हाला शानदार साउंड मिळेल.

boAt BassHeads 220

1000 रुपयांच्या आत येणाऱ्या हेडफोन्स पैकी boAt BassHeads 220 एक चांगलाच ऑप्शन आहे. हे हेडफोन flat-wire डिझाईन सह येतात ज्यामुळे तुम्हाला tangle free अनुभव मिळतो. यासोबतच यात तुम्हाला 10mm drivers सह चांगली बास क्वालिटी मिळेल.

 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo