बापरे ! शाहरुख खानच्या 'Jawaan' चित्रपटाने रिलीजपूर्वीच कमावले 500 कोटी, बघा कसे...

ने Reshma Zalke | वर प्रकाशित 28 Sep 2022
HIGHLIGHTS
  • शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने रिलीजपूर्वी केली बम्पर कमाई

  • चित्रपटाचे OTT आणि सॅटेलाइट अधिकार मोठ्या रकमेत विकले गेले.

  • चित्रपट 500 कोटींहून अधिक कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

बापरे ! शाहरुख खानच्या 'Jawaan' चित्रपटाने रिलीजपूर्वीच कमावले 500 कोटी, बघा कसे...
बापरे ! शाहरुख खानच्या 'Jawaan' चित्रपटाने रिलीजपूर्वीच कमावले 500 कोटी, बघा कसे...

बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या मोठ्या पडद्यावर कमबॅकची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुखही आपल्या चाहत्यांना निराश होण्याची कोणतीही संधी देऊ इच्छित नाही. किंग खानचे तीन मोठे चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहेत. यापैकीच एक ऍक्शन फिल्म 'जवान' असून त्याचे दिग्दर्शन साऊथचे दिग्दर्शक एटली करत आहेत. या चित्रपटाबाबत नवनवीन अपडेट्स येतच असतात. पण आता या चित्रपटाबाबत ताजे धक्कादायक अपडेट म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच 500 कोटींहून अधिक कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. 

हे सुद्धा वाचा : Exclusive: Samsung Galaxy S23 रेंडर आणि डिझाइन्स समोर आले, वेगवेगळ्या अँगल्सने फोन बघा

'जवान'चे OTT आणि सॅटेलाइट राईट्स मोठ्या रकमेत विकले

दिग्दर्शक एटली कुमार दिग्दर्शित 'जवान' हा चित्रपट त्याच्या OTT आणि सॅटेलाइट राईट्समुळे चर्चेत आहे. boxofficeworldwide.com च्या वृत्तानुसार, या चित्रपटाबाबत असे सांगण्यात आले आहे की, या चित्रपटाचे OTT आणि सॅटेलाइट अधिकार मोठ्या रकमेत विकले गेले आहेत. या बातमीत दावा केला जात आहे की, शाहरुख खानच्या या चित्रपटाचे राईट्स विकून त्याने आजकाल प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या बजेटइतकी कमाई केली आहे.

जवान 500 कोटी सहज कमावणार का? 

मिळालेल्या माहितीनुसार, जवानचे म्युझिक राइट्स 25-28 कोटी रुपयांना विकले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि लवकरच त्याची घोषणा केली जाईल. असे झाल्यास हा चित्रपट रिलीजपूर्वी 500 कोटींहून अधिक कमाई करण्यास तयार आहे. जवानचे राईट्स कोणत्या किंमतीला आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर विकले गेले आणि विकले जातील ते बघुयात... 

सॅटेलाइट राइट्स- 70 कोटी

OTT राइट्स-180 कोटी

म्यूजिक राइट्स-25 कोटी

ओवरसीज राइट्स- 80 कोटी 

डोमेस्टिक राइट्स- 150 कोटी शेअर्स 

या व्यतिरिक्त, 'जवान'मध्ये शाहरुख खानसोबत नयनतारा, सुनील ग्रोवर, विजय सेतुपती आणि सान्या मल्होत्रा ​​दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंटने केली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 2 जूनला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. 

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. Read More

Tags:
jawaan movie jawaan atlee jawaan srk director
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements