या आठवड्यात Netflix वर पहा 'हे' पाच चित्रपट, ही आहे संपूर्ण यादी

ने Reshma Zalke | वर प्रकाशित 16 Aug 2022
HIGHLIGHTS
  • हे चित्रपट Netflix वर पहा

  • डार्लिंग्स, मॉर्बियस इत्यादींचा या यादीत समावेश

  • आलिया भट्टचा डार्लिंग्ज हा एक डार्क कॉमेडी ड्रामा आहे

या आठवड्यात Netflix वर पहा 'हे' पाच चित्रपट, ही आहे संपूर्ण यादी
या आठवड्यात Netflix वर पहा 'हे' पाच चित्रपट, ही आहे संपूर्ण यादी

अलीकडेच Netflixवर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तुम्ही हे चित्रपट Netflix India वर पाहू शकता जे तुम्हाला नक्कीच आवडतील. या आठवड्यात तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही काही खास चित्रपटांची यादी तयार केली आहे. तुम्ही हे चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर पाहू शकता.

हे सुद्धा वाचा : Moto G32 ची पहिली सेल आज, खरेदीवर मिळतेय प्रचंड सूट आणि 12 हजार रुपयांपर्यंत लाभ

DARLINGS

आलिया भट्ट आणि विजय वर्मा अभिनित हा चित्रपट 5 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित झाला. डार्लिंग्स हे ड्रामा आणि रहस्याचे एकूण पॅकेज आहे, जे तुम्हाला पाहायला आवडेल. काही गोष्टी समोर येईपर्यंत हा चित्रपट खूप मजेशीर आहे. हा एक ब्लॅक कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे.

MORBIUS

डॅनिएल एस्पिएन्सा दिग्दर्शित 'मॉर्बियस' हा प्लेगचा आजार बरा करण्यासाठी कठोर प्रयोगावर आधारित चित्रपट आहे, ज्याचे काही अनपेक्षित परिणाम होतात. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट झाला आहे आणि त्याला 5.2 IMDb रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट ऍक्शन आणि फॅन्टसीचा संपूर्ण मॅशअप आहे.

PAKKA COMMERCIAL

गोपीचंद आणि राशि खन्ना स्टारर 'पक्का कमर्शियल' ही एक वकील आणि त्याच्या निंदनीय क्लायंटची कथा आहे. चित्रपटाला 4.3 IMDb रेटिंग मिळाले आहे आणि तो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. कलाकार आणि चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे.

THE GRAY MAN

22 जुलै 2022 रोजी रिलीज झालेला 'द ग्रे मॅन' हा CIA च्या सर्वोच्च मालमत्तेवर आधारित एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटाला 6.5 IMDb रेटिंग मिळाले आह. हे खरोखरच ऍक्शन सीक्वेन्सचे पॅकेज आहे. या आठवड्यात या  चित्रपटाचा नक्की आनंद घ्या.

WEDDING SEASON

टॉम डे, सूरज शर्मा आणि पल्लवी शारदा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला 6.3 IMDb रेटिंग मिळाले आहे.  हा नक्कीच तुम्ही पाहावा असाच चित्रपट आहे. चित्रपटाचा ट्रेलरदेखील मजेशीर आहे. 

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. This Is My First Time To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. I Also love to write on different topics and reading books. Read More

Tags:
netflix movies netflix app netflix free trial
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements