Laal Singh Chaddha : नेटफ्लिक्सवर 56 व्या दिवशी झाला प्रीमियर, ट्विटरवर होतेय ट्रेंड

ने Reshma Zalke | वर प्रकाशित 06 Oct 2022
HIGHLIGHTS
  • Laal Singh Chaddha चा OTTवर तीन भाषांमध्ये प्रीमियर

  • 56 व्या दिवशी Netflix वर रिलीज झाला चित्रपट

  • नेटफ्लिक्सने हा चित्रपट सुमारे 80-90 कोटी रुपयांना विकत घेतला

Laal Singh Chaddha : नेटफ्लिक्सवर 56 व्या दिवशी झाला प्रीमियर, ट्विटरवर होतेय ट्रेंड
Laal Singh Chaddha : नेटफ्लिक्सवर 56 व्या दिवशी झाला प्रीमियर, ट्विटरवर होतेय ट्रेंड

बॉलीवूड अभिनेता आमिर खान, करीना कपूर खान, नागा चैतन्य आणि मोना सिंग स्टारर चित्रपट 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाचा OTT वर प्रीमियर झाला आहे. लाल सिंह चड्ढा अचानक नेटफ्लिक्सवर तीन भाषांमध्ये म्हणजेच हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये कोणत्याही माहिती आणि घोषणेशिवाय प्रीमियर झाला. त्यानंतर #LaalSinghCaddha ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

हे सुद्धा वाचा : Infinix चा 200MP कॅमेरा असलेला पावरफुल फोन लाँच, केवळ 12 मिनिटांत होणार पूर्ण चार्ज

 56 व्या दिवशी OTT वर रिलीज झाला चित्रपट 

आमिर खानने या प्रोजेक्टसाठी बरीच वर्षे मेहनत केली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई करेल अशी त्याला पूर्ण आशा होती. पण अद्वैत चंदन दिग्दर्शित लाल सिंग चड्ढा काही खास कमाल दाखवू शकला नाही. रिलीजपूर्वी आमिर खानने प्रमोशन दरम्यान सांगितले होते की, हा चित्रपट 6 महिन्यांनंतर OTT वर प्रदर्शित होईल, परंतु चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे असे दिसते की निर्णय बदलला आणि 2 महिन्यांत चित्रपटाचा OTT वर प्रीमियर झाला. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर खानला या चित्रपटाचे OTT राईट्स सुमारे 150 कोटी रुपयांना विकायचे होते. परंतु ते पूर्ण झाले नाही आणि नेटफ्लिक्सने हा चित्रपट सुमारे 80-90 कोटी रुपयांना विकत घेतला, अशी माहिती मिळाली आहे. रिलीजच्या वेळी चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात आला होता, त्यामुळे मोठ्या संख्येने लोक चित्रपट पाहण्यासाठी पोहोचले नाहीत. आमिर खान आणि करीना कपूर खान यांची जुनी विधाने सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आणि लोकांनी चित्रपट आणि स्टार्सचे खूप ट्रोल केले.

लाल सिंग चड्ढा कलेक्शन आणि IMDb

 11 ऑगस्ट रोजी रिलीजच्या दिवशी लाल सिंग चड्ढाने 11.70 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.  चित्रपटाने ओपनिंग वीकेंडमध्ये 37.96 कोटींची कमाई केली. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर 50.98 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 58.73 कोटी रुपये होते. त्याबरोबरच, Forest Gump चा अधिकृत रिमेक 'लाल सिंग चड्डा'ला IMDb वर 5 रेटिंग मिळाले आहे.

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. Read More

Tags:
Laal Singh Chaddha trailor Laal Singh Chaddha full movie Laal Singh Chaddha netflix
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements