2023 पर्यंत वाट पाहावी लागणार नाही, Pathaan पूर्वीच थिएटरमध्ये दिसणार शाहरुख-दीपिकाची जोडी

Reshma Zalke ने | वर प्रकाशित 18 Nov 2022 13:44 IST
HIGHLIGHTS
  • शाहरुख दीपिकाच्या चाहत्यांसाठी खुशखबर

  • दिपिका पदुकोणला इंडस्ट्रीमध्ये 15 वर्षे पूर्ण

  • थिएटरमध्ये परत दाखवण्यात येणार 'ओम शांती ओम' चित्रपट

2023 पर्यंत वाट पाहावी लागणार नाही, Pathaan पूर्वीच थिएटरमध्ये दिसणार शाहरुख-दीपिकाची जोडी
2023 पर्यंत वाट पाहावी लागणार नाही, Pathaan पूर्वीच थिएटरमध्ये दिसणार शाहरुख-दीपिकाची जोडी

बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणला इंडस्ट्रीमध्ये 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. तिने बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानसोबत इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. दोघांची जोडी पहिल्यांदा 'ओम शांती ओम' चित्रपटात दिसली होती. दीपिका आणि शाहरुखची जोडी प्रेक्षकांना नेहमीच वेड लावते. दीपिकाचा शाहरुखसोबतचा पहिला डेब्यू चित्रपट 'ओम शांती ओम' 2007 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. त्यानंतर दोघेही अनेक चित्रपटांमध्ये दिसले. आता ही जोडी पुन्हा एकदा पठाणमध्ये दिसणार आहे.

हे सुद्धा वाचा : कमालंच ! भारतात जास्तीतजास्त लोक एकच Password वापरतात, सर्वात खराब पासवर्डची यादी जाहीर

नुकतेच ओम शांती ओमने पडद्यावर रिलीज होऊन 15 वर्षे पूर्ण केली आहेत. हा दिवस लक्षात ठेवून दीपिकाने सोशल मीडियावर एक सुंदर नोट लिहिले आहे. दरम्यान, शाहरुख खानच्या फॅन क्लब - SRK युनिव्हर्सने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा चित्रपट दिल्ली, मुंबई, कोलकाता, पटणा, भोपाळ आणि अहमदाबादसह देशातील 20 शहरांच्या सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे. ओम शांती ओम 17 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

2007 मध्ये रिलीज झालेला ओम शांती ओम फराह खानने दिग्दर्शित केला होता. शाहरुख खान आणि दीपिकाशिवाय या चित्रपटात अर्जुन रामपाल, श्रेयस तळपदे आणि किरण खेर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. याआधी शाहरुखच्या जन्मदिवसानिमित 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात दाखवण्यात आला होता. आताही इतर चित्रपटांपेक्षा या चित्रपटाने अधिक कमाई केली, अशी माहिती मिळाली आहे. 

शाहरुख आणि दीपिकाबद्दल बोलायचे झाले तर ही जोडी लवकरच पठाणमध्ये एकत्र दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहमचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पुढच्या वर्षी 25 जानेवारीला हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे. मात्र, पठाणच्या आधी प्रेक्षकांना शाहरुख आणि दीपिका यांची जोडी पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. 

अधिक तंत्रज्ञान बातम्या, प्रोडक्ट रिव्ह्यू, विज्ञान-तंत्रज्ञान फीचर्स आणि अपडेट्ससाठी, Digit.in वाचत रहा किंवा आमच्या Google News पृष्ठावर जा.

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. Read More

Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

नवीनतम Articles सर्व पहा

VISUAL STORY सर्व पहा