अमिताभ बच्चन यांना 'KBC 14' स्पर्धकाकडून मिळाले 'थग्गू के लड्डू'

ने Reshma Zalke | वर प्रकाशित 01 Sep 2022
HIGHLIGHTS
  • KBC 14 स्पर्धकाने 'थग्गू के लड्डू' या प्रसिद्ध दुकानातून बिग बींसाठी मिठाई आणली

  • स्पर्धकाने त्यांचे मेहंदी डिझाईन्स देखील बिग बींना दाखवले

  • 'KBC 14' सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होत आहे

अमिताभ बच्चन यांना 'KBC 14' स्पर्धकाकडून मिळाले 'थग्गू के लड्डू'
अमिताभ बच्चन यांना 'KBC 14' स्पर्धकाकडून मिळाले 'थग्गू के लड्डू'

मेगास्टार अमिताभ बच्चन यांना 'कौन बनेगा करोडपती 14' वर कानपूरचे सहाय्यक शिक्षक आणि मेहंदी तज्ञ अनिल माथूर यांच्याकडून खास लाडू मिळाले. बिग बींना लाडू देताना ते म्हणाले, "ही खास मिठाई, मी तुमच्याकरता 'थग्गू के लड्डू' या प्रसिद्ध दुकानातून आणली आहे. आणि खरं तर कानपूरमध्ये 'बंटी और बबली'चे शूटिंग करत असतानाही अभिषेक बच्चनकडे हे लाडू होते.

हे सुद्धा वाचा : Huawei च्या या स्मार्टफोनला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद, आतापर्यंत 1 मिलियन लोकांनी केले बुकिंग, जाणून घ्या विशेषता

'KBC 14' मध्ये या स्पर्धकाने त्यांच्या आकर्षक मेहंदी डिझाईन्स देखील बिग बींना दाखवले. त्यानंतर बच्चन यांनी त्यांना त्यांची मेहेंदीची आवड असेच सुरू ठेवण्यास सांगितले. त्याबरोबरच, बिग बी हे सुद्धा म्हणाले की,"मेहंदी डिझाइन करणे सोपे काम नाही." 

त्यानंतर स्पर्धक अनिलने बच्चन यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले, "एकमेव, मेगास्टार, श्री. अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत राहण्याचा मला सन्मान वाटतो. 'कौन बनेगा करोडपती' खेळणे ही माझी नेहमीच मोठी इच्छा होती. मी अजूनही मी कल्पना करतोय कालच मला फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राउंड जिंकल्यानंतर हॉट सीटवर बोलावण्यात आले. हा अनुभव मी कधीही विसरणार नाही."

दरम्यान, 'KBC 14' शो सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होतोय. 

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. Read More

Tags:
kbc 2022 kbc today kbc 7 crore winner
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements