BSNLचा सर्वात स्वस्त प्लॅन, Jio Airtel देखील करु शकत नाही बरोबरी

Reshma Zalke ने | वर प्रकाशित 24 May 2022 17:15 IST
BSNLचा सर्वात स्वस्त प्लॅन, Jio Airtel देखील करु शकत नाही बरोबरी
HIGHLIGHTS
  • BSNLचा 2,399 रुपयांचा परवडणारा प्लॅन.

  • 425 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग.

  • jio आणि Airtelच्या तुलनेत BSNLचा प्लॅन स्वस्त आणि लाभदायी.

जर तुम्ही कमी वैधतेच्या प्लॅनऐवजी पूर्ण वर्षभर वैधता असलेला प्लॅन शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला मार्केटमधील BSNLच्या सर्वोत्तम प्लॅनची ​​तुलना Jio आणि Airtel सोबत करून सांगणार आहोत. BSNL चा हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. परंतु यात ग्राहकांना 60 दिवसांची अतिरिक्त वैधता दिली जात आहे, त्यानंतर प्लॅनची ​एकूण ​वैधता 425 दिवसांची होते. आम्ही तुम्हाला BSNLच्या 2,399 रुपयांच्या प्लॅनची ​​जिओच्या 2,879 रुपयांच्या प्लॅनसोबत आणि एअरटेलच्या 2,999 रुपयांच्या प्लॅनसोबत ​​तुलना करून सांगणार आहोत. चला तर याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊयात... 

BSNLचा 2,399 रुपयांचा प्लॅन:

 BSNLच्या 2,399 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. हा प्लॅनमध्ये 425 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे.तसेच, या प्लॅनमध्ये अमर्यादित लोकल/STD व्हॉइस कॉलिंग उपलब्ध आहे. हाय स्पीड डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर इंटरनेट 40 kbps या स्पीडने चालतो. या प्लॅनमध्ये दररोज 100 SMS देखील मिळतात. त्याबरोबरच, यामध्ये विनामूल्य EROS Now एंटरटेनमेंट सर्व्हिस आणि 30 दिवसांसाठी LOKDHUN कंटेंट मिळेल.

जिओचा 2,879 रुपयांचा प्लॅन: 

जिओचा 2,879 रुपयांचा प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये एकूण 730GB डेटा आणि दररोज 100 SMS उपलब्ध आहे. जिओचा हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे. तसेच, यामध्ये अनलिमिटेड लोकल/STD व्हॉइस कॉलिंग उपलब्ध आहे. हाय स्पीड डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर इंटरनेट 64 kbps च्या स्पीडने चालतो. शिवाय, या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema आणि JioNews, Jio सिक्युरिटी आणि JioCloudचा फ्री ऍक्सेस मिळेल.

एअरटेलचा 2,999 रुपयांचा प्लॅन:

 एअरटेलच्या 2,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये देखील एकूण 730GB डेटा आणि दररोज 100 SMS उपलब्ध आहे. हा प्लान 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित लोकल/STD व्हॉइस कॉलिंगदेखील उपलब्ध आहे. तसेच 1 वर्षासाठी डिझनी+ हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन, 30 दिवसांसाठी मोफत Amazon Prime Video ME ट्रायल, त्याबरोबरच Hellotunes आणि Wynk Musicचे  मोफत सबस्क्रिप्शन दिला जातो.

 

 

  

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. Read More

ट्रेंडिंग लेख

Advertisements

नवीनतम Articles सर्व पहा

VISUAL STORY सर्व पहा