महत्त्वाचे: Amazon Pay बॅलेंस बँक अकाउंटमध्ये कसे ट्रान्सफर करावे ? जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया...

Reshma Zalke ने | वर प्रकाशित 11 Nov 2022 09:41 IST
महत्त्वाचे: Amazon Pay बॅलेंस बँक अकाउंटमध्ये कसे ट्रान्सफर करावे ? जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया...
HIGHLIGHTS
  • Amazon Pay बॅलेंस बँक अकाउंटमध्ये सहज ट्रान्सफर करा.

  • तुमची KYC पूर्ण झाल्‍यावरच तुम्‍ही ऍमेझॉन पे बॅलन्समधून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतील.

  • जाणून घ्या स्टेप बाय स्टेप सोपी प्रक्रिया

तुमच्यापैकी बहुतेकांनी Amazon वरून खरेदी केली असेल. बरेच लोक Amazon Pay देखील वापरत असतील. Amazon Pay वापरण्याचा फायदा असा आहे की, तुम्ही सहजपणे पेमेंट करू शकता. मात्र यासाठी, तुम्हाला Amazon Pay Wallet मध्ये काही पैसे ठेवावे  लागतील. अनेक वेळा आपल्याला Amazon Pay बॅलन्स बँक अकाउंट हस्तांतरित करण्याची आवश्यकता असते, परंतु माहितीच्या अभावामुळे आपण ते करू शकत नाही. 

त्यामुळे, आजच्या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Amazon Pay बॅलन्स बँक अकाउंटमध्ये कसे ट्रान्सफर करायचे ते सांगणार आहोत. Amazon Pay बॅलेन्स रजिस्ट्रेशनसाठी, तुम्हाला ID, बँक खात्याची माहिती आणि मोबाइल नंबर द्यावा लागेल.

बँक अकाउंटमध्ये Amazon Pay बॅलेन्स कसे ट्रान्सफर कराल ?

सर्वप्रथम, तुमची KYC पूर्ण झाल्‍यावरच तुम्‍ही ऍमेझॉन पे बॅलन्समधून तुमच्‍या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकाल. त्यामुळे तुमचे केवायसी झाले नसेल तर आधी ते पूर्ण करून घ्या.

> सर्वप्रथम तुमच्या फोनवर तुमचे Amazon ऍप उघडा.

> त्यानंतर Amazon Pay विभागात जा.

> आता Send money पर्यायावर क्लिक करा.

> त्यानंतर बँक आयकॉनवर क्लिक करा.

> आता IFSC कोडसह बँक खात्याची माहिती द्या.

> त्यानंतर Pay Now बटणवर क्लिक करा.

> आता तुम्हाला किती पैसे पाठवायचे आहेत याबाबत माहिती भरा.

> आता स्क्रीनवर एक पॉपअप मेनू दिसेल, ज्यामध्ये Amazon Pay बॅलन्सद्वारे पे दर्शविला जाईल.

> आता त्यावर टॅप करून पेमेंट करा.

> यानंतर, Amazon Pay  बॅलन्सचे पैसे तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील.

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. Read More

ट्रेंडिंग लेख

Advertisements

नवीनतम Articles सर्व पहा

VISUAL STORY सर्व पहा