स्मार्टफोनची बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी खास टिप्स बघा
- रेशमा झलके

इंटरनेट आणि कॅमेराच्या जास्त वापरामुळे फोनची बॅटरी लवकर संपते. नेहमी सोबत पावरबँक घेऊन फिरणे कठीण आहे. चला तर मग बघुयात फोनची बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी खास टिप्स...

रिफ्रेश रेट ऑटोवर सेट करा.
डिस्प्लेचा रिफ्रेश रेट जितका जास्त तितका बॅटरीचा वापर जास्त. बॅटरी वाचवण्यासाठी तुम्ही फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन रिफ्रेश रेट ऑटोवर सेट करू शकता. यामुळे फोनची बॅटरी लाईफ खूप वाढते.
ऑटो ब्राइटन मोड :
फोनचा ब्राइटनेस 50 टक्के किंवा त्यापेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्वोत्तम मार्ग म्हणजे तो ऑटो-ब्राइटनेस मोडवर सेट करणे, यामुळे तुमची बॅटरी लाईफ खूप वाढेल.
डेटा सेव्हिंग मोड :
डेटा सेव्हिंग मोड ऑन करण्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन ड्युअल सिम्स आणि मोबाइल नेटवर्कवर टॅप करावे लागेल. आता येथून डेटा ट्रॅफिक मॅनेजमेंटमधून डेटा सेव्हिंग मोड चालू करावा लागेल.
अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करा.

फोनची बॅटरी वाचवण्यासाठी अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करणे हा उत्तम पर्याय आहे. तसेच, तुमचा फोन आणि ऍप वेळोवेळी अपडेट करत राहा. त्यामुळे फोन स्मूथ काम करतो आणि बॅटरीही कमी खर्च होते.