Reno8 5G वर प्रचंड सवलत! आता फोनची किंमत बघा...
- रेशमा झलके
OPPO Reno8 5G चे 8GB + 128GB स्टोरेज मॉडेल फ्लिपकार्टवर 29,999 रुपयांना विकले जात आहे.
Citi क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास 1500 रुपयांची सूट किंवा EMI पर्यायावरून फोन खरेदी केल्यास 2000 रुपयांची सूट दिली जात आहे.
तथापि, जर तुम्ही पेमेंटसाठी SBI कार्ड निवडले असेल, तर तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळू शकते.
इतकंच नाही तर तुम्हाला इतर काही बँक कार्ड्सवरही सूट मिळत आहे. या परिस्थितीत तुम्हाला 3000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
तुम्हाला OPPO Reno8 5G वर 20500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. जर तुम्ही सर्व ऑफर्सचा लाभ घेऊ शकत असाल तर तुम्हाला फोन अतिशय स्वस्तात मिळेल.
फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह फुल-HD रिझोल्यूशन (2,400x1,080 पिक्सेल) सह 6.4-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले मिळतो.
तुम्हाला फोनमध्ये MediaTek 1300 प्रोसेसर दिला जात आहे.