Jio युजर्सना परत झटका ! बंद केली 'ही' खास सेवा
- रेशमा झलके
तुम्ही Reliance Jio च्या इमर्जन्सी डेटा लोनबद्दल ऐकले आहे का? कंपनीने आता ही सेवा बंद केली आहे.
बर्‍याच वेळा ही सेवा तुम्हाला खूप उपयोगी पडायची, पण आता तुम्हाला या सेवेचा लाभ घेता येणार नाही.
तुम्हाला लक्षात असेल की My Jio ऍपवर जाऊन तुमच्या प्लॅनचा डेटा संपल्यास तुम्हाला 2GB डेटा लोन मिळू शकत होता.
मात्र, हा डेटा वापरण्यासाठी तुम्हाला नंतर कंपनीला 25 रुपये द्यावे लागल होते.
कंपनीने यामागचे कारण सांगितलेले नाही. मात्र, काही यूजर्सना ही सेवा बंद करण्यात आल्याचा संदेश मिळत आहे.