नव्या Realme P3x 5G ची सेल भारतात सुरु! पहिल्या सेलमध्ये कवडीमोलात मिळतोय जबरदस्त फोन

HIGHLIGHTS

Realme ने अलीकडेच Realme P3x 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला.

Realme P3x 5G ची पहिली खुली विक्री भारतात अखेर सुरु

Flipkart वर Realme P3x 5G फोन मोठ्या सवलतींसह उपलब्ध

नव्या Realme P3x 5G ची सेल भारतात सुरु! पहिल्या सेलमध्ये कवडीमोलात मिळतोय जबरदस्त फोन

Realme ने अलीकडेच Realme P3x 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. त्यानंतर, आज म्हणजेच 28 फेब्रुवारी 2025 या स्मार्टफोनची विक्री भारतात सुरु झाली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, कंपनीने अलीकडेच Realme P3 Pro आणि Realme P3x 5G हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. तर, फोनच्या प्रो व्हेरिएंटची विक्री 25 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. त्यानंतर, Realme P3x 5G आजपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हा स्मार्टफोन अनेक दमदार फीचर्स आणि स्टोरेज व्हेरिएंटसह लाँच करण्यात आला आहे. पहिल्या सेलमध्ये फोन खरेदी केल्यास अनेक ऑफर्स देखील उपलब्ध असतील.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Nothing Phone 3a आणि 3a Pro लवकरच भारतात होणार लाँच, आताच प्लॅन करा बजेट! पहा अपेक्षित किंमत

Realme P3x 5G ची किंमत आणि ऑफर्स

Realme P3x 5G स्मार्टफोनची पहिली सेल आज दुपारी 12 वाजता सुरू झाली आहे. प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर हा फोन मोठ्या सवलतींसह खरेदी करता येईल. फोनच्या बेस व्हेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंमत 13,999 रुपये इतकी निश्चित केली गेली आहे. तर, 8GB रॅम+ 128GB स्टोरेज असलेल्या फोनच्या दुसऱ्या किंवा टॉप व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. सेल दरम्यान, सर्व बँक कार्डवर 1000 रुपयांची सूट उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन मिडनाईट ब्लू, लूनर सिल्व्हर आणि स्टेलर पिंक या कलर ऑप्शन्ससह सादर करण्यात आला आहे.

Realme P3x 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme P3x 5G स्मार्टफोन प्रीमियम व्हेगन लेदर डिझाइनसह लाँच करण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले Realme फोनमध्ये 6.72 इंच लांबीचा फुल HD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्मूथ परफॉर्मन्ससाठी, हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे, जो मीडियाटेक D6400 चिपसेटसह येतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 15 वर आधारित कलरओएस 15.0 वर कार्य करतो. तर, धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी फोनला IP69 + IP68 रेटिंग देण्यात आले आहे.

त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 50MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याबरोबरच, यात सेकंडरी कॅमेरा देखील मिळेल. आकर्षक सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, या स्मार्टफोनला 6000mAh जंबो बॅटरीचा सपोर्ट देण्यात आला आहे, जो 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ड्युअल सिम सपोर्ट, GPS, ग्लोनास, वाय-फाय, ब्लूटूथ 5.3, गॅलिलिओ, QZSS, यूएसबी टाइप-C पोर्ट यांचा समावेश आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo