Price Drop! आकर्षक Moto G85 5G फोनवर मिळतोय प्रचंड Discount, 32MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध

HIGHLIGHTS

Motorola ने काही काळापूर्वी Moto G85 5G फोन भारतात लाँच केला.

या स्मार्टफोनमध्ये OIS सह 50MP चा प्रायमरी शूटर मिळेल.

या डिव्हाइसमध्ये सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Price Drop! आकर्षक Moto G85 5G फोनवर मिळतोय प्रचंड Discount, 32MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola ने काही काळापूर्वी Moto G85 5G फोन भारतात लाँच केला. हा स्मार्टफोन कंपनीने 20000 रुपयांअंतर्गत लाँच केला आहे. जर तुम्ही टिकाऊ फॉर्म फॅक्टर, चांगली कामगिरी आणि कॅमेरा देणारा स्मार्टफोन शोधत असाल तर तुम्ही नक्कीच Motorola G85 5G फोनचा विचार करू शकता. या किमतीत फोनमध्ये अनेक पॉवरफूल फीचर्स मिळतात. जसे की, यात मोठी बॅटरी आणि 32MP फ्रंट इ. फीचर्स मिळतील. सध्या या फोनवर हजारो रुपयांची बचत होईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Motorola G85 5G वरील डील-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: iQOO Neo 10R चे लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स उघड! पुढील BGMI किंगद्वारे तब्बल 5 तासांपर्यंत करता येईल हेवी गेमिंग

Moto G85 5G ची किंमत आणि ऑफर्स

Moto G85 5G चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सध्या Flipkart वर 17,999 रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, खरेदीदारांना निवडक बँक कार्डद्वारे 1000 रुपयांची बँक सूट मिळू शकते. या ऑफरमुळे या फोनची किंमत 16,999 रुपयांपर्यंत कमी होते. जर तुम्ही तुमचे जुने डिव्हाइस एक्सचेंज करत असाल, तर तुम्हाला डिव्हाइसच्या सर्वोत्तम शक्य किंमतीसह 1,000 रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस मिळू शकतो. लक्षात घ्या की, या फोनवर 16,900 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे.

Motorola G85 5G Sale

एवढेच नाही तर, तुम्ही हा फोन EMI द्वारे खरेदी करू शकता. तुम्ही नो-कॉस्ट EMI पर्याय निवडू शकता, जो दरमहा 3000 रुपयांपासून सुरू होतो. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तर IDFC बँक कार्डद्वारे डिव्हाइसवर तुमचे 1500 रुपये वाचतील. त्याबरोबरच, ग्राहकांना 799 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट प्रोटेक्ट आणि 349 रुपयांमध्ये विस्तारित वॉरंटी मिळू शकते.

Moto G85 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Moto G85 5G मध्ये 6.67-इंच लांबीचा फुल-एचडी+ 3D कर्व्हड पीओएलईडी पॅनल देण्यात आला आहे. फोनवर प्रोटेक्शनसाठी, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन उपलब्ध आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आह. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या डिव्हाइसमध्ये स्नॅपड्रॅगन 6s Gen 3 चिपसेट देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे.

moto g85

फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये OIS सह 50MP चा प्रायमरी शूटर आणि 8MP अल्ट्रावाइड सेन्सर देण्यात आला आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी, या डिव्हाइसमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5000mAh बॅटरी मिळेल, जी 33W फास्ट चार्जिंगसह येईल. यासह तुमचा डिवाइस केवळ काही मूलभूत कार्ये केल्यास दोन दिवसांपर्यंत सुरु राहू शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo