Realme P3 Pro 5G Sale: अंडरवॉटर मोडसह येणाऱ्या लेटेस्ट फोनची भारतात पहिली सेल, जाणून घ्या Best ऑफर्स

HIGHLIGHTS

Realme ने Realme P3 Pro 5G अलीकडेच भारतात लाँच केला आहे.

Realme P3 Pro 5G तीन स्टोरेज मॉडेल्समध्ये सादर करण्यात आला आहे.

स्मार्टफोनमध्ये अंडरवॉटर मोड आणि Ai Easer 2.0 सपोर्ट देण्यात आला आहे.

Realme P3 Pro 5G Sale: अंडरवॉटर मोडसह येणाऱ्या लेटेस्ट फोनची भारतात पहिली सेल, जाणून घ्या Best ऑफर्स

Realme P3 Pro 5G Sale: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने Realme P3 Pro 5G अलीकडेच भारतात लाँच केला आहे. हा फोन भारतात मिड बजेटमध्ये सादर केला आहे. त्यानंतर, आज म्हणजेच 25 फेब्रुवारी 2025 रोजी पहिल्यांदाच हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या स्मार्टफोनची विक्री दुपारी 12 वाजता शॉपिंग वेबसाइट Flipkart वर सुरू होईल. पहिल्या सेलमध्ये तुम्हाला स्वस्त EMI आणि मोठी सूट मिळणार आहे. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6000mAh बॅटरी आणि 50mp कॅमेरासारखे पॉवरफूल फीचर्स मिळतील. जाणून घेऊयात Realme P3 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Upcoming Smartphones: लेटेस्ट Samsung Galaxy M16 आणि M06 5G चे भारतीय लाँच कन्फर्म!

Realme P3 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स

REALME P3 PRO 5G

Realme चा नवीन स्मार्टफोन Realme P3 Pro 5G तीन स्टोरेज मॉडेल्समध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या 8GB+ 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. तर, 8GB+ 256GB आणि 12GB+ 256GB मॉडेल अनुक्रमे 24,999 आणि 26,999 रुपयांना उपलब्ध आहेत. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यावर 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, 1,176 रुपयांचा EMI देखील दिला जात आहे.

Realme P3 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

मोबाईल फोनमध्ये 6.83 इंच लांबीचा क्वाड कर्व्ड डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या फोनचा टच सॅम्पलिंग रेट 240Hz इतका आहे. त्याबरोबरच, हा फोन Android 15 वर आधारित Realme UI 6.O ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. या स्मार्टफोनमध्ये अंडरवॉटर मोड आणि Ai Easer 2.0 सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनला IP69,IP68 आणि IP66 रेटिंग मिळाले आहे.Realme P3 Pro मध्ये Qualcomm चा Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर आहे.

REALME P3 PRO 5G

Realme च्या नव्या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात पहिला 50MP प्रायमरी सेन्सर आहे, जो ओआयएसला सपोर्ट करतो. यासोबतच, सेटअपमध्ये 2MP डेप्थ लेन्स उपलब्ध आहे. तसेच, या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा मिळेल. या हँडसेटमध्ये दीर्घकाळ काम करण्यासाठी 6000mAh ची मोठी बॅटरी देखील आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, हँडसेटमध्ये ड्युअल सिम स्लॉट, ऑडिओ जॅक, वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-C पोर्ट सारखे स्पेसिफिकेशन आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo